Sondara - सोनदरा

Sondara - सोनदरा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sondara - सोनदरा, Non-Governmental Organization (NGO), sondara gurukul, Bhir.

Inspired Couple Sudam and Sindhu Bhondave devotionally started this project with the purpose to give value based education along with literacy for the sugerc-cane workers children in remote area of Beed district.

29/05/2026

👨‍🍳 सोनदरा गुरुकुल निवासी शैक्षणिक संस्थेत आचारी पाहिजे👨‍🍳

स्थळ:सोनदरा गुरुकुल, डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड
9420783130, 7035707033

४० वर्षांपासून सुरू असलेल्या या पवित्र कार्यात सहभागी व्हा!
गुगल फॉर्म भरून इच्छूकांनी सहभागी व्हावे .
https://forms.gle/Bzrj96oPJBnHgXQx6

Inspired Couple Sudam and Sindhu Bhondave devotionally started this project with the purpose to give value based education along with literacy for the sugerc-cane workers children in remote area of Beed district.

सोनदरा गुरुकुलातील विद्यार्थ्यांचे शालांत परीक्षेत सोनेरी यश !गेल्या ३९ वर्षांपासून मराठवाड्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांन...
08/05/2026

सोनदरा गुरुकुलातील विद्यार्थ्यांचे शालांत परीक्षेत सोनेरी यश !
गेल्या ३९ वर्षांपासून मराठवाड्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणाऱ्या सोनदरा गुरुकुल, डोमरी या संस्थेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६च्या शालांत परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवले आहे. गेल्या अनेक वर्षांप्रमाणेच या वर्षीही शाळेचा निकाल १००% लागला आहे. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत म्हणजे ७५%हून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

1) प्रतीक संतोष सौंदर याने ९४.४% गुण मिळवून पहिला, प्रतीक दिलीप मिसाळ याने ९२.२% गुण मिळवून दुसरा तर सचिन बलराम झुंबड याने ९२% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे.

सोनदरा गुरुकुलातील विद्यार्थ्यांचे शालांत परीक्षेत सोनेरी यश !गेल्या ३९ वर्षांपासून मराठवाड्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांन...
08/05/2026

सोनदरा गुरुकुलातील विद्यार्थ्यांचे शालांत परीक्षेत सोनेरी यश !

गेल्या ३९ वर्षांपासून मराठवाड्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणाऱ्या सोनदरा गुरुकुल, डोमरी या संस्थेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६च्या शालांत परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवले आहे. गेल्या अनेक वर्षांप्रमाणेच या वर्षीही शाळेचा निकाल १००% लागला आहे.
(1) 90 % पेक्षा जास्त गुण घेणारे - 08 (2) 80 % ते 90% गुण घेणारे - 20 (3) 65 % ते 80 % गुण घेणारे - 11 या प्रकारचे गुण मिळवून विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
1) प्रतीक संतोष सौंदर याने ९४.४% गुण मिळवून पहिला, प्रतीक दिलीप मिसाळ याने ९२.२% गुण मिळवून दुसरा तर सचिन बलराम झुंबड याने ९२% गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे.
भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेतून डोमरी गावातील सुदामकाका भोंडवे यांनी १९८६मध्ये सुरू केलेल्या या निवासी गुरुकुल पद्धतीच्या शाळेची सुरुवात ३ झोपड्या व ऊसतोड कामगारांची २३ मुले अशी झाली होती. आज या शाळेत मराठवाडा व परिसरातील १४ जिल्ह्यातून सुमारे २२३ विद्यार्थी निवासी पद्धतीचे शिक्षण घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून येथे परिसरातील विद्यार्थिनीसुद्धा दिन गुरुकुल प्रकारचे अनिवासी शिक्षण घेत असून यंदा १७ विद्यार्थिनी आहेत. गेल्या वर्षीपासून बालवाडी व प्राथमिक वर्गातील शिक्षणासही आरंभ झाला आहे.

पहाटे साडे पाचपासून रात्री दहापर्यंतच्या अतिशय शिस्त आणि संस्कारयुक्त दिनक्रमामध्ये या विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी प्रयत्न केले जातात. स्वावलंबन, व्यायाम व खेळ, गटामध्ये कामे व अभ्यास करणे, पाठांतराऐवजी विषय समजून घेणे, एकमेकांशी स्पर्धेऐवजी स्वतःची क्षमतावृद्धी अशा आधुनिक शिक्षणपद्धतीतील तत्त्वांच्या आधारे या विद्यार्थ्यांना सोनदरा गुरुकुलात घडवले जाते. या साऱ्यामुळे उत्तम संस्कारित झालेले शेकडो विद्यार्थी आज समाजात वैद्यकीय, अभियांत्रिकी, शासकीय सेवा, शिक्षण, व्यावसायिक कंपनी, संरक्षण, शेती तसेच उद्योग व्यवसाय अशा क्षेत्रात उत्तम नागरिक म्हणून कार्यरत आहेत.

दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान संचलित *सोनदरा गुरुकुल, डोमरी* येथे शिक्षक व इतर काही पदांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक असणाऱ्या ...
06/05/2026

दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान संचलित *सोनदरा गुरुकुल, डोमरी* येथे शिक्षक व इतर काही पदांसाठी भरती सुरू आहे.
इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील *लिंक वर क्लिक किंवा स्कॅनर चा वापर करून अर्ज करावा.*
👉 अर्ज लिंक:
https://forms.gle/8yHySDyFC5tm9rRA8

📞 अधिक माहितीसाठी संपर्क.
मो.नं -9420783130, 7035707033 9421503616
ई-मेल आयडी- [email protected]

🧘‍♂️⛹️‍♂️🚴‍♀️प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सोनदर गुरुकुलामध्ये *निवासी आनंद वर्गाचे* आयोजन करण्यात आले असून यावेळी  सूर्य...
28/04/2026

🧘‍♂️⛹️‍♂️🚴‍♀️प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सोनदर गुरुकुलामध्ये *निवासी आनंद वर्गाचे* आयोजन करण्यात आले असून यावेळी सूर्या फाउंडेशन नवी दिल्ली यांचाही आयोजनामध्ये सहभाग असणार आहे .
उन्हाळी सुट्टीचा उपयोग आपल्या मुलांच्या व्यक्तीमत्व विकासाबरोबरच विविध कौशल्य शिकण्यासाठी आजच गुगल फॉर्म भरून नाव नोंदणी करावी .
*कालावधी* - 1 ते 11 मे 2026
*वयोगट* - 10 ते 15 वर्ष ( मुल व मुली )
*शिबीर शुल्क* - 5500/-
*ठिकाण* - सोनदरा गुरुकुल डोमरी
*नाव नोंदणीसाठी -* https://forms.gle/nuxdpVR2hdLL4Frg6

दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान संचलित *सोनदरा गुरुकुल, डोमरी* येथे शिक्षक व इतर काही पदांसाठी भरती सुरू आहे.गुरुकुलामध्ये काम...
26/04/2026

दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान संचलित *सोनदरा गुरुकुल, डोमरी* येथे शिक्षक व इतर काही पदांसाठी भरती सुरू आहे.
गुरुकुलामध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील *लिंक वर क्लिक किंवा स्कॅनर चा वापर करून अर्ज करावा.*
👉 अर्ज लिंक:
https://forms.gle/8yHySDyFC5tm9rRA8

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करावा.
मो.नं -9420783130,7035707033 9421503616
ई-मेल आयडी- [email protected]

दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान संचलित  सोनदरा गुरुकुल, डोमरी येथे शिक्षक व इतर काही पदांसाठी भरती सुरू आहे.गुरुकुलामध्ये काम ...
24/04/2026

दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान संचलित सोनदरा गुरुकुल, डोमरी येथे शिक्षक व इतर काही पदांसाठी भरती सुरू आहे.

गुरुकुलामध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील लिंक वर क्लिक किंवा स्कॅनर चा वापर करून अर्ज करावा.

👉 अर्ज लिंक:
https://forms.gle/8yHySDyFC5tm9rRA8

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करावा.
मो.नं -9420783130,7035707033 9421503616
ई-मेल आयडी- [email protected]

Address

Sondara Gurukul
Bhir
414204

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sondara - सोनदरा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sondara - सोनदरा:

Share