Sahakarya foundation - सहकार्य फाऊंडेशन

  • Home
  • India
  • Chikhli
  • Sahakarya foundation - सहकार्य फाऊंडेशन

Sahakarya foundation - सहकार्य फाऊंडेशन this is an charitable fundation working in chikhli dist buldana

07/01/2026
06/01/2026

आज पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
खरंच, पत्रकार बांधवांचे कौतुक तेवढे केले तरी कमीच आहे. लोकशाहीतील तिसरा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व जबाबदारीची आहे.
आम्ही मित्रमंडळींनी सुमारे १० वर्षांपूर्वी सामाजिक कार्यात पुढाकार घेत ‘सहकार्य फाउंडेशन’ या नावाने मंडळाची स्थापना केली. आमच्या सामाजिक कार्याचा प्रवास महाराणा प्रताप विद्यालयातून सुरू झाला. त्या पहिल्याच कार्यक्रमाची सुरुवात पत्रकार बांधवांच्या हस्ते शालेय साहित्य वितरणाने झाली आणि तेथूनच प्रेरणादायी वाटचाल सुरू झाली.
यानंतर पर्यावरण जनजागृतीसाठी पुढाकार घेत इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. या उपक्रमांना विविध स्तरांवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले.
महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांपासून ते ABP माझाच्या माध्यमातून विदर्भातील सर्वोत्तम सामाजिक कार्य म्हणून मिळालेली दखल — या सर्व प्रवासामागे पत्रकार बांधवांचे मोलाचे योगदान आहे.
आमच्या प्रत्येक सामाजिक कार्याची वृत्तपत्रांतून सकारात्मक प्रसिद्धी देत, ‘सहकार्य’ला आपलेच मंडळ समजून पत्रकार बांधवांनी नेहमीच साथ दिली. हीच प्रेरणा आम्हाला अधिक जोमाने समाजसेवेच्या कार्यात पुढे जाण्यास बळ देते.
सर्व पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक आभार व पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏🖊️📸

21/10/2025

सर्व नागरिकांना
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔🌼

ही प्रकाशपर्वाची उत्सवमूर्ती
आपल्या जीवनात आनंद, समृद्धी, आरोग्य आणि सौहार्द घेऊन येवो.
एक पाऊल सहकार्याकडे टाकत
आपण सर्व मिळून उज्ज्वल भविष्य घडवूया! 💫

— सहकार्य फाउंडेशन
“एक पाऊल सहकार्याकडे...!”

सहकार्य गणेश मंडळ, चिखलीतर्फे मोफत मधुमेह तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न – ३०० रुग्णांची तपासणीचिखली (प्रतिनिधी) –सहकार्...
06/09/2025

सहकार्य गणेश मंडळ, चिखलीतर्फे मोफत मधुमेह तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न – ३०० रुग्णांची तपासणी

चिखली (प्रतिनिधी) –
सहकार्य गणेश मंडळ, चिखली हे सामाजिक बांधिलकी जपत गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबवत आहे. मागील १० वर्षांपासून मंडळ पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) गणपती मूर्तीची स्थापना करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहे. यावर्षी देखील पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली असून यासोबतच रक्तदान शिबिर तसेच वृक्षसंवर्धनासाठी १०१ वृक्षांचे वाटप करण्यात आले.

याच सामाजिक कार्याचा भाग म्हणून गुरुवार, दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी मोफत मधुमेह (डायबेटिस/शुगर) तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले व शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल ३०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

शिबिरात रुग्णांची ब्लड शुगर तपासणी करून त्यांच्या आजाराचे योग्य निदान करण्यात आले. तपासणीनंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी वैयक्तिक मार्गदर्शन करत आहार, व्यायाम, औषधोपचार व जीवनशैलीतील बदलांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच अनेक रुग्णांना ४ ते ५ दिवसांची औषधे मोफत वाटप करण्यात आली.

🔹 शिबिरात सहभागी तज्ज्ञ डॉक्टर

डॉ. दिपक खेडेकर,डॉ. अरुण कुटे,डॉ. चितरंजन रिंढे,डॉ. पंढरी इंगळे,डॉ. अजय अवचार,डॉ. ऋषीकेश डहाके,डॉ. विद्यमान कंकाळ

या सर्व डॉक्टरांनी मधुमेह नियंत्रणाबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत मंडळाचे कौतुक केले.

🔹 शिबिराला भेट देणारे मान्यवर
आमदार श्वेताताई महाले,माजी आमदार रेखाताई खेडेकर ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र ऋषीकेश जाधव, संजय चेके पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतीताई खेडेकर, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचे शासकीय जनसंपर्क अधिकारी निरज काकडे,शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप, पत्रकार प्रकाश मेहेत्रे, पत्रकार सुधीर चेके पाटील, पत्रकार उद्धव थुट्टे पाटील, भाजपा शहरप्रमुख सागर पुरोहित, शैलेश बाहेती, मनोज खेडेकर, बंटी कपूर, विजय वाळेकर, बाळुभाऊ लहाने, केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील तायडे, विनोद नागवाणी, सुनील पारसकर, बद्री पानगोळे आदी मान्यवरांनी शिबिरास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

🔹 शिबिर यशस्वी करण्यासाठी
मंडळाचे अध्यक्ष हर्षल अग्रवाल इंजी. नितीन वराडे, सुचित भराड, श्रीकांत सोळंकी, वचन वायकोस, चेतन नागवाणी, अमोल इंगळे, जयेश बेलोकार, नितीन जांगिड, आशिष गोलाणी,प्रसाद सोळंकी, प्रणव कोठारी,पंकज सोळंकी, प्रणव गाडेकर, कृष्णा नागरे, अभिषेक काकडे, पवन देशमुख, कुणाल म्हस्के यांनी परिश्रम घेतले.
तसेच सदस्य गोपाल पाटील, सागर भोलाने, जयंत चव्हाण, निखिल खरपास, श्रेयश हरलालका यांनी सहकार्य केले.

सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य, पर्यावरण व समाजहितासाठी सहकार्य गणेश मंडळाने राबवलेले हे उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व समाजोपयोगी ठरले.

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद... सहकार्य गणेश मंडळाच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर हिंदुसुर्य महाराणा प्रताप ...
29/08/2025

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद...

सहकार्य गणेश मंडळाच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर हिंदुसुर्य महाराणा प्रताप पुतळा डि पी रोड चिखली येथे यशस्वीपणे पार पडले.
यावेळी चिखली तालुका तहसीलदार श्री संतोष काकडे साहेब, ठाणेदार श्री संग्राम पाटील साहेब, श्री वायाळ सर ,श्री सचिन बोंद्रे व इतर मान्यवरांनी भेट दिली.
या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले. रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

या विधायक उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे व रक्तदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार...!

भव्य रक्तदान शिबीर!  रक्तदान हेच जीवन दान!!रक्त दानासाठी जनजागृती करूया तसेच गरजूंना वेळेवर रक्त मिळेल याची काळजी घेऊ या...
27/08/2025

भव्य रक्तदान शिबीर!

रक्तदान हेच जीवन दान!!
रक्त दानासाठी जनजागृती करूया तसेच गरजूंना वेळेवर रक्त मिळेल याची काळजी घेऊ या.

27/08/2025
सहकार्य गणेश मंडळ,  "उत्कृष्ट मंडळ –  हा मानाचा पुरस्कार जिल्हा पोलिस अधीक्षक मा. निलेश तांबे साहेब यांच्या हस्ते प्रदान...
22/08/2025

सहकार्य गणेश मंडळ, "उत्कृष्ट मंडळ – हा मानाचा पुरस्कार जिल्हा पोलिस अधीक्षक मा. निलेश तांबे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 🙏🎉

👉 हा सन्मान २०२४ या वर्षातील शिस्तबद्ध कार्यप्रणाली, सामाजिक उपक्रम आणि जनजागृतीसाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे.

🚩 गणपती बाप्पा मोरया 🚩

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करन्यात आले...गोरगरिब, गरजू विद्यार्थ्यांकरिता सहकार्य फाउंडेशनचा आधार शालेय साहित...
12/08/2025

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करन्यात आले...

गोरगरिब, गरजू विद्यार्थ्यांकरिता सहकार्य फाउंडेशनचा आधार
शालेय साहित्य वाटप करून जपली माणूसकी....
चिखली : शहरात सहकार्य फाउंडेशन मागील 10 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहत विशेषतः गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवून त्यांचा शैक्षणिक प्रवास सुलभ करण्याचे कार्य अविरतपणे पार पाडत आहे. समाजातील गोरगरिब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य घेणे परिस्थितीअभावी आजदेखील जिकरीचे ठरत असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीची जाणीव ठेवत सहकार्य फाऊंडेशन अनेक वर्षांपासून अशा गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ता. 8 ऑगस्ट रोजी स्थानिक नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक, चिखली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन चिखली पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अर्जुनराव इंगळे, मुख्य लेखापाल तुळशीदासजी बनसोडे व प्राचार्य सुरेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सहकार्य फाउंडेशनचे सदस्य नितीन वराडे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात अर्जुनराव इंगळे यांनी सहकार्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, फाउंडेशनला गरज भासल्यास नगरपरिषद प्रशासन सदैव मदतीस तयार आहे, असे आश्वासन दिले. आभार प्रदर्शन हुशे सर यांनी केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक ढंगारी सर, जाधव सर तसेच सहकार्य फाउंडेशनचे सुचित भराड, श्रीकांत सोळंकी, नितीन जांगिड, आशिष गोलाणी, सागर भोलाने, चेतन नागवाणी, वैभव हाके, संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

30/07/2025

Celebrating my 11th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

15/09/2024

चिखली नगरीचे आराध्यदैवत श्री रेणुकामातेच्या उत्सवादरम्यान हजारो वर्षांपासून सुरू असलेली सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न यावर्षीदेखील सहकार्य गणेश मंडळाने वगदीचे सारथ्य करणार्‍या इको फ्रेण्डली गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. या देखाव्याच्या माध्यमातून शहरासह संपूर्ण विदर्भाचे आराध्यस्थान असलेल्या श्री रेणुकामातेची एक सांस्कृतिक उत्सवाची परंपरा पुढे आणण्याचा प्रयत्न मंडळाचा असून दरवर्षी नवनवीन देखावे सादर करीत सहकार्य गणेश मंडळाने आपली परंपरा राखली आहे.

यावर्षी तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तीमध्ये संपूर्ण लाकूड, सुती दोरीचा उपयोग करीत गणेशमूर्तीची साकारण्यात आली असून संपूर्णपणे इको फ्रेण्डली गणेशमूर्ती साकारण्याचा संकल्प गणेश मंडळाने जपला आहे.

Address

Kalanath Agencies Near Bus Stand
Chikhli
443201

Telephone

+919881220137

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahakarya foundation - सहकार्य फाऊंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sahakarya foundation - सहकार्य फाऊंडेशन:

Share