01/08/2025
तुमच्या व्यस्त जीवनातून फक्त 5 मिनट वेळ काढून लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या बदल ची माहिती जरूर वाचा...👍
1 ऑगस्ट 1920 रोजी त्या काळातील संस्थानातील कुरूंदवाड व सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मातंग कुटूंबात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालुबाई होते. त्यांचे नाव जरी तुकाराम असले तरी त्यांना सर्वजण अण्णा म्हणत.
करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर.!! गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्या दिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाकडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाशी संबंध.
दिड दिवस शाळेत जाणार्या अण्णाभाऊ साठेंनी तत्कालीन मनुवादी व प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या साहित्यापेक्षाही उच्च दर्जाची साहित्य संपदा निर्माण केली. अण्णाभाऊ साठेना अवघे 50 वर्षाचे आयुष्य लाभले. त्यांच्या कारकिर्दीत अण्णांनी 13 लोकनाट्य, 3 नाटके, 13 कथासंग्रह, 35 कांदबर्या, 1 शाहीरी पुस्तक, 15 पोवाडे, 1 प्रवास वर्णन ( माझा रशियाचा प्रवास), व चित्रपट कथा अशी साहित्यसंपदा निर्माण केली. अण्णाभाऊ साठे दिड दिवस शाळेत गेले. असतांना शिक्षकांनी त्यांना अपमानित केले हाताची बोटे सुजेपर्यंत मारले. त्यांना मिळालेल्या शिक्षेमुळे दुसर्या दिवसापासून अण्णांनी शाळाच सोडून दिली.
अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि रशियाच्या राष्ट्रपतींकडून त्यांचा सन्मान देखील झाला. तमाशात गणामध्ये असणारी गणेश वंदना अण्णाभाऊंनी नाकारून मातृभूमिसह शिवरायांना वंदन असणारी परंपरा रूजू केली ती अशी,
“प्रथम मायभूच्या चरणा,
छत्रपती शिवबा चरणा,
स्मरोनी गातो | कवना ||”
“माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली”
हे अतिसुंदर काव्य देखील त्यांनीच लिहिले आहे. संयुक्त महाराष्ट्र देखील अण्णाभाऊंनी लोककलातून समाजास दिलेल्या दिव्य दृष्टीमुळेच साकार झाला.
पुष्पमित्र शुंगाच्या प्रतिक्रांतीची जातीव्यवस्था आणि गावकुसाबाहेरच जग आणि गावकुसाआतल जग ही निर्मिती आहे.
पुष्पमित्र शुंगाच्या क्रांतीनंतर मनुस्मृतीचा कायदा लागू करण्यात आला. शुद्रांना शिक्षण बंदी धनसंपत्ती बंदी , रोटी बंदी, बेटी बंदी, आणि भेटी बंदी करण्यात आली. ज्या बहुजनांनी मनुस्मृतीचा कायदा झुगारून बाहेर पडले ते गावकुसाबाहेरचे महार, मंाग, चांभार, ढोर म्हणून त्यांची ओळख करण्यात आली आणि ज्यांनी मनुस्मृतीचा कायदा मान्य करून व्यवस्थेशी तडजोड करून जगणे स्विकारले ते ओ.बी.सी. म्हणून प्रचलित झाले.
श्रेष्ठतेच्या कल्पनेतून धर्मांचे सुकाणु असलेल्यांनी आपल्याच समाज बांधवाना हजारो वर्षे गावाबाहेरच ठेवले. त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेतली जातात व त्यांना कायम अज्ञानात आणि अस्वच्छतेत ठेवले.सगळ्याच संधी नाकारलेल्या मांतग समाजात अण्णाभाऊ साठे यांनी अक्षरश: मिळेल ते काम केले व त्या कामातूनच त्यांना अक्षरओळखही झाली. व त्यातूनच ते कोणत्याही शाळेत न जाता शिकले. व उत्तम दर्जाची साहित्य निर्मितीही केली.
वयाच्या 11 व्या वर्षी आई वडिलांसोबत सांगली जिल्हयातील वाटेगाव ते मुंबई हा 227 मैल पायी प्रवास करून अण्णांनी मुंबई गाठली. हे कुटूंब मुंबईत आल्यानंतर भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत रहायला लागले.
अण्णांनी स्वत:च्या कर्तृत्वावर पुढे रशियाचा प्रवास केला. अण्णाभाऊंची साहित्यसंपदा पाहून अण्णांना साहित्य संमेलनासाठी रशियात बोलावण्यात आले. व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अण्णाभाऊंना दिले. अण्णाभाऊनी साठेनी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळख पोवाड्यातून सातासमुद्रपार संपूर्ण जगाला करून दिली.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वांतत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या दुसर्याच दिवशी म्हणजेच 16 ऑगस्ट मुंबईतील शिवाजी पार्कवर अण्णाभाऊनी 60 हजार लोकांना घेऊन मोर्चा काढला. या मार्चात मराठीतून नव्हे तर हिंदीतून घोषणा दिली, "यह आझादी झूठी है, देश की जनता भूखी है ।"
या हिंदी घोषणे वरूनच हे सिध्द होते की, अण्णाभाऊना केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील जनतेला हा संदेश दिला होता.
यावरून हेही लक्षात येते की,अण्णाभाऊचे हे आंदोलन राष्ट्रव्यापी, देशव्यापी असे होते. या ठिकाणी अण्णाभाऊना फक्त पोटाचीच भूक नव्हे तर बौध्दीक भूख सुध्दा अपेक्षित आहे. उपाशी माणसाला मानसिक स्वातंत्र्याचे महत्व कळत नाही पण जेव्हा त्याच पोट भरत तेव्हा तो मानसिक स्वांतत्र्यासाठी धडपड करतो स्वांतत्र्यानंतरच्या काळात खरे तर या 6 हजार जातीमध्ये विभागल्या गेलेल्या बहुजन समाजाच्या समस्याचे समाधान व्हायला हवे होते. तसे न होता या समस्या दिवसेंदिवस आणखीनच आ वासत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मानवाच्या मुलभूत गरजांची पूर्तता तरी या समाज बांधवाना या व्यवस्थेकडून अपेक्षित होत्या. परंतु त्या गरजांना सुध्दा यांना मुकावे लागत आहे.
म्हणून अण्णाभाऊ साठे यांना 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेले स्वातंत्र्य मंजूर नाही. अण्णाभाऊ म्हणतात मिळालेल्या या स्वातंत्र्यातून इंग्रजाच्या पारतंत्र्यातून शेटजी (भांडवलदार) व भटजी मुक्त झाले. बहुजन समाज नाही. जर हे स्वातंत्र्य बहुजन समाजाचे असते तर क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर या स्वांतत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाले असते. परंतु हे स्वातंत्र्य खोटे आहे, बहुजनाच्या हिताचे, हक्काचे अधिकाराचे नाही म्हणूनच अण्णाभाऊ साठे या स्वातंत्र्याला "यह आझादी झूठी है, देश की जनता भूखी है।" असे म्हणतात.
असे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 18 जुलै 1969 रोजी अनंतात विलीन झाले. अशा या लोकशाहीराला कोटी-कोटी प्रणाम.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याकादंबरी वरून निघालेले चित्रपट-
१ वैजयंता ‘ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट
‘ वैजयंता‘ साल - १९६१ कंपनी - रेखा फिल्म्स
२ ‘ आवडी’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘टिळालावते मी रक्ताचा’ साल –१९६९ कंपनी-चित्र ज्योत
३ ‘माकडीचा माळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘डोंगरची मेना’ साल - १९६९ कंपनी - विलास चित्र
४ ‘चिखलातील कमळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट
‘मुरली मल्हारी रायाची’ साल-१९६९ कंपनी -रसिक चित्र
५ ’वारणेचा वाघ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘वारणेचा वाघ’ साल - १९७० कंपनी - नवदिप चित्र
६ ’ अलगूज’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘अशी हीसातार्याची तर्हा’ साल - १९७४ कंपनी - श्रीपाद चित्र
७ ’ फकिरा’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट
‘फकिरा’ कंपनी – चित्रनिकेतन
**लोकशाहीर अण्णाभाऊ साठेलिखित कादंबऱ्या-**
प्रकाशक –
१) विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
२) चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर-२.
१ आग
२ आघात
३ अहंकार
४ अग्निदिव्य
५ कुरूप
६ चित्रा
७ फुलपाखरू
८ वारणेच्या खोऱ्यात
९ रत्ना
१० रानबोका
११ रुपा
१२ संघर्ष
१३ तास
१४ गुलाम
१५ डोळे मोडीत राधा चाले
१६ ठासलेल्या बंदुका
१७ जिवंत काडतूस
१८ चंदन
१९ मूर्ती
२० मंगला
२१ मथुरा
२२ मास्तर
२३ चिखलातील कमळ
२४ अलगुज
२५ रानगंगा
२६ माकाडीचा माळ
२७ कवड्याचे कणीस
२८ वैयजंता
२९ धुंद रानफुलांचा
३० आवडी
३१ वारणेचा वाघ
३२ फकिरा
३३ वैर
३४ पाझर
३५ सरसोबत
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखितनाटकाची पुस्तके-
प्रकाशक -
विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
१ बरबाद्या कंजारी
२ चिरानगरची
३ निखारा
४ नवती
५ पिसाळलेला माणूस
६ आबी दुसरी आवृत्ती
७ फरारी
८ भानामती
९ लाडी दुसरी आवृत्ती
१० कृष्णा काठच्या कथा
११ खुळवाडी
१२ गजाआड पाचवी आवृत्ती
१३ गुऱ्हाळ
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेलिखित वगनाट्ये (तमाश्याची )पुस्तके-
१ अकलेची गोष्ट
२ खापऱ्या चोर
३ कलंत्री
४ बेकायदेशीर
५ शेटजीचं इलेक्शन
६ पुढारी मिळाला
७ माझी मुंबई
८ देशभक्त घोटाळे
९ दुष्काळात तेरावा
१० निवडणुकीतील घोटाळे
११ लोकमंत्र्याचा दौरा
१२ पेंद्याचं लगीन
१३ मूक निवडणूक
१४ बिलंदर बुडवे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेलिखित प्रसिद्ध पोवाडे :-
१ नानकीन नगरापुढे
२ स्टलिनग्राडचा पोवाडा
३ बर्लिनचा पोवाडा
४ बंगालची हाक
५ पंजाब- दिल्लीचा दंगा
६ तेलंगणाचा संग्राम
७ महाराष्ट्राची परंपरा
८ अमरनेरचे अमर हुतात्मे
९ मुंबईचा कामगार
१० काळ्या बाजाराचा पोवाडा
अण्णाभाऊ साठे यांचे प्रवास वर्णन पुस्तक-
माझा रशियाचा प्रवास - सुरेश प्रकाशन पुणे