Cdcda (Chandrapur Chemist & Drugist Asociation)

Cdcda (Chandrapur Chemist & Drugist Asociation) welcome to all CDCDA MEMBERS & WELLWISHERS ,share ur opinion ,sugetion & experience .....welcome

💊 स्वस्त डिस्काउंटच्या मोहात पडू नका… सावध राहा ! ⚠️आजकाल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर औषधांवर मोठे डिस्काउंट दाखवून ग्राहकांना आ...
27/05/2026

💊 स्वस्त डिस्काउंटच्या मोहात पडू नका… सावध राहा ! ⚠️
आजकाल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर औषधांवर मोठे डिस्काउंट दाखवून ग्राहकांना आकर्षित केले जाते. पण या स्वस्त दरांच्या मागे नकली, मुदतबाह्य किंवा चुकीची औषधे मिळण्याचा मोठा धोका असू शकतो.
❌ नकली औषधांमुळे — ▪️ आजार बरा न होणे
▪️ गंभीर दुष्परिणाम होणे
▪️ जीवाला धोका निर्माण होणे
▪️ चुकीचे औषध मिळण्याची शक्यता
👨‍⚕️ आपल्या परिसरातील नोंदणीकृत आणि विश्वासू मेडिकल स्टोअरमधूनच औषधे खरेदी करा.
फार्मासिस्टचा सल्ला, योग्य बिल आणि औषधांची खात्री हीच आपल्या आरोग्याची खरी सुरक्षा आहे.
🙏 आरोग्याशी तडजोड करू नका…
“स्वस्त” पेक्षा “सुरक्षित” औषधांना प्राधान्य द्या.


💐 फार्मासिस्ट सुरक्षा कवच योजनेच्या शुभारंभ प्रसंगी… 💐22 मे 2026 हा दिवस हा केवळ एका योजनेचा शुभारंभ नसून, महाराष्ट्राती...
23/05/2026

💐 फार्मासिस्ट सुरक्षा कवच योजनेच्या शुभारंभ प्रसंगी… 💐
22 मे 2026 हा दिवस हा केवळ एका योजनेचा शुभारंभ नसून, महाराष्ट्रातील प्रत्येक नोंदणीकृत फार्मासिस्ट आणि त्यांच्या कुटुंबाला दिलेला विश्वास, सुरक्षितता आणि आधाराचा शब्द आहे.
फार्मासिस्ट हा समाजाच्या आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अनेकदा स्वतःच्या सुख-दुःखापेक्षा रुग्णसेवा आणि समाजहिताला प्राधान्य देत तो निरंतर कार्यरत असतो. मात्र, एखाद्या अनपेक्षित अपघातामुळे कुटुंबावर संकट कोसळल्यास, त्या कठीण प्रसंगी आर्थिक आधार देणारा हातही तितकाच आवश्यक असतो.
“फार्मासिस्ट सुरक्षा कवच योजना” ही अशाच संवेदनशील विचारातून साकारलेली योजना आहे. अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला ₹५ लाखांचे आर्थिक सहाय्य देऊन, दुःख कमी करता येणार नाही, पण त्या कुटुंबाला पुन्हा उभे राहण्यासाठी आधार आणि बळ निश्चितच देता येईल — हाच या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.
ही योजना केवळ आर्थिक मदत नाही… तर प्रत्येक फार्मासिस्टला दिलेली एक ठाम खात्री आहे —
👉 “तुम्ही समाजाच्या आरोग्यासाठी उभे राहिलात, आता समाज आणि परिषद तुमच्या कुटुंबासाठी उभी राहील.”
या ऐतिहासिक आणि मानवतावादी उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र फार्मासिस्टने या सुरक्षा कवच योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन.
✅ फार्मासिस्ट सुरक्षित… तर कुटुंब सुरक्षित… आणि कुटुंब सुरक्षित तर समाज अधिक सक्षम.

21/05/2026

20 मे 2026
ऑनलाईन औषध विक्री व GSR 817/220 विरोधात ब्रह्मपुरी येथे केमिस्ट बांधवांचा मूक मोर्चा व बंद यशस्वी
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD) व महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (MSCDA) यांच्या आवाहनानुसार बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला ब्रह्मपुरी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ब्रह्मपुरी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे तालुका अध्यक्ष मा. सुरेशजी अतवार यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी शहरातील औषध विक्रेत्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी ऑनलाईन औषध विक्री, GSR 817/220 तसेच औषध व्यवसायासमोरील विविध समस्यांविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने केमिस्ट बांधव सहभागी झाले होते.
मोर्चाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून घेत ऑनलाईन औषध विक्रीमुळे सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ होण्याची शक्यता तसेच पारंपरिक औषध विक्रेत्यांवर होणारा परिणाम याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच जनतेमध्ये औषध विषयक ऑनलाईन विक्रीविरोधात जनजागृती करण्याकरिता पत्रके वाटण्यात आली व सामान्य नागरिकांना औषधांविषयी आवश्यक माहिती देण्यात आली.
ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व केमिस्ट सभासदांनी बंदला एकजुटीने दिलेला पाठिंबा व सहभाग उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

21/05/2026

➤ औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद; चंद्रपूरातील औषध विक्रेत्यांचा बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

21/05/2026

दि. 20/05/2026 रोजीच्या अखिल भारतीय औषधी विक्रेता बंदला बल्लारपूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD), महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (MSCDA) तसेच चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (CDCDA) यांच्या निर्देशानुसार बुधवार दि. 20/05/2026 रोजी पुकारण्यात आलेल्या अखिल भारतीय औषधी विक्रेता बंदला बल्लारपूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बल्लारपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे स्वीकृत सदस्य श्री. प्रतीकजी चौकसे व बल्लारपूर तालुका अध्यक्ष श्री. निशिकांतजी खैरे यांच्या नेतृत्वात स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर ऑनलाइन औषध विक्री बंद करण्यात यावी तसेच कॉर्पोरेट्समार्फत दिल्या जाणाऱ्या अव्यावसायिक डिस्काउंटला आळा घालण्यात यावा या मागण्यांसाठी मूक मोर्चा व शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या समर्थनार्थ बल्लारपूर तालुक्यातील मेडिकल दुकाने 100% बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.
यावेळी तालुका सचिव श्री. ब्रिजेश उके, श्री. छोटू साठे, श्री. कैलाशभाऊ खंडेलवाल, श्री. राजेशभाऊ तुंडूरवार, श्री. रवीभाऊ जैस्वाल, श्री. सुरेशभाऊ भगत, श्री. प्रमोदभाऊ मुरकुटे, श्री. राजु मुंदडा, श्री. महेंद्र कांबळे, श्री. प्रशांत ढाले, श्री. सुमित चोप्रा, श्री. अमरदीप भगत, श्री. शालिक डमबारे, श्री. अश्विन खंडेलवाल, श्री. मनीष मालू, श्री. अजय गुप्ता, श्री. गौरव अटल, श्री. प्रदीप खैरे, श्री. सचिन वाघमारे, श्री. अंकित जगताप, श्री. अर्शद खान, श्री. संजय तंगडपल्लीवार, श्री. प्रशांत तंगडपल्लीवार, श्री. मोहन मंतापुरी, श्री. दर्शन करमणकर तसेच न्यूलक्की मेडिकल, लिशिका मेडिकलचे प्रतिनिधी, श्री. शरद कांबळे, श्री. प्रशांत बंडीवार, श्री. मिहीर गुप्ता व मोठ्या संख्येने केमिस्ट बांधव उपस्थित होते.
या आंदोलनातून बल्लारपूर तालुक्यातील केमिस्ट बांधवांची एकजूट व संघटनेवरील विश्वास पुन्हा अधोरेखित झाला.
बल्लारपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन

21/05/2026

AIOCD, MSCDA तसेच CDCDA च्या निर्देशानुसार दि. 20/05/2026 रोजी पुकारलेल्या एकदिवसीय बंदला राजुरा शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD), महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (MSCDA) तसेच चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (CDCDA) यांच्या निर्देशानुसार बुधवार दि. 20/05/2026 रोजी पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय बंदला राजुरा तालुक्यातील सर्व केमिस्ट व ड्रगिस्ट बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंद यशस्वी केला.
सदर आंदोलन जिल्हा संघटन सचिव श्री. प्रशांतजी गोठी व राजुरा तालुकाध्यक्ष श्री. कैलासजी रेगुंडवार यांच्या नेतृत्वात पार पडले. राजुरा येथील स्थानिक नगरपालिका परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ऑनलाइन औषध विक्री विरोधात शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात आले.
या बंद दरम्यान तालुक्यातील 100% मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली व आपल्या मागण्या शासन दरबारी प्रभावीपणे पोहोचविण्यात आल्या. तसेच रुग्णांना आपत्कालीन सेवेमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी स्वयंस्फूर्तीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली. या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्व सभासदांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
या आंदोलनातून केमिस्ट बांधवांची मजबूत एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
राजुरा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन
केमिस्ट एकता जिंदाबाद !

21/05/2026

Address

Chandrapur
442403

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cdcda (Chandrapur Chemist & Drugist Asociation) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share