23/08/2023
बालाघाट हाफ मॅरेथॉन ऑनलाईन नोंदणी पोर्टलचे थाटात उद्घाटन
29 ऑक्टोबरला होणार स्पर्धा; तयारीने घेतला वेग
बीड ः प्रतिनिधी
बीड येथील योगा ग्रुपच्या पुढाकारातून सुरु करण्यात आलेल्या बालाघाट हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष आहे. गतवर्षीच्या प्रतिसादानंतर आता यावर्षीही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याच्या ऑनलाईन नोंदणी पोर्टलचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी करण्यात आले.