29/11/2025
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
कल्लेहोळ गावातील शतायुषी, शिक्षणप्रेमी, निसर्गप्रेमी आणि आदर्श समाजसेवक
श्री. डोंगरू पाटील (वय 103)
यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.
पाचांपैकी ३ मुलं, २ मुली आणि नातवंडांचा मोठा परिवार त्यांच्या पश्चात आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक मुलगा–मुलगी सुशिक्षित व्हावी, चांगल्या उद्योगात पुढे जावे यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले.
स्वतः दहावीपर्यंत सेंट्रल हायस्कूल, बेळगाव येथे शिक्षण घेतलेल्या तात्यांनी शिक्षणाची किंमत जाणली आणि ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतला.
निसर्गाविषयी त्यांचे प्रेम तर सर्वपरिचित—
झाड कसे वाढवावे? कलम कसे करावे? कोणते झाड कुठे लावावे?
याबद्दल सांगणारे, प्रेरणा देणारे ते गावाचे मार्गदर्शक होते.
सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग सदैव अग्रभागी होता.
गरीब परिस्थितीतून उभे राहून समाजासाठी मोठं योगदान देणारे आपले तात्या आज स्वर्गवासी झाले.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. 🌼
🕯 अंत्यविधी: आज दुपारी १२ वाजता, कल्लेहोळ स्मशानभूमी
— लेखक : बसवराज हिरेमठ पुजारी