16/08/2026
The Aviral Godavari Mission: An Overview
The Godavari has nourished hundreds of millions for centuries, but today, this sacred river runs dry for months at a time.
Since 2022,The Satsang Foundation and Namami Goda, guided by Sri M and Dr. Rajendra Singh, have driven the Aviral Godavari Mission, working step by step at the river's source on Brahmagiri, for lasting ecological change.
Our work includes recharging groundwater with loose boulder dams and check dams; restoring kunds and ponds; greening Brahmagiri with over 60,000 seeds and saplings planted by students, women's groups and citizens; fighting single-use plastic through clean-ups and prevention, and partnering with local communities, the Forest Department, and municipal bodies across Trimbak and Nashik.
Thousands have already joined hands. Join us or support us.
Connect: [email protected].
Contact: [email protected].
गोदावरीने शतकानुशतके कोट्यावधी लोकांचे पोषण केले आहे, परंतु आज ही पवित्र नदी कधी कधी कित्येक महिने कोरडी पडून राहते.2022 पासून, श्री एम. आणि डॉ. राजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली, “सत्संग फाउंडेशन” आणि “नमामी गोदा” यांनी, शाश्वत पर्यावरणीय बदल व्हावेत यासाठी, ब्रह्मगिरीवरील नदीच्या उगमस्थानावर टप्प्याटप्प्याने काम करत, अविरल गोदावरी अभियान चालवले आहे.
आपल्या या कामात 1)सुट्टे खडक वापरून केलेले बांध आणि चेक डॅम्स इत्यादींचा वापर करून भूजल पुनर्भरण करणे;2)कुंड आणि तलाव पुनर्संचयित करणे;3)विद्यार्थी, महिला गट आणि नागरिकांनी लावलेल्या बिया आणि रोपांनी ब्रह्मगिरीला हिरवेगार करणे;4)स्वच्छता आणि प्रतिबंधाद्वारे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकशी लढा देणे; आणि 5)त्र्यंबक आणि नाशिकमधील स्थानिक जनसमुदाय, वन विभाग आणि नगरपालिका संस्थांशी भागीदारी करणे या कार्यक्रमांचा समावेश आहे.
या अभियानात हजारो लोकांनी स्वयंसेवेसाठी आधीच हातमिळवणी केली आहे.एक स्वयंसेवक म्हणून आमच्यात सामील व्हा किंवा गोदावरीचा अविरल प्रवाह अखंडितपणे वाहण्यास मदत करण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेला पाठिंबा द्या.
गोदावरी, दक्षिण गंगा, नदीचे पुनरुज्जीवन करण्याच्या आमच्या प्रयत्नांना स्वयंसेवक म्हणून किंवा पाठिंबा देण्यासाठी देखील, आपण आमच्याशी संपर्क साधा.