Yugendra Pawar Foundation

Yugendra Pawar Foundation YSP

03/09/2026

आपल्या हक्काचा माणूस युगेंद्रदादा पवार ❤️
Yugendra Pawar

📍श्री सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, कोऱ्हाळे बु. आदरणीय पवार साहेबांचे बंधू, आमचे आजोबा कै. वसंतराव पवार (दादा) य...
03/09/2026

📍श्री सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, कोऱ्हाळे बु.

आदरणीय पवार साहेबांचे बंधू, आमचे आजोबा कै. वसंतराव पवार (दादा) यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त, नामदेवराव पाटील सार्वजनिक वाचनालय कोऱ्हाळे बु, ता. बारामती तर्फे आयोजित २३व्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या प्रसंगी उपस्थित राहून उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.

गेल्या २२ वर्षांपासून अखंडपणे सुरू असणारा हा उपक्रम केवळ एका स्पर्धेपुरता मर्यादित न राहता, या स्पर्धेने आजवर कित्येक अभ्यासू वक्त्यांबरोबरच नामवंत पत्रकार आणि प्रगल्भ कीर्तनकार घडवून तालुक्याला व जिल्ह्याला एक वैचारिक दिशा दिली आहे.

या यशस्वी आयोजनाबद्दल नामदेवराव पाटील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री. सतीश मामा खोमणे, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व तरुण वक्त्यांचे मनःपूर्वक आभार व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
Yugendra Pawar

गोविंद बाग येथे आदरणीय पवार साहेबांसोबत ‘शरद मॅंगो’ या विशिष्ट जातीच्या आंब्यांच्या रोपांची लागवड केली.मु. पो. अरण, ता. ...
02/09/2026

गोविंद बाग येथे आदरणीय पवार साहेबांसोबत ‘शरद मॅंगो’ या विशिष्ट जातीच्या आंब्यांच्या रोपांची लागवड केली.

मु. पो. अरण, ता. माढा, जि. सोलापूर येथील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी विकसित केलेल्या या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे एका फळाचे वजन तब्बल ३ किलोपर्यंत असते. मातीशी नातं जोडून, नवनवीन प्रयोग करत आणि आपल्या कष्टातून शेतकरी सातत्याने शेतीमध्ये नवे प्रयोग घडवून आणत आहेत.

यावेळी आदरणीय साहेबांसोबत गोविंद बागेतील AI तंत्रज्ञानाच्या मदतीने घेतलेल्या ऊस पिकाचीही पाहणी केली. शेतीतील नव्या वाणांना प्रोत्साहन देणे असो किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये प्रभावी वापर करणे असो, पवार साहेबांची शेतीकडे पाहण्याची दृष्टी नेहमीच काळाच्या पुढची राहिली आहे.

📍माळेगाव येथील शिवतीर्थ मंगल कार्यालयात आयोजित कोकरे-शेळके परिवारातील विवाह सोहळ्यास सपत्नीक हजेरी लावली. नव्या आयुष्याच...
02/09/2026

📍माळेगाव येथील शिवतीर्थ मंगल कार्यालयात आयोजित कोकरे-शेळके परिवारातील विवाह सोहळ्यास सपत्नीक हजेरी लावली. नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात करणाऱ्या नवदाम्पत्याला भावी वैवाहिक वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या!

जनाई-शिरसाई योजनेतून वायसे वस्ती पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्याने अंजनगाव ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्नावर काही प्रम...
01/09/2026

जनाई-शिरसाई योजनेतून वायसे वस्ती पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्याने अंजनगाव ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्नावर काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत झाली आहे. आज वायसे वस्ती तलावाची पाहणी करून पाणीसाठा व सद्यस्थितीची माहिती घेतली.

स्थानिक नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन पाणी सोडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल जलसंपदा विभागातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार.

अंजनगाव परिसरातील पाणीप्रश्नाच्या निराकरणासाठी संबंधित विभागांच्या समन्वयातून आवश्यक त्या उपाययोजना पुढेही करण्यात येतील.

— युगेंद्रदादा पवार

बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयाला भेट दिली. विद्यालयाची सुरक्षा भिंत बारामती लोकसभा मतदार संघाच्या ...
01/09/2026

बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयाला भेट दिली. विद्यालयाची सुरक्षा भिंत बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या खासदार निधीतून मंजूर झाली असून, यावेळी या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बारामती तालुक्यातील मोरगावच्या श्री मयूरेश्वराचे सपत्नीक मनोभावे दर्शन घेतले. बाप्पाच्या चर...
31/08/2026

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बारामती तालुक्यातील मोरगावच्या श्री मयूरेश्वराचे सपत्नीक मनोभावे दर्शन घेतले. बाप्पाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.

नमस्कार,https://www.facebook.com/share/v/18reEJrHMg/महाराष्ट्रात सध्या मतदार यादीशी संबंधित सुरु असलेली विशेष सखोल पुनरा...
31/08/2026

नमस्कार,

https://www.facebook.com/share/v/18reEJrHMg/

महाराष्ट्रात सध्या मतदार यादीशी संबंधित सुरु असलेली विशेष सखोल पुनरावलोकन (Special Intensive Revision) प्रक्रिया म्हणजेच SIR सुरु आहे. त्याअंतर्गत आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील २,५१५ मतदान केंद्रांवरील तब्बल २५ लाख ९६ हजार २५३ मतदारांसाठी SIR प्रक्रिया होत आहे.

या प्रक्रियेमध्ये मतदारांची एक महत्वपूर्ण यादी बनविण्यात आली आहे, त्या यादीला ASDD यादी म्हणतात. ASDD यादीत चार प्रकारचे मतदार आहेत.
A – Absent: म्हणजे असे मतदार जे शोधूनही सापडले नाहीत किंवा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
S – Shifted: म्हणजे असे मतदार जे दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले आणि परत मतदानाच्या मूळ ठिकाणी कधी आलेच नाहीत
D – Dead: म्हणजेच ज्यांचे निधन झाला आहे
D – Duplicate: म्हणजे एकाच मतदाराची एकापेक्षा जास्त वेळा मतदार यादीमध्ये नोंद आहे; म्हणजेच दुबार मतदार

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील ASDD ची विधानसभानिहाय यादी https://supriyasule.net/search-asdd-list/ या वेबसाईटवर उपलबध करून देण्यात आली आहे. याठिकाणी ASDD यादीतील मतदारांची नावे शोधण्यात मदत होणार आहे. यासोबतच SIR प्रक्रिये प्रक्रियेसंबधीची महत्वाची माहिती या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपले नाव तसेच कुटुंबातील इतर सदस्यांची नावे ASDD यादीमध्ये आहेत किंवा नाही, याची तातडीने तपासणी करावी. कारण या यादीमध्ये ज्यांची नावे असतील त्यांची नावे ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमधून वगळली जाणार आहेत.

त्यामुळे पात्र असूनही ज्या मतदारांची नावे ASDD यादीमध्ये आले असेल त्यांनी तातडीने फॉर्म क्रमांक ६ भरून आपल्या BLO कडे जमा करावा. तसेच या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी. आपल्या तक्ररींची तात्काळ दखल घेऊन ती नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येतील.

यासोबतच आपण निवडणूक आयोगाच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ वेबसाईटला देखील भेट देऊन अधिकची माहिती घेऊ शकता.

मतदान हा आपल्याला संविधानाने दिलेला अत्यंत महत्त्वाचा हक्क आहे. आणि हा हक्क बजावण्यासाठी अंतिम मतदार यादीमध्ये आपले नाव असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने जागरूक राहावे, व या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवावा.

धन्यवाद,
सुप्रिया सुळे

31/08/2026

Dada 💔
29/08/2026

Dada 💔

Address

Baramati Midc Area

Telephone

+918412031507

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yugendra Pawar Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share