Deore Healthcare Foundation

Deore Healthcare Foundation ~ Dedicated to Society
~ Working on Healthcare,Education&Women Empowerment
~ Social development

उष्माघात टाळा🌞उष्माघात होऊ नये यासाठी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.काळजी घ्या, सुरक्षित रहा ! #सूचना_पाळा_उष्...
09/04/2025

उष्माघात टाळा🌞

उष्माघात होऊ नये यासाठी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

काळजी घ्या, सुरक्षित रहा !

#सूचना_पाळा_उष्माघात_टाळा
#उष्णता
#तापमान
#देवरे_हेल्थकेअर_फाऊंडेशन

देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन, दहिवद या संस्थेला आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट सामाजिक कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात...
25/10/2024

देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन, दहिवद या संस्थेला आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट सामाजिक कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले 💐💐🏆🏆

संदीप फाऊंडेशन मुंबई,कमलिनी वाणी व शारदा नेत्रालय,धुळे आयोजित गौरव 2024 या कार्यक्रमात देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन,दहिवद या संस्थेला आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट सामाजिक कामगिरीबद्दल संदीप फाऊंडेशन मुंबई च्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन, दहिवद गावात व परिसरात मोतीबिंदू शिबीर, सामाजिक, सांस्कृतिक,आरोग्य,शैक्षणिक,महिला व बालविकास अशा विविध क्षेत्रात कार्य करत असते. यावेळी संस्थेचे सह संस्थापक अध्यक्ष डॉ.नितिन देवरे यांनी हा सन्मान स्वीकार केला.






भव्य डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू (लेन्सचे)मोफत शस्त्रक्रिया शिबाराचे विविध वर्तमान पत्रात प्रकाशित झालेले वृत्त... #नेत...
16/10/2024

भव्य डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू (लेन्सचे)मोफत शस्त्रक्रिया शिबाराचे विविध वर्तमान पत्रात प्रकाशित झालेले वृत्त...

#नेत्र_तपासणी
#मोतीबिंदू_लेन्सचे_शस्त्रक्रिया
#शिबिर
#देवरे_हेल्थकेअर_फाऊंडेशन
#दैनिक_लोकमत
#दैनिक_नवराष्ट्र

दहिवद येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न ;देवरे हेल्थकेअर फाऊंडेशनचा उपक्रमदि. 02/09/2024 / बुधवारमहात्मा गांधी जयंती व...
02/10/2024

दहिवद येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न ;

देवरे हेल्थकेअर फाऊंडेशनचा उपक्रम

दि. 02/09/2024 / बुधवार

महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने
देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन,दहिवद तसेच कमलिनी वाणी हॉस्पिटल अंतर्गत शारदा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने,
गरीब व गरजू रुग्णांसाठी भव्य डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू (लेन्सचे)मोफत शस्त्रक्रिया शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी धुळे येथील शारदा नेत्रालय चे सर्व डॉक्टरांची टीम सर्व यंत्रणेसह हजर होती.
सामाजिक बांधिलकी जपून देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन तर्फे दहिवद गावातील व परिसरातील गरीब व गरजु लोकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी दहिवद येथील तलाठी श्री.विशालजी सोनार कार्यक्रमास अध्यक्षस्थानी उपस्थित होते.शिबिराची सुरुवात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन फाउंडेशनचे मार्गदर्शक श्री.अशोक देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच या कार्यक्रमास्थळी देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन चे अध्यक्ष मयुर देवरे व डॉ.नितीन देवरे उपस्थित होते. या शिबिराच्या आयोजनासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी प्रतीक भोसले,दिनेश देवरे,समाधान वाघ,दिनेश वाघ,मीनाताई देवरे व रुपाली देवरे यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

शिबिरामध्ये १८४ रुग्णांची तपासणी तसेच गरजूंना मोफत औषधी वाटप करण्यात आली त्यापैकी ७१ रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी धुळे येथे शारदा नेत्रालयात विविध तपासण्या व शस्त्रक्रिया नियोजित तारखेनुसार मोफत केले जाणार आहेत.

या शिबिर साठी शारदा नेत्रालय धुळे येथून नेत्रतज्ञ डॉ.योगिनी पाटील,डॉ.प्रियंका वर्मा,डॉ.दर्शन आव्हाड,डॉ.स्मिता पवार,डॉ.मानसी जयस्वाल तसेच अमोल रणदिवे व यशवंत निकम यांनी सर्व रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले व आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या संदर्भात रुग्णांना समजविण्यात आले.
तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व वरिष्ठ मंडळीचा शिबिरासाठी उत्फुर्त प्रतिसाद बघून शारदा नेत्रालय परत एकदा गावात शिबीर आयोजित करू असा विश्वास दर्शविला आहे.
देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन तर्फे शिबीरासाठी आलेल्या सर्व डॉक्टर व गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले.

#नेत्र_तपासणी #शिबिर #नेत्रालय #देवरे_हेल्थकेअर_फाऊंडेशन #मोफत #महात्मा_गांधी_जयंती #लालबहादूर_शास्त्री_जयंती #२ओक्टोबर

मोफत! 👁️नेत्र तपासणी शिबिर👁️ मोफत!!महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्तानेदेवरे हेल्थकेअर फाऊंडेशन,दह...
28/09/2024

मोफत! 👁️नेत्र तपासणी शिबिर👁️ मोफत!!

महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने
देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन,दहिवद तसेच कमलिनी वाणी हॉस्पिटल अंतर्गत शारदा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने,
गरीब व गरजू रुग्णांसाठी भव्य डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू (लेन्सचे)मोफत शस्त्रक्रिया शिबिर.

शिबिराचे ठिकाण:- श्री. रामदेवजी बाबा मंदिर, दहिवद ता.चाळीसगाव, जि.जळगाव.
दिनांक:- २ ऑक्टोबर २०२४
वार:- बुधवार
वेळ:- सकाळी ०७.३० ते १२.३० वाजेपर्यंत.

📱 *संपर्क*📱
देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन, दहिवद

मयुर देवरे, दहिवद मो.96892 54646
डॉ.नितीन देवरे,दहिवद मो.96891 76070
प्रतीक भोसले,दहिवद मो.94032 80146
रोहित देवरे,दहिवद मो. 90210 22049
दिनेश वाघ,दहिवद मो. 88885 10310
चेतन वाघ,दहिवद मो. 70203 98584
दिनेश देवरे,दहिवद मो. 84592 30649

Address

1105 Dahiwad, Tal/Chalisgaon, Dist/Jalgaon
Chalisgaon
424106

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deore Healthcare Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Deore Healthcare Foundation:

Share