16/08/2026
उत्कर्षालयातील विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची आवश्यकता होती. याबाबत श्री . संजीव साळी सर यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी ही गरज मनावर घेत आपल्या आदर्श विद्या मंदिर, कुळगाव, बदलापूर – १९८४ सालच्या इयत्ता दहावीच्या त्यांच्या बॅचमधील मित्रांशी संपर्क साधला.
या बॅचमधील काही मित्रांनी पुढाकार घेत उत्कर्षालयासाठी एक बंक बेड प्रेमपूर्वक भेट दिला. विद्यार्थ्यांच्या गरजेच्या वेळी मिळालेली ही मदत आपल्यासाठी मोलाची आहे.
या निमित्ताने या १९८४ बॅचमधील मान्यवर मित्रांनी आज उत्कर्षालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांच्याशी हितगुज केले आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या भेटीमुळे मुलांमध्येही आनंदाचे आणि आपलेपणाचे वातावरण निर्माण झाले.
आदर्श विद्या मंदिर, कुळगाव, बदलापूर – १९८४ च्या दहावीच्या बॅचमधील सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार! 🙏
मनापासून धन्यवाद! 🙏🌱