22/03/2026
*विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन .*
बीड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा चे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक महोत्सव समिती बीड शहर च्या वतीने करण्यात आले आहे .या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातील इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी पात्र राहतील तालुकास्तरीय स्पर्धा दिनांक 30 मार्च 2026 सोमवार रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बीड शहर दरवर्षी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती बीड शहर च्या वतीने मागील पंधरा वर्षापासुन दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वर्षी दिनांक 30 मार्च 2026 रोजी तालुकास्तरावर प्रथम फेरी होणार असून यामध्ये एकूण विद्यार्थ्यांपैकी अनुक्रमे पहिले 10 विद्यार्थी अंतिम स्पर्धेसाठी निवडले जातील. व अंतिम निवड झालेल्या अकरा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अंतिम परीक्षा ही शहर येथील तुलसी महाविद्यालय बीडयेथे दिनांक 05 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता होईल. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये सात हजार रुपये स्मृतीचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र तर तृतीय पारितोषिक रोख तीन हजार रुपये ,स्मृतीचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र अशा स्वरूपाचे राहणार आहे.
या स्पर्धेचे प्रवेश शुल्क प्रत्येकी 50 रुपये असणार आहे.या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातील सर्व आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन सार्वजनिक जयंती समिती संयोजक आयु.मनोज वाघमारे , आयु सुमित जोगदंड सर , स्पर्धा समिती प्रमुख प्रा.शशिकांत जावळे, प्रवीणकुमार तरकसे सर , प्राचार्य प्रदीप गाडे ,श्री भारत मगर महादेव इनकर ,प्रा.अशोक गायकवाड यांच्यासह समितीतील सर्व सदस्यांनी आवाहन केले आहे.