मातृभूमी आदर्श सामाजिक प्रकल्प

  • Home
  • India
  • Bhir
  • मातृभूमी आदर्श सामाजिक प्रकल्प

मातृभूमी आदर्श सामाजिक प्रकल्प Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मातृभूमी आदर्श सामाजिक प्रकल्प, Non-Governmental Organization (NGO), Beed-Nalwandi Road, Bhir.

development
and quality education to orphans, child labourers, widows,Progeny, suicidal farmer child, children of sugar cane workers, economically and socially backward students, other school students.

📚🎓 शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७ च्या नव्या पर्वाची उत्साहवर्धक सुरुवात! 🎓📚Ideal Social Education School & Junior College, नाळ...
15/06/2026

📚🎓 शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७ च्या नव्या पर्वाची उत्साहवर्धक सुरुवात! 🎓📚
Ideal Social Education School & Junior College, नाळवंडी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहिलेल्या सर्व चिमुकल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मनःपूर्वक आणि हार्दिक स्वागत..! 🌸🌿
नवीन स्वप्ने, नवीन ध्येय, नवीन उमेद आणि ज्ञानाच्या नव्या वाटचालीची ही सुरुवात प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात आनंद, आत्मविश्वास आणि यशाची नवी दिशा निर्माण करो, हीच सदिच्छा.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आमच्या संस्थेत शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांनाही तितकेच महत्त्व दिले जाते. चला, एकत्रितपणे उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानाचा दीप प्रज्वलित करूया.
शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक स्वागत..!
सुस्वागतम..! 💐
स्वागतोत्सुक
संस्था अध्यक्ष/सचिव, प्राचार्य/मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समिती.
#शाळेचापहिलादिवस #हार्दिकस्वागत #सुस्वागतम #नवीनशैक्षणिकवर्ष #विद्यार्थीस्वागत #ज्ञानाचीसुरुवात #आदर्शशिक्षण #नाळवंडी #बीड

🤝 मातृभूमीसाठी लाखमोलाचा आधार – शिक्षणसेवेच्या प्रवासाला नवी दिशा! 🚌📚भंडारी ट्रस्ट, पुणे चे अध्यक्ष सन्माननीय भंडारी साह...
19/05/2026

🤝 मातृभूमीसाठी लाखमोलाचा आधार – शिक्षणसेवेच्या प्रवासाला नवी दिशा! 🚌📚
भंडारी ट्रस्ट, पुणे चे अध्यक्ष सन्माननीय भंडारी साहेब यांनी मातृभूमी आदर्श सामाजिक प्रकल्पाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर विश्वास व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि लाखमोलाची मदत जाहीर केली आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान व्हावा या उदात्त हेतूने लवकरच भंडारी ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी स्कूल बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 🚍✨
ही केवळ मदत नाही, तर ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख देणारी एक प्रेरणादायी सुरुवात आहे. समाजासाठी कार्य करणाऱ्या हातांना अशी साथ लाभणे ही अभिमानाची बाब आहे.
मातृभूमी परिवार सन्माननीय भंडारी साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. 🙏💐
"शिक्षणासाठी उभा राहणारा प्रत्येक हात, भविष्यासाठी आशेचा किरण ठरतो."
#मातृभूमी_आदर्श_सामाजिक_प्रकल्प








#विद्यार्थीहित
#शिक्षण_हीच_खरी_सेवा
#ग्रामीण_शिक्षण


#सेवेचा_संकल्प
#विकासाच्या_दिशेने
ातृभूमी

🌸 स्वप्न पाहिले होते शिक्षणातून समाज परिवर्तनाचे... आज ते वास्तव होताना दिसत आहे! 🌸🌺 पद्मश्री मणिभाई देसाई शिक्षण प्रसार...
16/05/2026

🌸 स्वप्न पाहिले होते शिक्षणातून समाज परिवर्तनाचे... आज ते वास्तव होताना दिसत आहे! 🌸

🌺 पद्मश्री मणिभाई देसाई शिक्षण प्रसारक मंडळ 🌺
मातृभूमी आदर्श सामाजिक प्रकल्प अंतर्गत...

आयडियल सोशल एज्युकेशन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नाळवंडी जहागिरीचा प्रगतीचा प्रवास हा केवळ आकड्यांचा नाही, तर तो संघर्ष, मेहनत, विश्वास आणि गुणवत्तेचा इतिहास आहे.

दिनांक 19 जून 2016 रोजी केवळ 25 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही ज्ञानयात्रा आज जवळपास 450 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. ही वाढ केवळ संख्या नाही, तर पालकांचा विश्वास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पावती आहे.

इयत्ता अकरावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात फक्त 03 विद्यार्थ्यांनी झाली होती; आज ती संख्या 150 विद्यार्थ्यांवर पोहोचली आहे.

विशेष अभिमानाची बाब म्हणजे आजपर्यंत दहावीच्या 05 बॅचेस आणि बारावीच्या 05 बॅचेस यांनी 100% निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.

दहावी-बारावीनंतर अनेक विद्यार्थी मेडिकल क्षेत्रात प्रवेशासाठी पात्र झाले आहेत, तर काही विद्यार्थी व्यवसाय, नोकरी आणि व्यापार क्षेत्रात यशाची नवी शिखरे गाठत आहेत.

दोन वर्षांचा लॉकडाऊनचा कठीण काळ असतानाही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वाहनचालक आणि संपूर्ण परिवाराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे आज हे शैक्षणिक संकुल यशाच्या दिशेने दमदार वाटचाल करत आहे.

ही तर फक्त सुरुवात आहे... अजून अनेक यशोगाथा लिहायच्या आहेत! 💐

📍 मु.पो. नाळवंडी (जा.), ता. जि. बीड - 431122











*🌸 ज्ञानदान हीच खरी राष्ट्रसेवा! 🌸**अत्यंत आनंद आणि अभिमानाचा क्षण...! 💐*आदरणीय श्री.सखाराम साळुंके सर (एम.एससी. मॅथेमॅट...
16/05/2026

*🌸 ज्ञानदान हीच खरी राष्ट्रसेवा! 🌸*

*अत्यंत आनंद आणि अभिमानाचा क्षण...! 💐*

आदरणीय श्री.सखाराम साळुंके सर (एम.एससी. मॅथेमॅटिक्स) यांचे आयडियल सोशल एज्युकेशन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परिवारात पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत, सुस्वागतम! 🙏💐

*विद्यार्थीप्रिय, अभ्यासू, कर्तव्यनिष्ठ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व लाभलेले साळुंके सर हे गणित व इंग्रजी विषयाचे आदर्श शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे शिक्षक आहेत.*

जिल्हा परिषद शाळेतील उल्लेखनीय कार्य, बीडमधील नामांकित क्लासेसमधील अध्यापनाचा समृद्ध अनुभव आणि आपल्या शाळेमधील उत्कृष्ट अध्यापनशैली यामुळे त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या यशाचा भक्कम पाया रचला आहे.

शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसते, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देण्याचे कार्य असते. आणि अशा स्वप्नांना उंच भरारी देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे पुनरागमन ही आपल्या संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे.

आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मिळणार आहे, हीच आनंदाची गोष्ट! ✨

साळुंके सर, आपल्या उज्ज्वल कार्यप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आपण विद्यार्थ्यांच्या यशाची नवी उंची गाठाल, याची खात्री आहे. 🌺

*💐 आयडियल सोशल एज्युकेशन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परिवाराकडून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत! 💐*












गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा...📚🌱 मातृभूमी आदर्श सामाजिक प्रकल्प अंतर्गत🏫 पद्मश्री मणिभाई देसाई शिक्षण प्रसार...
15/05/2026

गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा...

📚🌱 मातृभूमी आदर्श सामाजिक प्रकल्प अंतर्गत
🏫 पद्मश्री मणिभाई देसाई शिक्षण प्रसारक मंडळ संचालित
आयडियल सोशल एज्युकेशन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नाळवंडी (जा.), ता. जि. बीड

✨ "शिका आणि समाजासाठी काहीतरी करा!" ✨

गेल्या १० वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आमची संस्था सातत्याने कार्यरत आहे. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे, या विश्वासातून नर्सरी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत.

🎓 खालील घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व विविध सुविधा उपलब्ध:

✅ अनाथ विद्यार्थी
✅ बालकामगारांचे पाल्य
✅ ऊसतोड कामगारांचे पाल्य
✅ वीटभट्टी कामगारांचे पाल्य
✅ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्य
✅ विधवा पालकांचे पाल्य
✅ आई किंवा वडील नसलेले पाल्य
✅ आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील पाल्य
✅ कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य
✅ गंभीर आजारग्रस्त पालकांचे पाल्य

🎁 शिक्षणासह उपलब्ध सुविधा:

📘 सर्व पुस्तके मोफत
👔 दोन गणवेश मोफत
👞 स्कूल शूज मोफत
🚌 स्कूल बस सुविधा
🎯 इतर आवश्यक सुविधा अगदी मोफत

📌 सदर प्रवेश संस्थेच्या सर्वेक्षणातून दिले जातील.

❤️ आमचा संकल्प —
"कोणतेही मूल दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहू नये!"

आपल्या सहकार्याने आणि आशीर्वादाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा आमचा प्रयत्न पुढे चालू राहील. 🙏

📞 संपर्क: 9405105032 / 9822633799


#मातृभूमी_आदर्श_सामाजिक_प्रकल्प


#ग्रामीण_शिक्षण



#शिका_वाढा_आणि_समाजासाठी_काहीतरी_करा

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी आयुष्यासा...
08/05/2026

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
"मातृभूमी" आयडियल सोशियल एज्युकेशन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधून प्रथम द्वितीय व तृतीय येण्याचा बहुमान मिळवणाऱ्या तीनही विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
1) सृष्टी न्यानोबा कुठे.86%
2) प्रीती राम कवचट.80.40
3) वैष्णवी सुषेण राऊत .80.20

Address

Beed-Nalwandi Road
Bhir

Alerts

Be the first to know and let us send you an email when मातृभूमी आदर्श सामाजिक प्रकल्प posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share