10/06/2026
स्व. नानांचा स्मृतिदिन मानवतावादी उपक्रमांनी साजरा..
दिनांक 10 जून 2026 रोजी इन्फंट इंडिया आनंदग्राम येथे स्व. नानांचा स्मृतिदिन अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आनंदग्राममधील लेकरांना प्रेमाने घास भरवून त्यांच्या सहवासात स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
तसेच परिसरातील रक्षा बांधलेल्या वडाच्या वृक्षाला पाणी, गंध व नैवेद्य अर्पण करून वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. या अनोख्या उपक्रमातून मानवता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या प्रसंगी साम टीव्हीचे पत्रकार श्री. लैलेश सर यांनी वडील हयात नसतांना ही वडाचा झाडाला मिठी मारून हयात असल्यासारखं अनुभव केलं.. "ही मानवतावादी परंपरा अखंड सुरू राहो" अशा शुभेच्छा व्यक्त करत स्व. नानांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमात लैलेश भैय्या चे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते आणि आनंदग्रामचे संस्थापक तसेच संचालक,कर्मचारी, मुलं- मुली उपस्थित होते. सर्वांनी स्व. नानांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून समाजसेवेची प्रेरणा घेण्याचा संकल्प केला.