Aamhi Balaji Foundation

Aamhi Balaji Foundation आधुनिक शेती आणि शेतक-यांच्या
कल्याणा?

शेतकरी मित्रांनो,
पारंपारिक शेतीचा काळ केव्हाच मागे पडलाय, हे आपण जाणताच! बदलते ऋतुमान, लपंडाव खेळणारे पर्जन्यमान, ओला- सुका दुष्काळ.... अशा कितीतरी समस्यांना सामोरे जायला आता तुम्ही चांगलेच सरावले आहात. एव्हढेच काय सिंचन, जल पुनर्भरण, सौर पंप आणि व्यवस्थापन, हरितगृहे आणि मल्चिंगसारख्या आधुनिक संसाधनांना तंत्रज्ञानाची जोड देऊन तुम्ही विपरीत परिस्थितीशी झुंज देत आहात ! गेल्या वर्षी कोवीड काळातही कृ

षीक्षेत्राचा विकास दर उच्चांकी नेऊन आपण हे सिद्धच केलंय !

आम्ही बालाजी फाऊंडेशन:
नव्या दशकात शेतकरी मित्रांच्या खांद्याला खांदा लाऊन चांद्यापासून बांध्यापर्यंत त्यांचा सच्चा साथी बनायला आम्ही एक मंच सज्ज केला आहे. या अंतर्गत नवी शेती, त्यातील नवी आव्हाने, नवे तंत्रज्ञान, नवे प्रश्न आणि त्यांचे समाधान यासारख्या विषयांचे नवे कंगोरे आपण मिळून हाताळणार आहोत.
एका अर्थाने हा शेतक-यांचा क्लबच असेल, जिथे तुमच्या जिवाभावाचे बंधु- सखा सारेच मनमुक्त होतील. कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेणे, पिकांची लागवड, उपयुक्त खते, कीटकनाशके, गटशेती आणि व्यवस्थापन,विविध पिकांसाठी जैविक अथवा रासायनिक किंवा सेंद्रिय खतांचा वापर अशा अनेक विषय आपण हाताळू; कधी प्रात्यक्षिके घेऊन तर कधी ऑनलाईन कार्यक्रम घेऊन, फेसबुक आणि ऑनलाईन कार्यक्रमांच्या निमित्तानेही आपण सतत भेटत राहूयात !

चला तर मित्रांनो,
शेती समस्यांची दाहून लंका,
वाजू द्या फक्त शेतक-यांचा डंका!

08/06/2026

#आम्ही_बालाजी_फाऊंडेशन #शेतकरी #महाराष्ट्र

Address

Aamhi Balaji Foundation, M. D. Road Pol No 434, Dhamangaon Railway, Dist Amravati
Dhamangaon
444709

Telephone

+919738405060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aamhi Balaji Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share