Bhandara Yuvak Biradari

Bhandara Yuvak Biradari Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhandara Yuvak Biradari, Non-Governmental Organization (NGO), Bhandara.

भंडारा युवक बिरादरीतर्फे आयोजित 'कॉफी डे' कार्यक्रमाचे वृत्तांकन Yuvak Biradari
12/08/2025

भंडारा युवक बिरादरीतर्फे आयोजित 'कॉफी डे' कार्यक्रमाचे वृत्तांकन

Yuvak Biradari

12/08/2025
भंडारा जिल्ह्यातील गोपीवाडा येथे स्व. मनोज दाढी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले. भंडारा युवक बिरादरी आणि...
29/06/2025

भंडारा जिल्ह्यातील गोपीवाडा येथे स्व. मनोज दाढी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले. भंडारा युवक बिरादरी आणि कमांडो ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांनी एकत्रितपणे वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश दिला. यावेळी स्व. मनोज दाढी यांना आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार तथा भंडारा युवक बिरादरीचे उपाध्यक्ष चेतन भैरम, प्रमुख पाहुणे म्हणून एमएमपी कंपनीचे प्रबंधक टी. एन मूर्ती, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ज्येष्ठ बिरादर प्यारेलाल वाघमारे, पंचायत समिती सदस्य संजीव बोंद्रे, नंदगोपाल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. यशवंत लांजेवार, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, सरपंच विनायक टांगले, उपसरपंच चांगोजी निंबार्ते, कमांडो ग्रुपचे संचालक चंद्रशेखर डोळस, सुनीता जांगडे, सामाजिक कार्यकर्ते रविशंकर वैद्य, प्रहरी बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव शिल्पा डोळस, शालिनी झलके, सुरेखा खटके, अंगणवाडी सेविका आशा झंझाळ, कृषी सखी सुजाता ठवकर, यशपाल कऱ्हाडे, भिष्मा लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भंडारा युवक बिरादरीचे कार्याध्यक्ष सुरेंद्र कुलरकर, विक्रम फडके व प्रास्ताविक भंडारा युवक बिरादरीच्या वर्षा दाढी यांनी केले आणि उपस्थितांचे आभार विलास केजरकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिरादर प्रेमदास मुटकुरे, विष्णू मारबते, अतुल पिंगळे, शंकर जगनाडे, महेश सार्वे, लक्ष्मी भदाडे, श्रुती कारेमोरे, प्रविण कुंभारे, वानखेडे, मिथुन कुंभलकर, अमन झंझाळ, विक्की मेश्राम, गणेश चौधरी, रुपेश राजगिरे, आदित्य पंचबुध्दे, विक्रम फडके, अक्षय वनवे, प्रणित उके, सागर ठाकरे, प्रज्वल राखडे, प्रणित कुंभारे, पवन डुंभरे, चेतन बडोले, मोरेश्वर समरित, अश्विन बन्सोड, शरद धोत्रे, आस्तिक उके, शौर्य तिघरे, प्रथम फुलसुंगे भंडारा युवक बिरादरी, ग्राम पंचायत सदस्य, गावातील तसेच कमांडो ग्रुपचे सदस्य व प्रशिक्षणार्थ्यांनी सहकार्य केले.

Yuvak Biradari Chetan Bhairam Yash Karhade

भंडारा युवक बिरादरीच्या नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक संपन्न  भंडारा युवक बिरादरीची महत्त्वपूर्ण बैठक अध्यक्षा मा. सरिता ...
20/06/2025

भंडारा युवक बिरादरीच्या नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक संपन्न

भंडारा युवक बिरादरीची महत्त्वपूर्ण बैठक अध्यक्षा मा. सरिता फुंडे जी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीस जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी, सदस्य आणि युवा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला युवक बिरादरीचे (भारत) कार्य. महासंचालक पंकज इंगोले, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रशांत वाघाये प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीत नवनियुक्त कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा पार पडला. तसेच युवक बिरादरीच्या आगामी उपक्रमांसाठी नियोजन करण्यात आले. शैक्षणिक योजना, युवा संवाद सत्र, सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम यांसारख्या विविध उपक्रमांची रूपरेषा ठरविण्यात आली. उपस्थित सदस्यांनी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. भंडारा युवक बिरादरीच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवा शक्तीला दिशा देण्यासंदर्भात विविध उपक्रमांविषयी चर्चा झाली.

या बैठकीला अध्यक्षा सरिता फुंडे, कार्याध्यक्ष सुरेंद्र कुलरकर, उपाध्यक्ष चेतन भैरम, वैभव कोलते, मुख्य संयोजक सागर ठाकरे, संयोजक ॲड. नेहा शेंडे, एक्झिक्युटिव्ह प्रणित उके, प्रवीण कुंभारे, प्रा. यशपाल कऱ्हाडे, भीष्मा लांडगे, विद्यार्थी युवा प्रतिनिधी पूजा कुंभलकर, विद्यार्थी प्रतिनिधी मोरेश्वर समरीत, संस्थापक सदस्य वर्षा दाढी, विक्रम फडके, प्रियांका कोलते, मेघा भागवत, सुनिता जांगडे, विलास केजरकर, सभासद स्मिता गालफाडे, लक्ष्मी भागवत, राधेश्याम बांगडकर, पंकज इंगोले, प्रशांत वाघाये, मिलिंद हळवे, प्यारेलाल वाघमारे, प्रशांत फेंडरकर, पवन वंजारी, युवा बिरादर राजेंद्र पवनकर, विशाल जाखमाते, केतन काटेखाये, हर्षा वैद्य, खुशी कावळे, मेघा मिश्रा, प्रज्ज्वल राखडे, चेतन बडोले, अश्विन बन्सोड, पियुष गवरे, लिखित पुडके हे सर्व नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.

Yuvak Biradari Sarita Funde Pankaj Ingole

Address

Bhandara
441904, 441905, 441906

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhandara Yuvak Biradari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share