19/08/2025
*स्वच्छतेसाठी धावली दापोली*
*जेसीआय दापोलीचा स्तुत्य उपक्रम*
दापोली दि.
स्वच्छ दापोली, हरित दापोली या संकल्पनेअंतर्गत जेसीआय दापोलीने आयोजित केलेल्या जेसीआय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये (पर्व दुसरे)आज दापोलीकर स्वच्छतेसाठीचा संदेश घेऊन धावले. दापोलीमध्ये पावसाचा जोर असताना देखील या स्पर्धेमध्ये १५० हून अधिक दापोलीकर स्पर्धकांनी सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे हे उपस्थित होते, तसेच नगरसेविका साधना बोत्रे ,पोलीस उपनिरीक्षिका ज्योती चव्हाण, विनोद आवळे, मिलिंद शेठ, लायन्स क्लब दापोलीचे अध्यक्ष ला. अतुल मेहता, ला. आशिष मेहता, ला. श्रीराम माजलेकर, वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता अजय राणे, जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी. फराज रखांगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ही मॅरेथॉन स्पर्धा २ व ५ किलोमीटर अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. स्पर्धेमध्ये वय वर्ष चार ते वय वर्ष सत्तर या वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी दापोलीकरांना स्वच्छतेसंदर्भात जागरूकता निर्माण करून शपथ देखील देण्यात आली. स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे ५ किलोमीटर महिला प्रथम क्रमांक- शिल्पा शंकर केंबळे, द्वितीय- कस्तुरी कमलाकर भानसे, तृतीय- अनुश्री रविकांत आंबेकर, ५ किलोमीटर ( पुरुष) प्रथम- सिद्धेश पांडुरंग बार्जे , द्वितीय - ओंकार विष्णू बैकर, तृतीय- यश मंगेश शिर्के , २ किलोमीटर ( महिला) प्रथम - समृद्धी संतोष धाडवे, द्वितीय- ऐश्वर्या वसंत खैर, तृतीय - तनुजा राजेंद्र साबळे, २ किलोमीटर ( पुरुष ) प्रथम- आयुष अशोक बार्जे , द्वितीय- सुनील रघुनाथ रेवाळे, तृतीय- सुजय सुभाष मर्चंडे, विजेत्यांची मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, रोख रक्कम, मेडल व प्रशस्तिपत्र देण्यात आले .
या स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सर रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्ट, वाघवे यांनी विशेष सहकार्य केले. थलासो रिसॉर्टचे दीपेश रसाळ, साधनाताई बोत्रे, भवानी स्टील, यांच्यासह अनेक दात्यांनी या मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सचिव जेसी. प्रा. तेजस मेहता, प्रकल्प चेअरमन जेसी. रोशन वेदक, प्रकल्प संचालक जेसी डॉ. पियुष सोनजे, प्रकल्प समन्वयक जेसी. एचजीएफ भरत रसाळ, जेसी. स्वप्नील मेहता, जेसी. बसित देशमुख, जेसी. फैजान पुरकर, जेसी. ऋषिकेश शेठ आणि जेसी विकास राठोड यांच्यासह जेसीआय दापोलीच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जेसी एचजीएफ प्रा.कुणाल मंडलिक आणि जेसी.प्रा. तेजस मेहता यांनी केले.