दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. दिगंबरा" ...............
मंत्राचा अर्थ
श्रीदत्तसंप्रदायातील परम पूजनीय,श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेँबे स्वामी महाराज यांनी ते केवळ आत्मभूमिकेत असताना त्यांच्या स्फुरणातून हा श्रीदत्तसंप्रदायाचा महामंत्र लोककल्याणाकरीता प्रकट केला आहे.
दिगंबरा या शब्दाचा अर्थ
दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे
असा.दिशा हे वस्त्र धारण
करणारा जो कोणी असेल तो
निश्चितपणे देहातीत असा
असणा
र.देहाच्या चौकटीत
राहणारा जीव व दिगंबर
वृत्तीने राहणारा आत्मा
यांच्यामधये वासनामय
स्थिती व निर्वासना स्थिती
अशा सरळ सरळ अवस्था
अनुभवावयास मिळतात.
मनाची व्याप्ती अशी वाढली
तर माणसाचे ज्ञानही वाढते.
म्हणून दिगंबर हा अक्षर
समुच्चय अंत:करण निर्वासन
करण्यास व ज्ञानवृध्दी
करण्यास उपयोगी पडतो.
श्रीपाद यातील श्री म्हणजे
लक्ष्मी व ती ज्याच्या पायाशी
आहे.ते श्रीपाद.भारतीय
देवतायनांचा विचार केला तर
असे आढळते की,भगवान
विष्णूच्या पायाशी लक्ष्मी आहे.
व श्रीविष्णू हे दैवत स्थितीचे
प्रतीक आहे.दिगंबर या नावात
त्यागप्रवृत्ती आणि श्रीपाद
नावात स्थितिदर्शकता
जाणवते.
श्रीपाद-वल्लभ म्हणजे लक्ष्मी
त्यांच्या पायाशी असून तो
लक्ष्मीचा स्वामी आहे,असा
अर्थ होतो.दैवी संपत्तीचा
स्वामी होण्यासाठी त्याग-
प्रबोधन करणारा शब्द म्हणजे
दिगंबर हा होय.दिगंबर हा
महामंत्र जगतसंजीवन आहे.
त्याचे कारण तो मनाचे
यथायोग्य उन्नयन करतो.
अक्षय्यता,सातत्य व
चिरजीवीत्व ही
दत्तसंप्रदायाची वैशिष्ट्ये
असून या वैशिष्ट्यांना
अबाधित राखण्यासाठी
अर्थधारणेसह वरील मंत्राचा
उच्चार केला तर मंत्राचे
आधिदैवत जे भगवान
श्रीदत्तात्रेय,तव्दतच श्रीस्वामी
समर्थ ते कृपायमान होऊन
तारणहार ठरतात.असा
अनुभव या मंत्राचा जप
करणाऱ्यांचा आहे.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥