Shrimati Gangubai Raghoji Salve Charitable Trust

Shrimati Gangubai Raghoji Salve Charitable Trust Smt. Gangubai Raghoji Charitable Trust is one of the leading charitable trust working for development of Culture and heritage values in villages of Maharashtra.

*अजिंठा बुद्ध लेणी कोणी बांधली? कशासाठी बांधली? व कुणास अरपण केली? याचे स्पष्टीकरण देताना भदंत हर्षबोधी यांनी धम्म गंगा ...
29/10/2025

*अजिंठा बुद्ध लेणी कोणी बांधली? कशासाठी बांधली? व कुणास अरपण केली? याचे स्पष्टीकरण देताना भदंत हर्षबोधी यांनी धम्म गंगा बुद्ध विहाराच्या निर्मितीच्या उद्देश जाहीरपणे सांगितला*
धम्म गंगा बुद्ध विहार येथे पूज्य भदंत विपश्य दीपंकर यांच्या वर्षावास व अधिष्ठान समाप्ती निमित्त आयोजित कठीण चीवरदान व डॉ. एम एस जांभळे लिखित "संविधानाच्या जागर" ह्या लघु नाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
ह्याप्रसंगी पूज्य भदंत डॉ. एम सत्यपाल महाथेरो, डॉक्टर हर्षबोधी महाथेरो, भंते राहुल थेरो आणि मोठ्या संख्येने जवळपास 23 जणांचा भिक्खु संघ तीन जणींचा भिकुनी संघ व जळगाव सपकाळ, डोंगरगाव, मोडाळा, करजगाव, पिंपळगाव, डोंगरी, हिसोडा, रेलगाव, जामठी व इतर गावातून साधारण पाच सहाशे उपासक उपासिका उपस्थित होत्या.
याप्रसंगी अध्यक्ष डॉ. एम सत्यपाल महाथेरो यांनी सुंदर धम्मदेशना दिली की धम्माचरण, शिलाचरण व बुद्ध विहाराची निर्मिती ही बौद्ध संस्कृती आहे. ती सर्वांनी जपली पाहिजे. भदंत हर्षबोधी महाथेरो यांनी आपली धम्मदेशना देताना सांगितले की अजिंठा बुद्ध लेणी ही अरहंताची भूमी आहे. या लेणीचे बांधकाम इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन 650 पर्यंत म्हणजे साडेसातशे वर्षे चालले. या वास्तूसाठी वाकाटक, सातवाहन, चोल व चालुक्य इत्यादी राजघराण्यांनी या लेणीच्या निर्मितीसाठी मोठे योगदान दिले आहे. तसेच या भूमीत अनेक अरहंत होऊन गेलेले आहेत. त्यांचा इतिहास जरी आज पुसला असला तरी या भागात ध्यानाचे तरंग साधना करीत असताना स्पष्ट जाणवतात. याच भूमीच्या पुण्याईने श्री साळवे साहेबांच्या प्रयत्नाने हे धम्म गंगा बुद्ध विहार होत असले, तरी मूळतः या भूमीचाच तो वारसा आहे. या कार्याच्या निमित्ताने पुढे पुढे जात आहे याचे सर्वांनी अनुमोदन केलं पाहिजे.
कार्यक्रमात अनेक भिक्खूंचे धम्म प्रवचन व डॉ. एम एस जांभळे लिखित संविधानाच्या जागर हे लघु नाट्य सादर करण्यात आले. या लघु नाट्याचा उद्देश जनमानसात भारतीय राज्यघटनेचे महत्त्व वाढावे ती प्रत्येकाने समजून घ्यावी हे होय.
या कार्यक्रमाचे आयोजक आयुष्यमान कृष्णाजी साळवे यांच्याकडून विशेष अतिथी म्हणून भदंत विपसी दिपांकर यांचा सन्मान करण्यात आला तसेच भिक्खु संघाकडून कठीण चीवर दान करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉ. अनिल मगर सर यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून जळगाव सपकाळ येथील बौद्ध उपासक उपासिका विशेष करून गोविंद साळवे राजेंद्र साळवे साहेबराव साळवे निलेश साळवे दिलीप साळवे दादाराव साळवे भगवान साळवे अनिल साळवे संतोष दांडगे सुरडकर मगरे आणि औरंगाबाद येथील धम्मपाल तसेच अजून काही जणांनी मेहनत घेतली.

23/09/2025

सप्रेम जय भीम नमो बुद्धाय
धम्मगंगा बुद्ध विहार जळगाव सपकाळ येथील बांधकामाची आजची प्रगती
कृष्णाजी साळवे

सप्रेम जय भीम नमो बुद्धाय, आज दिनांक पाच सप्टेंबर 2025 रोजी धम्म गंगा बुद्ध विहारांमध्ये बदलत विपस्सी दीपंकर यांच्या मार...
05/09/2025

सप्रेम जय भीम नमो बुद्धाय,
आज दिनांक पाच सप्टेंबर 2025 रोजी धम्म गंगा बुद्ध विहारांमध्ये बदलत विपस्सी दीपंकर यांच्या मार्गदर्शनाखाली लहान लहान मुलांनी येऊन सहभोजन आणि आनापान ध्यान साधनेचा अभ्यास केला.
मंगल हो!!!

Address

Padmpani, Sai Park Society, N-7 Cidco Aurangabad
Aurangabad

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 1pm

Telephone

+91 75886 80801

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrimati Gangubai Raghoji Salve Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shrimati Gangubai Raghoji Salve Charitable Trust:

Shortcuts

Share