जलमित्र परिवार चाळीसगांव

जलमित्र परिवार चाळीसगांव Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जलमित्र परिवार चाळीसगांव, Environmental conservation organisation, Chalisgaon.

22/12/2025
20/05/2025

🌊 "जलजागर जलसंधारण स्पर्धा 2024-25" 🌱
💧 पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य – चला, जलसंपन्न जिल्ह्यासाठी एकत्र येऊया!

🏞️ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे 'जलजागर जलसंधारण स्पर्धा 2024-25' ची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेचा निकाल दि. 05 जून, 2025 रोजी जाहीर करण्यात येणार असून, जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांतील नागरिक, शेतकरी, संस्था व खाजगी घटकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

📌 स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट:

पाण्याचा शाश्वत वापर

भूजल पुनर्भरण

पर्यावरणीय शाश्वतता

नाविन्यपूर्ण जलसंधारण उपायांचा प्रसार

🏗️ स्पर्धेसाठी पात्र उपाययोजना:
✅ चेक डॅम
✅ शेततळी
✅ पावसाचे पाणी साठवण यंत्रणा
✅ बंधारे
✅ गाळ साठवण तलाव
✅ इतर नाविन्यपूर्ण संरचना (कालावधी: 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मे 2025)

📝 अर्ज प्रक्रिया:
📅 अर्ज सादर करण्याची मुदत: 21 मे ते 31 मे 2025
🌐 ऑनलाइन अर्ज व तपशील: https://jalgaon.gov.in
🖨️ प्रत्यक्ष अर्ज: जिल्हाधिकारी कार्यालयात
📎 अर्जासोबत आवश्यक:

संरचनेची माहिती

छायाचित्रे/व्हिडिओ

पाण्याची बचत व सामुदायिक लाभाचे तपशील

अन्य कागदपत्रे

🔍 मूल्यमापन निकष (१०० गुणांमध्ये):
🔸 नाविन्य
🔸 पाण्याची बचत
🔸 शाश्वतता
🔸 सामुदायिक सहभाग
🔸 पर्यावरणीय योगदान

📢 विजेते जाहीर: ५ जून २०२५ | सकाळी ११ वाजता | जिल्ह्याच्या संकेतस्थळावर

🏆 प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व प्रोत्साहनपर बक्षिसे!

🧑‍🏫 मार्गदर्शन व सहाय्य:

तालुकास्तरीय कार्यशाळा

मृद व जलसंधारण तज्ज्ञांचे मार्गदर्शन

ग्रामपंचायती व स्थानिक संस्थांचा सहभाग

📣 "जलसंवर्धन ही केवळ जबाबदारी नाही, तर आपल्या भविष्यासाठीची गुंतवणूक आहे!"
👉 जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे नागरिकांना आवाहन – "पाण्यासाठी आज पाऊल उचलूया, उज्वल उद्याची शाश्वत हमी देऊया!"

💧🌿🚰

ह्या उन्हाळ्यात आपले कर्तव्य नक्की पार पाडा कारण मुके जीव सांगु शकत नाहीत आम्हाला तहान लागलीये...!
11/04/2025

ह्या उन्हाळ्यात आपले कर्तव्य नक्की पार पाडा कारण मुके जीव सांगु शकत नाहीत आम्हाला तहान लागलीये...!

चाळीसगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीने गेल्या पंधरवाड्यापासून सीड बॉल कॅम्पेन राबविण्यात येत असून यात अधिकारी व क...
31/05/2024

चाळीसगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीने गेल्या पंधरवाड्यापासून सीड बॉल कॅम्पेन राबविण्यात येत असून यात अधिकारी व कर्मचा-यांच्या वतीने एक लाख सीड बॉल तयार करण्यात आले असून पाच हजार पिशवी रोपटे निर्मित करण्यात आल्या आहेत यात अनेक प्रजातीच्या बियांचे रोपण करण्यात आले असून काल याठिकाणी भेट देत सध्या दुर्मिळ होत चाललेल्या आपट्याच्या आम्ही जमा केलेल्या बिया या उपक्रमासाठी जलमित्र परिवारातर्फे भेट दिल्या.

प्रत्येक शासकीय विभागाने अश्याच प्रकारे पर्यावरणाविषयी जागरूकता दाखवली तर लवकरच आपला तालुका हिरवागार होईल🌳🇮🇳💧

निसर्गटेकडी, ब्राह्मणशेवगे येथे महाराष्ट्र दिनानिमित्त महाश्रमदान आयोजित करण्यात आलंय💧🇮🇳🌳
30/04/2024

निसर्गटेकडी, ब्राह्मणशेवगे येथे महाराष्ट्र दिनानिमित्त महाश्रमदान आयोजित करण्यात आलंय💧🇮🇳🌳

22/04/2024
जलमित्र परिवार चाळीसगांव तर्फे आयोजित हरित चाळीसगांव चषक- २०२२ ह्या वृक्षसंवर्धन स्पर्धेसाठी चाळीसगांव शहरातील ईशांत सूर...
15/04/2024

जलमित्र परिवार चाळीसगांव तर्फे आयोजित हरित चाळीसगांव चषक- २०२२ ह्या वृक्षसंवर्धन स्पर्धेसाठी चाळीसगांव शहरातील ईशांत सूर्यवंशी, प्राची आगोणे, श्रेयश अहिरे, सुयश अहिरे व केशव राजपूत या विद्यार्थ्यांनी कांचन, बहावा, ताम्हण, कदंब आणि आंबा या झाडांची लागवड करत सहभाग घेतला होता.

या झाडांचे संगोपन केल्याबद्दल काल त्या सर्वांना जलमित्र परिवारातर्फे ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले🌳🇮🇳💧

हरित चाळीसगांव चषक-२०२२ वृक्षसंवर्धन स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्नजलमित्र परिवारातर्फे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाऊन क...
08/04/2024

हरित चाळीसगांव चषक-२०२२ वृक्षसंवर्धन स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

जलमित्र परिवारातर्फे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाऊन करण्यात आले बक्षीस वितरण

शाळेतील मुलांमध्ये वृक्षारोपण व पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने जलमित्र परिवार चाळीसगांव तर्फे सन २०२० पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी हरित चाळीसगांव चषक या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. वृक्षसंवर्धनासाठीच्या ह्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा छान प्रतिसाद मिळत आहे. मुलांना शाळेत असतानाच स्थानिक झाडांची माहिती व्हावी, झाडांचे फायदे समजावेत यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धकांच्या झाडाची सर्वांगीण वाढ विचारात घेऊन त्यांना बक्षीस दिले जाते, गेल्यावर्षी विद्यार्थ्यांनी जगविलेल्या झाडांची वाढलेली संख्या बघता झाडाचे संवर्धन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच लावलेली झाडे जगविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शाळांचाही विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मान याप्रसंगी करण्यात आला.

जलमित्र परिवाराचे सदस्य जलमित्र प्रा. आर. एम. पाटील यांच्यातर्फे कै.डॉ. ज्ञानेश चवात, अमरावती यांच्या स्मरणार्थ, जलमित्र श्री. हेमंतभाऊ मालपुरे यांच्यातर्फे कै.सौ. रत्नाबाई जगन्नाथ मालपुरे, वाघळी यांच्या स्मरणार्थ, जलमित्र श्री. चंद्रशेखर सिसोदे यांच्यातर्फे कै. उदयसिंग मोहनसिंग शिसोदे, कुंझर यांच्या स्मरणार्थ, जलमित्र श्रीमती सविताताई राजपूत यांच्यातर्फे कै. सत्यवान दगडू जाधव, चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ, जलमित्र सौ. सुचित्राताई पाटील यांच्यातर्फे लोकनायक स्व. तात्यासाहेब महिंद्रसिंग राजपूत, चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ, जलमित्र संजय गोविंद भालेराव यांच्यातर्फे कै. दादासाहेब गोविंदराव मोहनराव भालेराव, चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ, जलमित्र प्रमोद दायमा सर यांच्यातर्फे कै. सत्यनारायण गोवर्धन दायमा सर, चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ, जलमित्र कुणाल रुईकर यांच्यातर्फे कै. राजेंद्र सोमनाथआप्पा रुईकर (बापु रुईकर), चाळीसगांव यांच्या स्मरणार्थ ट्रॉफीज वाटप करण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वरखेडे येथील श्री. अण्णासाहेब उदेसिंग पवार सर्वोदय आश्रमशाळेतील सर्व शिक्षकवृंद, चिंचगव्हाण येथील माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकवृंद, जलमित्र अमोलभाऊ गायकवाड, मुजाहिद शेख, कळमडू येथील भूजल अभियानाचे गुणवंत सोनवणे, जिल्हा परिषद कन्याशाळेतील सर्व शिक्षकवृंद, माजी मुख्याध्यापिका सौ.पुष्पा बागुल मॅडम तसेच वाघळी येथील यशवंत पब्लिक स्कूलचे संचालक श्री. परमानंद सूर्यवंशी सर या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. स्पर्धेच्या परीक्षक पदाची जबाबदारी पर्यावरणप्रेमी कृषी सहाय्यक श्री. तुफान खोत व श्री. शालिग्राम निकम सर यांनी पार पाडली.

तालुक्यातील सध्याची उन्हाची तीव्रता बघता येत्या पावसाळ्यात अधिकाधिक शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना हरित चाळीसगांव चषक स्पर्धेत सहभाग घ्यायला लावून पर्यावरण संवर्धनासाठी खारीचा वाटा उचलावा असे आवाहन जलमित्र परिवार चाळीसगांव तर्फे करण्यात येत आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी जलमित्र शशांक अहिरे (९४२०३८२६१०) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रत्येक नागरिकाची अशी मानसिकता असेल तेव्हाच सार्वजनिक व्यवस्थेत सकारात्मक बदल घडू शकतो
21/02/2024

प्रत्येक नागरिकाची अशी मानसिकता असेल तेव्हाच सार्वजनिक व्यवस्थेत सकारात्मक बदल घडू शकतो

25/11/2023

Address

Chalisgaon
424101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जलमित्र परिवार चाळीसगांव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जलमित्र परिवार चाळीसगांव:

Share

जलमित्र परिवाराविषयी

पानी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही चाळीसगांव तालुक्यातील जलमित्र पाण्याविषयी बरेच काही शिकलो आहोत पण हे ज्ञान फक्त वॉटरकप स्पर्धेपुरतेच मर्यादित न ठेवता यापुढे कायमस्वरूपी या ज्ञानाचा वापर आमच्या जीवनात करायचा निश्चय आम्ही सर्वांनी केला आहे व जिथे शक्य असेल तिथे योग्य ते उपचार करून पाणी मुरवण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत.