Eco-Pro Chandrapur

Eco-Pro Chandrapur an institution morally sincerely addicted to serve the mankind nature and in turn Environment.

इको-प्रो चे संस्थापक तथा अध्यक्षबंडू धोतरे, राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी, भारत सरकार यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा...
09/09/2024

इको-प्रो चे संस्थापक तथा अध्यक्ष
बंडू धोतरे, राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी, भारत सरकार यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा...! 💐💐
Bandu Dhotre Bandu Dhotre

'वृक्षरक्षाबंधन' कार्यक्रम म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी लढण्याची प्रेरणाइको-प्रो तर्फे लोहारा-मामला जंगलातील अदानी गो बॅक ...
28/08/2024

'वृक्षरक्षाबंधन' कार्यक्रम म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी लढण्याची प्रेरणा
इको-प्रो तर्फे लोहारा-मामला जंगलातील अदानी गो बॅक आंदोलनाचे प्रतिक वृक्षांना बांधल्या राख्या
१६ वर्ष पूर्वीच्या जंगलाच्या संरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाला उजाळा
पर्यावरण रक्षणासाठी युवकांचा पुढाकार महत्वाचा - बंडू धोतरे

चंद्रपूर: इको-प्रो तर्फे लोहारा-मामला जंगलातील वृक्षांना राखी बांधुन, युवकांनी वन-वन्यजीव तसेच पर्यावरणाच्या संरक्षणसाठी सदैव तत्पर राहावे, पर्यावरण संरक्षणाकरिता कटिबध्द राहावे असा संदेश कार्यक्रमातुन मान्यवरांनी दिला. आज लोहारा-मामला वनक्षेत्रातील 'अदानी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक असलेल्या वृक्षांना राखी बांधुन वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध महाविद्यालय एकत्रीत येत आयोजन करण्यात आले. यामध्ये एफईएस गर्ल्स महाविदयालय, सरदार पटेल महाविद्यालय, खत्री महाविद्यालय सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन शिंदे, विभागीय वन अधिकारी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, बापू येडे, उपसंचालक, सामाजिक वनीकरण, सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार, इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी उपस्थित विद्यार्थाना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डाॅ. राजेंद्र बारसागडे, प्रा. डाॅ. मेघमाला मेश्राम, डॉ कुलदीप गोंड, प्रा डॉ निखिल देशमुख, प्रा डॉ संतोष कावरे, प्रा रवी कावळे, प्रा डॉ माधव गुरनुले उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हा असुन ‘वाघांचा जिल्हा’ ही नवी ओळख निर्माण झालेली आहे. या जिल्हयात वन-वन्यजिव या नैसर्गिक संपेदसह मोठया प्रमाणात खनिज संपत्ती सुध्दा आहे. जंगलाखाली असलेल्या कोळसामुळे येथील वन्यजीव समृध्द जंगलावर कोळसा खान प्रकल्पाचे संकट नेहमीच उभे राहते. आणी प्रश्न उभा राहतो तो येथील पर्यावरणाचा, प्रदूषणाचा, वाघासह अन्य वन्यप्राण्यांचा अधिवासाचा, त्यांच्या भ्रमणमार्गाचा, अपुऱ्या अधिवासामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढीचा म्हणुन येथील वन-वन्यजिवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी चंद्रपूरकर नागरीकांना सदैव तत्पर राहीले पाहीजे. इको-प्रो सह अनेक पर्यावरणवादी संस्था-संघटनाच्या तसेच चंद्रपूरकरांच्या जनआंदोलनामुळे प्रस्तावीत अदानी कोळसा खानीचा प्रस्ताव नाकारला गेला होता. या आंदोलनाच्या स्मृती जपत, आपला नैसर्गीक वारसा पुढील पिढीला सुस्थितीत हस्तांतरण करता यावे, याची जाणीवजागृती सर्व घटकामध्ये यावी याकरिता दरवर्षी ‘इतिहासात डोकावुन, भविष्यातील पर्यावरणाची सुरक्षीतता करीता लढण्यास बळ मिळावे’ हा उद्देश लक्षात घेउन इको-प्रो संस्थेच्या वतीने मागील 16 वर्ष पासुन लोहारा-मामला जंगलातील ‘अदाणी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक असलेल्या वृक्षास राखी बांधुन चंद्रपूर शहरात वन-वन्यजीव व पर्यावरण रक्षणासाठी 2009 साली प्रस्तावीत अदाणी कोळसा खाणीच्या विरोधात झालेल्या जन-आंदोलनाच्या स्मृतीना उजाळा दिला जातो.

या कार्यक्रमा दरम्यान लोहारा-मामला रोडवरील वनक्षेत्रातील ‘अदाणी गो बॅक’ आदोलनाचे प्रतीक असलेल्या वृक्षास राखी बांधण्यात आली. निसर्गाचे रक्षण करण्यास वनविभागासोबतच सामान्य नागरीक व गावकरी यांचे सुध्दा सहकार्य अपेक्षीत असुन आपल्या अवतीभवतीचे पर्यावरण व जैवविवीधतेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहीजे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करीत स्मृतीना उजाळा दिला. विविध महाविद्यालयाचे विद्यार्थ्यासह वनपाल उत्तम गाठले, वनरक्षक स्मिता पाटील, रीना उईके, इको-प्रो भद्रावती चे संदीप जीवने, संतोष रामटेके, किशोर खंडाळकर, अमोल दौलतकर, इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके, अब्दुल जावेद, राजू काहिलकर, सुनील लिपटे, योजना धोतरे, सनी दुर्गे, सचिन धोतरे, रुद्राक्ष धोतरे, चित्राक्ष धोतरे आदी उपस्थित होते.

----------------------------------------------------------
आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत इको-प्रो तर्फे भद्रावती येथील इको-प्रो चे जेष्ठ सदस्य किशोर खंडाळकर यांना उपस्थित मान्यवर विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे, बापू येडे यांचे हस्ते वन्यजीव संरक्षण विभाग च्या 'जीवरक्षा' संदर्भात केलेल्या उल्लेखनिय कार्यासाठी 'इको-प्रो कार्यकर्ता सन्मान' पुरस्कार देण्यात आला. नुकतेच खंडाळकर यांनी 45 फूट उंचीवर हायमास्ट लाईटला पतंग धागा मध्ये अडकलेल्या पक्षाची सुखरूप सुटका केली होती.

इको-प्रो चे जेष्ठ सदस्य 'संदीपभाऊ जेऊरकर' यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा...! 💐💐Sandeep Jeurkar
17/08/2024

इको-प्रो चे जेष्ठ सदस्य 'संदीपभाऊ जेऊरकर' यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा...! 💐💐
Sandeep Jeurkar

स्व. नितीनभाऊ बुरडकर यांच्या जन्मदिनीमित्त विनम्र अभिवादन..."नितिनभाऊ तू नेहमीच आमच्या मनात, इको-प्रोच्या चळवळीत कायम जी...
24/07/2024

स्व. नितीनभाऊ बुरडकर यांच्या जन्मदिनीमित्त विनम्र अभिवादन...

"नितिनभाऊ तू नेहमीच आमच्या मनात, इको-प्रोच्या चळवळीत कायम जीवंत राहशील आणी आम्हा सर्वाना ऊर्जा देत राहशील, प्रोत्साहित करीत राहशील..."

संस्थेच्या विविध उपक्रम, अभियान, आंदोलन यात प्रमुख भूमिका असल्याने मागील दशकभर अधिक काळ त्यांचा विशिष्ट स्वभाव गुनामुळे त्याने सर्व कार्यकर्त्यांना आपलेसे केले होते. वयाने लहान असो की मोठे त्याचा एक वेगळेपण असल्याने सर्वासोबत एक भावनिक नाते निर्माण केले होते... आजही असा एकहि दिवस जात नसतो कि जेव्हा प्रत्येक सद्स्याला त्याची आठवण येत नसेल. 2021 कोरोना आपदा दरम्यान नितिनभाऊ कोरोना बाधित झाले, आणि या कोरोनाशी संघर्ष करताना अपयशी ठरले आणि इको-प्रो चळवळीचा पर्यावरण, वन-वन्यजीव क्षेत्रातील एक खंदा कार्यकर्ता आम्ही गमावला...कधीही भरून न निघणारे नुकसान झाले.

इको-प्रो च्या वतीने विनम्र अभिवादन..!

दैनिक देशोन्नती वृत्तपत्रात दर बुधवारी "इको हेल्थ" या सदरात प्रकाशित आजचा लेख'माझे आरोग्य, माझा हक्क' - निसर्गपुरक जीवनश...
10/04/2024

दैनिक देशोन्नती वृत्तपत्रात दर बुधवारी "इको हेल्थ" या सदरात प्रकाशित आजचा लेख
'माझे आरोग्य, माझा हक्क' - निसर्गपुरक जीवनशैलीची गरज

"निरोगी आरोग्य आणि शाश्वत विकासासाठी जंगल, जल आणि जमीन यांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपले आरोग्य निरोगी राखण्यास आणि भावी पिढी या आरोग्यवर्धक निसर्गात मोकळा श्वास घेऊ शकेल."

बंडू धोतरे,
इको-प्रो संस्था, चंद्रपूर
9370320746
[email protected]

दैनिक देशोन्नती मध्ये दर बुधवार ला *"इको हेल्थ"* या सदर मध्ये माझा लेख प्रकाशित होत असतो. आज प्रकाशित झालेला लेख*निसर्ग-...
27/03/2024

दैनिक देशोन्नती मध्ये दर बुधवार ला *"इको हेल्थ"* या सदर मध्ये माझा लेख प्रकाशित होत असतो. आज प्रकाशित झालेला लेख
*निसर्ग-पर्यावरण ऱ्हासातून होणारा विकास काय कामाचा?*

"...आपण सारे निसर्गाकडे परतू या, निसर्ग नियमाचे पालन करूया, ऋतुचर्या समजून घेत त्यानुसार आहार-विहार, खानपानात बदल करून निसर्गानुरूप आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारू जेणेकरून, आपण स्वतः निरोगी राहु आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सुद्धा निरोगी ठेवू शकू. पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण, आजार यामुळे मानव सुद्धा सुखी राहू शकणार नाही, त्यामुळे पर्यावरण नाशातून होणारा विकास काय कामाचा?"

बंडू धोतरे, इको-प्रो

दैनिक देशोन्नती वृत्तपत्र मध्ये, बंडू धोतरे यांचे इको हेल्थ नावाचे सदर सुरू झाले आहे.यामध्ये 'आपले आरोग्य, आपल्या हाती' ...
20/03/2024

दैनिक देशोन्नती वृत्तपत्र मध्ये, बंडू धोतरे यांचे इको हेल्थ नावाचे सदर सुरू झाले आहे.

यामध्ये 'आपले आरोग्य, आपल्या हाती' कसे आहे, आपली भारतीय 'आरोग्य संस्कृती' कशी 'निसर्गपुरक-पर्यावरणपूरक' आहे, आपली दिनचर्या 'पंचमहाभूत' याला धरून कशी योग्य ठेवली पाहिजे, जेणेकरून आपली दिनचर्या, ऋतूचर्या यांचे नियमन करून आपले 'आहार-विहार' यात संतुलन राखले तर निरोगी जीवन जगणे सहज शक्य आहे.

यावर लिहण्याची संधी या निमित्ताने दैनिक देशोन्नती ने 'इको-हेल्थ' सदर मध्ये बंडू धोतरे यांचे आरोग्य व पर्यावरण विषयी विचार वाचू शकता...

बंडू धोतरे, चंद्रपूर

वन्यजीव सप्ताह : बल्लारपूर वनपरीक्षेत्र"गुराखी संवाद कार्यक्रम"मानव वन्यप्राणी संघर्ष आणि जंगलात जाणारे गुराखी यांच्यावर...
08/10/2023

वन्यजीव सप्ताह : बल्लारपूर वनपरीक्षेत्र
"गुराखी संवाद कार्यक्रम"
मानव वन्यप्राणी संघर्ष आणि जंगलात जाणारे गुराखी यांच्यावरील हल्ले यात होणारे मृत्यू यावर उपाययोजना म्हणून आयोजित या कार्यक्रमात गुराखी बांधव आणि गावकरी यांना इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी मार्गदर्शन केले...

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, सरपंच, JFM समिती अध्यक्ष-सदस्य, वनकर्मचारी उपस्थित होते..

वन्यजीव सप्ताह : सरदार पटेल महाविद्यालय व इको-प्रो संस्था संयुक्त आयोजनउपस्थिती : प्राचार्य डॉ काटकर सर, DFO TATR श्री स...
08/10/2023

वन्यजीव सप्ताह : सरदार पटेल महाविद्यालय व इको-प्रो संस्था संयुक्त आयोजन
उपस्थिती : प्राचार्य डॉ काटकर सर, DFO TATR श्री सचिन शिंदे, उप प्राचार्य डॉ माधमशेट्टीवार सर, डॉ कुलकर्णी मॅडम
यावेळी वन्यजीव विषयक अनेक बाबीवर मार्गदर्शन करण्यात आले...
छायाचित्र स्पर्धा करिता वन्यजीव छायाचित्रकार कमलेश ठाकूर तर पोस्टर स्पर्धा करिता चित्रकार-शिक्षक किरण पराते व चित्रकार शिक्षक कत्रोजवर सर यांनी परीक्षण केले.

नागोबा ते वाघोबा निसर्गरक्षणाची चळवळबंडू धोत्रेमाझी सैन्यात जाण्याची तीव्र इच्छा होती. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू झ...
24/08/2023

नागोबा ते वाघोबा निसर्गरक्षणाची चळवळ

बंडू धोत्रे

माझी सैन्यात जाण्याची तीव्र इच्छा होती. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू झालेले प्रयत्न शालेय जीवनापासून पदवीच्या अंतिम वर्षापर्यंत सुरूच होते. शालेय जीवनात दूरदर्शनवरील ‘परमवीर चक्र’ मालिकेतून प्रेरणा घेत सैन्यात जाण्याचे स्वप्न बघितले; मात्र काही कारणांमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. यातच पदवीची अंतिम वर्षाची परीक्षा दिली नाही. डिप्रेशनमध्ये होतो. ........

महाविद्यालयात ‘एनएसीसी’मध्ये गिरविलेल्या धड्यातून विकसित झालेले नेतृत्वगुण, अनुशासन, संघटन यामुळे देशसेवा आणि कर्तव्याची जाणीव झाल्याने अवतीभवतीचा निसर्ग, पर्यावरण, वन-वन्यजीव यांचे संरक्षणसुद्धा महत्त्वाचे आहे. यासाठी एकत्र येत सामूहिकरीत्या संरक्षण-संवर्धनाची आवश्यकता असल्याची जाणीव झाली होती. चंद्रपूर वन-वन्यजीव आणि निसर्गामुळे संपन्न आहेच; मात्र याविषयी अनेक प्रश्न असल्याची जाणीव होती. याबाबत आपण काय व कसे कार्य करू शकतो, याकरिता इको-प्रो संस्थेची स्थापना केली. समविचारी तरुणांना सोबत घेतले. युवा कार्यकर्त्यांची चळवळ सुरू झाली. यातून देशसेवा करण्याचे समाधान मिळू लागले.
एकदा माझ्या घरालगत साप निघाला. यावेळी उडालेली तारांबळ, भीती-अंधश्रद्धा, मारणे की वाचविण्याचा पर्याय, साप पकडण्यास आलेला व्यक्ती, त्याकरिता मागितलेले पैसे, साप पकडणे साहसिक कार्य या एका घटनेने सापाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

चंद्रपूर शहर वनालगत आहे. शहरात सापाचे प्रमाण अधिक. २००४-०५ दरम्यान शहरात, घर परिसरात निघणारे साप आणि त्यापासून असलेली भीती आणि भीतीपोटी मारले जाणारे साप, सर्पदंश विषय होताच. निसर्गातील एक महत्त्वाचा घटक त्याविषयी असलेली अंधश्रद्धा, यातूनच साप मारले जात असत. साप पकडण्याकरिता काही जण शुल्क घेत. विशेषत: साप सर्वसाधारण घरांच्या परिसरात निघत असल्याने त्याचे शुल्क देणे परवडत नव्हते. त्यामुळे साप मारला जाई, सोबत सापाविषयी अंधश्रद्धा आणि भीती कायम राहायची. यासाठी पर्यावरणाचा एक घटक वाचविता यावा, नागरिकांची भीती दूर करता यावी, अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून एक सर्पमित्र म्हणून या कार्याची सुरुवात केली. त्यावेळेस निशुल्क आणि अगदी वेळेवर पोहोचणारा सर्पमित्र म्हणून अल्पावधित नावारूपास आल्याने दिवस-रात्र कॉल असायचे. शहरात आणि शहराबाहेरसुद्धा. सर्व कॉल अटेंड करणे शक्य नव्हते. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी सर्पमित्र तयार केले. २००६ मध्ये प्रत्येक वॉर्डात इच्छुक युवकांसाठी सर्पमित्र प्रशिक्षण कार्यशाळा घेतली.
यातून सर्पमित्र चळवळ शहरात व्यापक झाली. सोबतच इको-प्रोच्या पर्यावरण चळवळीची सुरुवातसुद्धा झाली. रोज पकडलेले साप वनविभागच्या उपस्थितीत नोंदणी करून सोडले जायचे.
कधी चितळ-हरीण, रानगवा, अस्वल, मोर, खवले मांजर, उदमांजर यासोबतच पुढे वाघ-बिबट, मगर आदी प्राणी रेस्क्यू करीत सेवा देऊ लागलो. वन-वन्यजीव संरक्षण-संवर्धनासोबतच वनविभागाचे कार्य शासनाचे धोरण, सभोवतालचे पर्यावरण याविषयी कळू लागले. एकंदरीत पर्यावरण मानवाच्या कल्याणाकरिता किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव झाली. या कर्तव्यात जंगल, तलाव, नद्या, वन्यजीवाशिवाय नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण, सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबद्दल सहानभूती बाळगणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

वन्यप्राणी जीवन समजावे, निसर्ग समजावा, जंगल-अधिवास समजून घेता यावे, त्याचे पर्यावरणातील महत्त्व समजावे यासाठी सोबत आलेले इको-प्रोचे युवा कार्यकर्ते सोबत जंगल भ्रमंती यातून जंगलवाचन जाणून घेण्याचा नवा अध्याय २००७ पासून सुरू झाला. निसर्गात जल-जंगल-जमीन-जन याविषयी कार्य करताना ‘वाघ’ किती महत्त्वाचा आहे आहे, हे समजू लागले. संपूर्ण निसर्ग संरक्षणकरिता म्हणजेच जैविविधितता संरक्षण-संवर्धनाकरिता जंगलाचे महत्त्व आहे. जंगल नद्याची ‘आई’ असते. म्हणून जंगल वाचविणे गरजेचे आहे. त्यासाठी वाघाचे संरक्षण महत्त्वाचे ठरते. एकंदरीत जैव विविधता संरक्षणकरिता ‘वाघ वाचवा’ असे म्हटले जाते. जंगलाचे संरक्षण करायचे असेल तर वाघ वाचला पाहिजे, वाघ टिकला पाहिजे. वाघ आणि वाघ अधिवास संरक्षण-संवर्धन कसे करता येईल, यासाठी ही चळवळ अधिक व्यापक होत गेली. म्हणजेच हा प्रवास ‘नागोबा ते वाघोबा’ असा होत गेला.

अध्यक्ष, इको प्रो संस्था, चंद्रपूर
मो. ९३७०३२०७४६

Address

Near Ramala Lake
Chandrapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Eco-Pro Chandrapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share