अनुकूल प्रयास फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य

  • Home
  • India
  • Aurangabad
  • अनुकूल प्रयास फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य

अनुकूल प्रयास फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य संवैधानिक हक्काचे संरक्षण, कायदेविषयक जनजागृती, जनसमस्या, प्रशासकीय सुधारणा, पर्यावरण संवर्धन ई.

✨🌹▫️🪷🪷🪷▫️🌹✨विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहितीपर पोस्टरचे अनावरणछत्रपती संभाजीनगर...
27/10/2025

✨🌹▫️🪷🪷🪷▫️🌹✨
विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहितीपर पोस्टरचे अनावरण

छत्रपती संभाजीनगर, दि. २७ ऑक्टोबर २०२५ – महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या (डीपीसीए) कार्यपद्धती, नागरिकांच्या कायदेशीर हक्कांबाबत आणि पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेची माहिती सामान्य जनतेपर्यंत सुलभपणे पोहोचविण्यासाठी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर आणि अनुकूल प्रयास फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात माहितीपर पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या उपक्रमामुळे पोलिस प्रशासनाविरुद्धच्या तक्रारींच्या प्रक्रियेबाबत जनजागृती होण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे माननीय अध्यक्ष मा.श्री.दिलीपजी शिरासाव साहेब यांनी भूषविले. या सोहळ्यास प्राधिकरणाचे माननीय सदस्य श्री.मिलिंदजी रा. बिलोलीकर साहेब आणि श्री.एम. के. भोसले साहेब (भा.पो.से.) उपस्थित होते. या व्यासपीठावरून पोलिस तक्रार प्राधिकरणाची भूमिका, त्याच्या कार्यपद्धती आणि नागरिकांना मिळणारे संरक्षण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सामान्य नागरिकांना प्राधिकरणाची माहिती सहज उपलब्ध करून देणे आणि कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. यामुळे पोलिसांविरुद्धच्या तक्रारींची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ होईल, असे मत अध्यक्ष श्री.शिरासाव साहेब यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्राधिकरणाचे माननीय सदस्य श्री.मिलिंदजी रा. बिलोलीकर साहेब यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी प्राधिकरणाच्या स्थापनेपासून आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला. "विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण हे नागरिकांच्या हक्कांचे रक्षक आहे. पोलिसांविरुद्धची कोणतीही तक्रार ही गोपनीयपणे आणि न्याय्य पद्धतीने हाताळली जाते. या माहितीपर पोस्टरमुळे गावोगावी, शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि तक्रारदारांना योग्य मार्गदर्शन मिळेल," असे श्री.बिलोलीकर साहेब म्हणाले.

अनुकूल प्रयास फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.अतुल गणेश बच्छाव यांनी कार्यक्रमाचे उद्देश आणि माहिती फलक लावण्याचे फायदे स्पष्ट केले. "अनुकूल प्रयास फाउंडेशन हे सामाजिक न्याय आणि कायद्याच्या जनजागृतीसाठी कार्यरत आहे. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणासोबतचा हा संयुक्त उपक्रम आम्हाला नक्कीच प्रेरणादायी व ऊर्जा देणारा आहे. या पोस्टरमुळे शहरी- ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस तक्रार प्रक्रियेची माहिती एका दृष्टीक्षेपात मिळेल. तक्रारदारांना प्राधिकरणाकडे थेट संपर्क साधण्यासाठी संपर्क क्रमांक आणि प्रक्रियेचे सोपे पाऊलदार मार्गदर्शन दिले आहे," असे ॲड. बच्छाव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, या फाउंडेशनने गेल्या काही वर्षांत अनेक सामाजिक जागृती मोहिमा राबवल्या असून, यापुढेही अशा उपक्रमांना प्राधान्य देणार आहोत.

कार्यक्रमात प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण हे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाखाली कार्यरत असून, पोलिस अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करणे, न्याय देणे आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. तक्रार दाखल करण्यासाठी, ई-मेल किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रक्रिया उपलब्ध आहे. याबाबतच्या कायद्यांनुसार नागरिकांना गोपनीयता, वेळेत न्याय आणि मोफत सल्ला यासारखे हक्क मिळतात. या माहितीपर पोस्टरमध्ये ही सर्व माहिती मराठी भाषेत सोप्या भाषेत सादर करण्यात आली असून, ते सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालय, पोलिस स्टेशन, शाळा-कॉलेज आणि सामाजिक संस्थांवर लावण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना अध्यक्ष मा.श्री. दिलीपजी शिरासाव यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले, "पोलिस हा लोकांचा मित्र आहे, पण काहीवेळा होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नागरिकांना न्याय मिळणे गरजेचे आहे. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण हे त्याच उद्देशाने स्थापन झाले आहे. या माहितीपर पोस्टरमुळे तक्रारदारांना प्रक्रियेची पारदर्शकता समजेल आणि पोलिस प्रशासनावर विश्वास वाढेल. आम्ही सर्व पातळीवर प्रयत्न करत आहोत की, प्रत्येक जिल्ह्यात अशा जागृती मोहिमा राबवाव्यात." श्री.शिरासाव यांनी या कार्यक्रमानिमित्त अनुकूल प्रयास फाउंडेशनचे कौतुक केले आणि भविष्यातील सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमास अनुकूल प्रयास फाउंडेशनचे सचिव ॲड. रामेश्वर दाढे, सहसचिव ॲड. देवकांत मेश्राम, कोषाध्यक्ष ॲड. राहुल जमदाडे, सदस्य ॲड. सुनील नाडे तसेच कार्यालयीन स्टाफ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन आणि आयोजन अत्यंत यथार्थवादी पद्धतीने करण्यात आले असून, सहभागींच्या प्रतिक्रियांनुसार हा उपक्रम यशस्वी झाला.

या उपक्रमामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता वाढेल आणि पोलिस तक्रार प्रक्रिया अधिक सुलभ होईल. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने यापुढेही अशा सामाजिक जागृती मोहिमा राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

11/09/2025

वारसा कायद्याबाबत प्रश्न व उत्तरा सह माहिती
मृत्युपत्र नसल्यास वारस कायदा लागू
प्रश्न:-माझ्या पतीने त्यांच्या स्वकमाईतून माझा एक फ्लॅट विकत घेतला होता, मी त्या फ्लॅटमध्येच राहते. मागील वर्षी माझ्या पतीचे निधन झाले. मात्र त्यांनी मृत्युपत्र करून ठेवलेले नव्हते. आम्हाला मूलबाळ नाही. आता हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मी एकटीच माझ्या पतीची कायदेशीर वारस असल्याने तो फ्लॅट माझ्या एकटीच्या मालकीचा झालेला असतानाही आता अचानक आमच्याशी कुठलेही संबंध न ठेवलेले माझे दीर म्हणत आहेत की त्यांच्या आईचा म्हणजेच, माझ्या सासूबाईंचाही त्या फ्लॅटमध्ये हिस्सा आहे. तर, माझ्या सासूबाईंना त्यात हिस्सा मिळेलहिस्सा
उत्तर:-तुमच्यासारखे प्रश्न अनेकांना पडत असतील. आपल्या मृत्युनंतर आपले कायदेशीर वारस कोण होतात याची अनेकांना माहिती नसते आणि त्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. संबंधित व्यक्तीच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोडपत्र, वाटप पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच एखाद्या मिळकतीच्या मालकीहक्कात बदल होऊ शकतो. तर, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकीहक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन) तबदील होऊ शकतो. खरेदीखत, बक्षीसपत्र, मृत्युपत्र याद्वारे मिळालेली मिळकत ही त्या व्यक्तीची स्वष्टार्जित/स्वतंत्र मिळकत धरली जाते.मात्र एखादा हिंदू पुरुष आणि महिला मृत्युपत्र न करता मरण पावले तर त्यांच्या स्वकष्टार्जित संपत्तीची विभागणी वेगवेगळ्या तरतुदीं प्रमाणे होते. यासाठी ढोबळ मानाने वारसांची क्लास-१ हेअर्स (वारस) आणि क्लास-२-हेअर्स (वारस) अशी विभागणी केलेली आढळते.
हिंदू पुरुष आणि मिळकतीचे विभाजन एखादा हिंदू पुरुष मृत्युपत्र न करता मरण पावल्यास त्याची स्वकष्टार्जित मिळकत ही हिंदू वारसा कायद्याच्या कलम ८ अन्वये सर्व प्रथम क्लास-१ हेअर्स ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने त्याची पत्नी, मुलगा-मुलगी (मुले), आई, मुलगा-मुलगी आधीच मृत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे), मुलाची विधवा पत्नी (सून) इत्यादींचा समावेश होतो. या वारसांना समान पद्धतीने मिळेल आणि जर का क्लास-१ वारसांपैकी कोणीही नसेल, तर मग क्लास-२ वारसांकडे अशी संपत्ती जाते. क्लास २ हेअर्समध्ये प्रामुख्याने वडील, मुलाच्या किंवा मुलीच्या मुलीचा मुलगा किंवा मुलगी (पतवंडे), भाऊ बहीण, चुलते इत्यादींचा समावेश होतो. तुम्हाला मूलबाळ नाही. त्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे क्लास १ हेअर्समध्ये तुमच्यासह तुमच्या सासूबाईंचादेखील समान अविभक्त हिस्सा निर्माण झाला आहे.
तुमच्या पतीने त्यांच्या हयातीमध्ये मृत्युपत्र (विल) करून ठेवले असते तर त्या मृत्युपत्राने कदाचित तुम्हाला त्यांनी मिळकत दिली असती असे समजू, परंतु आता मृत्युपत्र केले नसल्याने हिंदू वारसा कायदा लागू होऊन तुमच्यासह तुमच्या सासूबाईंचाही क्लास-१ वारस म्हणून या फ्लॅटमध्ये समान अविभक्त हिस्सा निर्माण झाला आहे. त्यामुळे तुमच्या दिरांचे म्हणणे कायद्याला धरून आहे. आईच्या मृत्युनंतर तिचा हिस्सा आपल्याला मिळेल असा विचार ते करत असतील. भावनिकदृष्ट्या किंवा नैतिकतेने आपण एकट्या मालक आहोत, असे तुम्हाला वाटणे संयुक्तिक आहे. परंतु न्यायालयात भावनांना थारा नसतो. पैसा - संपत्ती आली की नातेसंबंध दुरावतात हेही कटू सत्य आहे. तुमच्यात परस्पर संमतीने तडजोड झाली तर उत्तम. मात्र तुमच्याकडे फ्लॅटचा ताबा असल्याने काळजीचे कारण नाही. कारण ताबा असेल तर १० पैकी ९ मार्क असे कायद्यात म्हणतात. त्यामुळे तुमच्या फ्लॅटचा ताबा हवा असेल तर तुमच्या सासूबाईंना तुमच्याविरुद्ध वाटपाचा दावा करावा लागेल आणि त्याला जो वेळ लागेल तो लागेल. असो.
तुमच्या प्रश्नामुळे केसमुळे मृत्युपत्राचे महत्त्वदेखील अप्रत्यक्ष अधोरेखित झाले आहे. मृत्युपत्र केले असेल तर वारसा कायद्याला बगल देता येते. Will is made to give go-bye to the normal line of succession असे कायदेशीर वचन आहे. त्यामुळे तुम्ही कमीतकमी आता तुमच्या हिश्श्यापुरते तरी मृत्युपत्र करून ठेवा. अन्यथा हिंदू वारसा कायदा कलम १५ प्रमाणे ही मिळकत नवऱ्याकडून आली असल्याने आणि तुम्हाला मूलबाळ नसल्याने अशी मिळकत तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या नवऱ्याच्या वारसांकडे, पर्यायाने सासूबाई किंवा दीर यांच्याकडे जाईल

Adv.R.Y.Dadhe
Mob.no.9673106346

धन्यवाद सरकार    #अनुकूलप्रयासफॉउंडेशन        #छत्रपतीसंभाजीनगरमहानगरपालिका
19/08/2025

धन्यवाद सरकार

#अनुकूलप्रयासफॉउंडेशन



#छत्रपतीसंभाजीनगरमहानगरपालिका

गुंठेवारी नियमित करण्याकरिता खालील कागदपत्रे सादर करावी लागतील ...
06/08/2025

गुंठेवारी नियमित करण्याकरिता खालील कागदपत्रे सादर करावी लागतील ...

शिक्षण विभागात येत्या काळात क्रांती चे लक्षण    #अनुकूलप्रयासफॉउंडेशन
06/08/2025

शिक्षण विभागात येत्या काळात क्रांती चे लक्षण

#अनुकूलप्रयासफॉउंडेशन


मालमत्ता खरेदी करतांना वकिलांचा सल्ला घेणे म्हणजे आपण भविष्यात होणारी फसवणूक टाळू शकतो ( कायदेशीर मार्गदर्शनाचे महत्व ) ...
06/08/2025

मालमत्ता खरेदी करतांना वकिलांचा सल्ला घेणे म्हणजे आपण भविष्यात होणारी फसवणूक टाळू शकतो ( कायदेशीर मार्गदर्शनाचे महत्व )


#अनुकूलप्रयासफॉउंडेशन

छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमण काढतांना प्रशासनाने पूर्व सूचना व वेळ न देण्याचे दुष्परिणाम व नागरिकांचे हाल! याला जब...
30/07/2025

छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिक्रमण काढतांना प्रशासनाने पूर्व सूचना व वेळ न देण्याचे दुष्परिणाम व नागरिकांचे हाल! याला जबाबदार कोण?



#अनुकूलप्रयास

#अनुकूलप्रयासफॉउंडेशन

#छत्रपतीसंभाजीनगरमहानगरपालिका

 #पर्यटन
28/07/2025

#पर्यटन

जागतिक पर्यटन केंद्र, आपले छत्रपती संभाजीनगर  #अनुकूलप्रयासफॉउंडेशन     #अनुकूलप्रयास
28/07/2025

जागतिक पर्यटन केंद्र, आपले छत्रपती संभाजीनगर
#अनुकूलप्रयासफॉउंडेशन


#अनुकूलप्रयास










Address

Chhatrapati Sambhajinagar
Aurangabad
431003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अनुकूल प्रयास फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share