Sanskar Vyakhyanmala

Sanskar Vyakhyanmala *Founded in 1975 by late Shri Ranganath Nitsure.
*A lecture series was organized to promote nationa

संस्कार व्याख्यानमालावर्ष ४९ वेस्थळ: ज्ञानयोग सहनिवासाचे पटांगण, वझिरा नाका, बोरिवली पश्चिमवेळ: सायंकाळी ७.३० वाजताहार्द...
28/11/2025

संस्कार व्याख्यानमाला
वर्ष ४९ वे
स्थळ: ज्ञानयोग सहनिवासाचे पटांगण, वझिरा नाका, बोरिवली पश्चिम
वेळ: सायंकाळी ७.३० वाजता
हार्दिक निमंत्रण!

20/11/2025

नमस्कार. कुटुंबातील सार्‍याजणांनी एकत्र पहाव्यात अशा उत्तम मालिका, चित्रपट निर्माण करणारे एक लेखक दिग्दर्शक आपल्या भेटीस येणार आहेत. ४९व्या संस्कार व्याख्यानमालेतील शेवटचं पुष्प कोण गुंफणार आहेत याची माहिती देत आहेत, आमच्या सहकारी शलाकाताई नागवेकर.

19/11/2025

नमस्कार. या महानगरीत प्रवास करायचा म्हटलं की रस्त्यांवर खोळंबलेल्या वाहन रांगांचा अजस्त्र सर्प वाकुल्या दाखवू लागतो. अंतर, वेग, काळ हे गणितच चुकत जातं. काही उपाय आहे का यावर? निश्चितच असणार. तो सांगायला ४९व्या संस्कार व्याख्यानमालेत कोण आणि कधी येणार आहे हे सांगतोय आमचा सहकारी प्रणव पटवर्धन.

18/11/2025

नमस्कार. राज्य शकट हाकताना विचारपूर्वक आखलेली नियमावली आवश्यक असते. ही नियमावली म्हणजेच राष्ट्राचं संविधान. आपल्या संविधान दिनाचं, दिनांक २६ नोव्हेंबर,२०२५ चं, औचित्य साधून ४९व्या संस्कार व्याख्यानमालेत प्राचीन भारताची शासन प्रणाली समजून घेण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे. व्याख्याता आणि त्यांच्या विषयाची माहिती देत आपणास आमंत्रित करीत आहे सुरुची लेले.

17/11/2025

नमस्कार. जागतिक पटलावर बरेच आर्थिक बदल घडताना सध्या आपण पाहतोय. अशा परिस्थितीत भारताचं धोरण काय, आर्थिक महासत्तेचं उद्दिष्ट गाठू पाहणार्‍या आपल्या देशाची भूमिका काय हे समजून घेऊया मंगळवार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी, ४९व्या संस्कार व्याख्यानमालेत. आमचा तरुण सहकारी ओंकार प्रभू आपणास आमंत्रित करीत आहे.

Address

Borivali West
400091

Telephone

+912228338142

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanskar Vyakhyanmala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sanskar Vyakhyanmala:

Share