08/06/2025
शनिवार, ०७ जून २०२५ रोजी उमेद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या 'दत्तक पालक' योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय माजी वायू सैनिक श्री. दिपक परशुराम गद्रे सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना सैनिकी जीवन तसेच सैन्य दलात भरती होण्याच्या प्रक्रियेबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन दिले.
अनेक देणगीदारांच्या उदार प्रतिसादामुळे यंदा २५० हून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला. या उपक्रमासाठी योगदान दिलेल्या सर्व देणगीदारांचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार. 🙏