Laghu Udyog Bharati - Pimpri Chinchwad

Laghu Udyog Bharati - Pimpri Chinchwad Laghu Udyog Bharati is a registered all India organization of MSME Industries in PCMC and Pune Region

23/03/2026
लघु उद्योग भारती पिंपरी चिंचवड तर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
27/08/2025

लघु उद्योग भारती पिंपरी चिंचवड तर्फे सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

दिनांक: २४ ऑगस्ट २०२५स्थळ: सायन्स पार्क ऑडिटोरियम, पिंपरी चिंचवडलघुउद्योगांसाठी कृतीशील व्यासपीठ — लघुउद्योग भारती पिंपर...
25/08/2025

दिनांक: २४ ऑगस्ट २०२५
स्थळ: सायन्स पार्क ऑडिटोरियम, पिंपरी चिंचवड

लघुउद्योगांसाठी कृतीशील व्यासपीठ — लघुउद्योग भारती पिंपरी चिंचवडचा विशेष सेमिनार संपन्न

पिंपरी चिंचवड : लघुउद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या *लघुउद्योग भारती पिंपरी चिंचवड एकाई* तर्फे आयोजित विशेष सेमिनार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायन्स पार्क ऑडिटोरियममध्ये संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व भारतमाता पूजनाने झाली. निवेदन व स्वागतपर भाषण श्री. गिरीश वैद्य (उपाध्यक्ष, लघुउद्योग भारती पिंपरी चिंचवड) यांनी केले.

या वेळी व्यासपीठावर मान्यवर म्हणून उपस्थित होते:

* *श्री. मंदार लेले* – सहमंत्री, लघुउद्योग भारती महाराष्ट्र प्रदेश
* *श्री. राममूर्ती* – अध्यक्ष, पिंपरी चिंचवड एकाई
* *सौ. मनिषा जाधव* – CEO, Datacrux Insights
* *Tata AI* व *Millets Grow* – प्रतिनिधी

या सेमिनारमध्ये विविध तांत्रिक आणि व्यावसायिक विषयांवर सखोल चर्चा झाली. *AI आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स* क्षेत्रातील तज्ज्ञ *सौ. मनिषा जाधव* यांनी सादर केलेले सविस्तर प्रेझेंटेशन उपस्थितांसाठी मार्गदर्शक ठरले.

*Millets Grow* या नवउद्योजक कंपनीने त्यांच्या नव्या उत्पादनांचे लोकार्पण यावेळी केले, तर *Tata AIM* तर्फे MSME साठी नवकल्पनांवर आधारित सादरीकरण झाले.

*श्री. राहुल खोले* यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करत श्री. मंदार लेले यांनी सत्कार केला.
कार्यक्रमात *राष्ट्रीय कार्याची माहिती* श्री. राममूर्ती यांनी दिली आणि स्थानिक एकाईच्या आगामी योजनांची माहिती *श्री. विवेक राठोडे* यांनी दिली.

कार्यक्रमाच्या समारोपात *श्री. मंदार लेले* यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
*श्री. सुरेंद्र कुलकर्णी* यांनी उपस्थित मान्यवरांचे व उपस्थित उद्योजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्राने झाली.

हा कार्यक्रम नवउद्योजक, MSME प्रतिनिधी आणि लघुउद्योगिकांच्या भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला, अशी प्रतिक्रिया सहभागी उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली.












Industrial Visit LUB PCMC
18/08/2025

Industrial Visit LUB PCMC

LUB PCMC weekly meeting
10/07/2025

LUB PCMC weekly meeting

07/07/2025
07/09/2024

🙏🌹🙏 Laghu Udyog Bharati PCMC jointly with Smart City Pimpri Chinchwad have organised a Seminar on Government E Marketplace : Business opportunities with government departments and PSUs.

Date : 4 September 2024, Wednesday.

Time : 5 pm.

Venue : Auto Cluster Auditorium, opposite Science Park, H Block MIDC Chinchwad.

Key Note Speaker : Mr. Vinod Agrawal, Founder and CEO ACE Technology.

Seminar is open for Directors, owners, proprietors, business partners, sales and marketing team of MSMEs.

Please pre-register to attend the Seminar.

Google form for registration. :
https://forms.gle/hHrzHFDB7qfXraYn9

Address

Chinchwad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laghu Udyog Bharati - Pimpri Chinchwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share