Voice for speechless

Voice for speechless hello,
friends we started for animal help club in aurangabad Maharashtra . we work for animals help in accident and adoption
rescue team VFS

17/03/2025
ARV Vaccine camp completed and news published by Lokmat as well as getting too much appreciated by all of you...Thank yo...
11/09/2024

ARV Vaccine camp completed and news published by Lokmat as well as getting too much appreciated by all of you...
Thank you for supporting...


आज झालेल्या लसीकरनाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, प्रमुख पाहुणे म्हणून आलेले रंगनाथ काळे जी ह्यांनी आमच्या समूहाला ख...
08/09/2024

आज झालेल्या लसीकरनाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,
प्रमुख पाहुणे म्हणून आलेले रंगनाथ काळे जी ह्यांनी आमच्या समूहाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या त्या खेरीज भविष्यात जिथे कुठे मदतीची गरज भासेल तिथं उभे असू अस सुद्धा त्यांनी संगीतल...
सर्व VFS टीम चे धन्यवाद 🙏🏻

07/09/2024
प्राणी सेवा हीच ईश्वर सेवा...अमेरिकेने संगणक प्रणाली भारताला देण्यास नकार दिल्यावर आपण संगणक कसा बनवावा किंवा कोण बनवेल ...
23/12/2023

प्राणी सेवा हीच ईश्वर सेवा...

अमेरिकेने संगणक प्रणाली भारताला देण्यास नकार दिल्यावर आपण संगणक कसा बनवावा किंवा कोण बनवेल याची चिंता असताना त्या वेळचे म्हणजेच माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी डॉ विजय भाटकर सर यांना ती जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती पार पाडत सुपरफास्ट संगणक परम बनवून देशाला सुपूर्द केला.
आज त्यांचं वय ७७ वर्ष असून त्यांनी देशासाठी केलेल्या ह्या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री (२०००), पद्मभूषण (२०१५), महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण (२०००), विश्वरत्न पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले.
त्यांचे चिरंजीव नचिकेत विजय भाटकर यांच्या विवाहाचे औचित्य साधून थोडी प्राणी सेवा व्हावी ह्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील Voice For Speechless या NGO च्या सहकार्याने त्यांनी भटक्या गाय, भटकी कुत्रे यांना अन्नदान केले.
त्या शिवाय बऱ्याच वेळ चर्चा करत त्यांनी संपूर्ण Voice For Speechless च्या संपूर्ण टीम चे कौतुक केले व असेच कार्य प्राण्यांसाठी करत राहावे या साठी शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण Voice For Speechless कडून अश्या महान वैज्ञानिक पद्मश्री, पद्मभूषण डॉ विजय भाटकर सरांच्या कार्याला सलाम...
या कार्यक्रमास उपस्थित असलेले दर्शवणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे, लातूर येथील साखर कारखान्याचे संस्थापक यशवंत पाटील ही सोबत होते.
या वेळी Voice For Speechless कडून गोकुळ पाटील, सर्पमित्र सागर कसाब, सर्पमित्र श्रीकांत वाहूळे, रोहित राठोड, जफर शेख, प्रतीक जाधव, तन्मय पाठक, वरून शिंदे ह्या सर्वांनी सहकार्य करून कार्य पूर्णत्वास नेऊन अजून एक प्राणी सेवेचा वसा घेत अविरत कार्य करत राहील असा प्रण घेतला...

Voice For Speechless
A team for the animal rescue and animal care ❤️

दिनांक - २३/१२/२०२३
स्थळ - मोंढा, छत्रपती संभाजीनगर

03/09/2023

The Rescuer ❤️

सुप्रभात मित्रांनो खूप दिवसांपासून एक पोस्ट करायची होती पण दुर्भाग्य ती करता आली नाही पण या मपोस्ट च्या माध्यमातून तुम्ह...
03/12/2022

सुप्रभात मित्रांनो खूप दिवसांपासून एक पोस्ट करायची होती पण दुर्भाग्य ती करता आली नाही पण या मपोस्ट च्या माध्यमातून तुम्हाला जे सांगणार आहे ते वाचा आणि प्रतिक्रिया द्या.
संभाजीनगर (औरंगाबाद ) मध्ये आमच्या Voice For Speechless संस्था काम करत आहे. आम्ही बरेच रेस्क्यू केलेले आहेत बरेच stray cat, stary डॉग, पक्षी, माकड, आणि बऱ्याच प्रकारचे रेस्क्यू आम्ही केलेत.

आता नवीन आलेल्या लम्पि व्हारायस च्या प्रकोपणे संपूर्ण भारत हदरलेला आहे, त्या लम्पि साठी सुद्धा आम्ही #लसीकरण केले ज्यात 1000 पेक्षा गायीचं लसीकरण आमच्या NGO मार्फत करण्यात आले.

त्या नंतर आम्ही एक shelter उभारून ज्या गायी लम्पि ने ग्रस्त आहेत त्यांच्या साठी काम करणार होतो, पण आपलेच काही लोक ज्यांना एक गोष्ट समजली की जर तुमची गाय #लम्पि ने गेली तर सरकार कडून तुम्हाला ४५०००/- रु नुकसान भरपाई मिळणार आहे. आम्ही खूप तयारी केली, अक्षरशः आमच्या NGO ला आर्थिक मदतीची गरज असल्यामुळे पोस्ट करणार पण तितक्यात हा प्रकार घडला आणि आम्ही केलेल्या सर्व कामाचा काही ही उपयोग झाला नाही असं आम्हाला वाटायला लागलं.
पण एक सुख आणि आनंद मिळाला आम्ही ज्या गायीचं लसीकरण केलं त्या सुखरूप आहेत.
पण बाकीच्या गायी लोक द्यायला तयार झाले नाहीत.
या मध्ये आपले सुद्धा बरेच लोक सहभागी आहेत गाय मेली तर मारू द्या पण सरकार देत असलेले ४५०००/- मात्र सुटायला नको. ही रक्कम एका गायी पेक्षा खूप मोठी त्यांना वाटू लागली आहे.
ह्या फोटोत दर्शवलेला फोटो सर्व काही सांगून जातो आमचे प्रतिनिधी Govind Inamdar यांनी हा फोटो काढलेला आहे.
दूध उत्पादक शेतकरी तसेच व्यवसायिक देसी गाय गेल्यानंतर मिळणाऱ्या ४५०००/- संकरित गाय विकत घेत आहेत.

किती त्रास आणि वेदना आम्हाला हे बघुन झालं ते आमचं आम्हाला माहीत आहे, काम करून सुद्धा लोकांनी या प्रकारे वागणूक त्या मुक्या गायी ला हे लोक देत आहेत.

या पुढे संभाजीनगर (औरंगाबाद) येथे कुणाला ही लम्पि पीडित गाय दिसली तर आम्हाला संपर्क करावा उपचार आम्ही करू.

ज्यांना शक्य असेल त्यांनी आमच्या NGO साठी आर्थिक मदत म्हणून होईल ती रक्कम phone pe, google pe किंवा कुठल्या ही माध्यमातून पाठवू शकता.

कृपया आम्ही काय काय काम केलीत या साठी आमच्या voice for speechless या page ला जाऊन बघू शकता आणि खात्री करून घेऊ शकता.

आर्थिक मदतीसाठी नंबर - 99705 21506
याच नंबर ला कॉल करून लम्पि साठी लागणारी औषधे सुद्धा तुम्ही आमच्या कडून घेऊ शकता किंवा आम्हाला कळवू शकता.

page Link - https://www.facebook.com/profile.php?id=100072068662783&mibextid=ZbWKwL

Instagram Link - https://instagram.com/voice_forspeechless?igshid=YmMyMTA2M2Y=

काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीचा कॉल आला होता,एका व्यक्तीने ३ मांजराची पिल्लं सोडून दिलं एक तिच्या घराच्या जवळ सोडलं होत...
11/11/2022

काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीचा कॉल आला होता,
एका व्यक्तीने ३ मांजराची पिल्लं सोडून दिलं एक तिच्या घराच्या जवळ सोडलं होत, पण दुसरा व्यक्ती तिला ही सांभाळू देत नव्हता आणि तो ही सांभाळत नव्हता.
मला जेव्हा कॉल आला तेव्हा मी त्याला घेऊन
जरा खराब होती परिस्थिती पण डॉक्टर ला दाखवून आणि औषधी देऊन आता शेजारी Adopt ला दिल आहे.

तर सांगण्याचा तात्पर्य अस की जर तुम्ही सांभाळत नसाल आणि दुसरं कुणी तयार असेल तर त्याला तरी देऊन टाकावं उगाच मुक्या प्राण्याला अस रोड वर सोडून देऊ नका.

Voice for speechless

17/09/2022

विनंती - पूर्ण पोस्ट नक्की वाचा

देशात पशुपालन मोठ्या शेतकरी वर्गाचे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, त्यावर सध्या लम्पी नावाच्या संसर्गजन्य रोगाने ग्रहण लावले आहे. या आजारामुळे देशभरात 57 हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. देशात अनेक राज्यांमध्ये लंपी स्कीनचा कहर वाढत चालला आहे. देशात 15 राज्यांत 175 जिल्ह्यांमध्ये #लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. #15लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे.
तर आत्तापर्यंत #57हजार गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. #लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्ये उपाययोजना तसेच लसीकरण करण्यात येत आहे. सध्या लंपीचा संसर्ग एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पसरत असल्याचे चित्र दिसत आहे.या आजारामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या आजारामुळे जानावरांच्या शरिराला गाठी येतात, हा व्हायरस खुप वेगाने पसरत आहे. या आजारात राजस्थान, यूपी, बिहीर, मध्य प्रदेश, आणि महाराष्ट्रात पसरला आहे. या व्हयरसची लक्षणे लागण झाल्यानंतर काही दिवसांनंतर दिसून येतात.
काय आहे लंपी व्हायरस 2019 मध्ये प्रथम भारतात या व्हायरसची लागण झाली होती. हा त्वचाचा रोग आहे, यामुळे जनावरांच्या शरिराला गाठी येतातट आणि पुढे त्या गाठींचा आकार मोठी होतो, हा व्हायरस जास्त वेगाने दुसऱ्या जनावरांमध्ये #संक्रमीत होतो.
सांगितल जात आहे की हा आजार मच्छरा चावल्या मुळे होतो.
#लंपी व्हायरसची #लक्षणे -
लंपी या आजाराच्या लक्षणांमध्ये प्रथम जनावरांना ताप येतो. त्यांचे वजन कमी होते, जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी टिपकते, तोंडातून लाळ पडते, शरिरावर छोट्या गाठी यायला लागतात.
जानावर दूध कमी देते, यामुळे जनावरांची तब्येत जास्त खराब होते.
लंपी व्हायरसवर उपाय - लंपीची लागण झालेल्या जनानरांना वेगळे ठेवा.
माश्या, डास, गोचीड यांना मारून टाका.
जनावराचा मृत्यु झाल्यास मृतदेह मोकळ्या जागेवर नसोडता पुरून टाकावा किवा जाळून टाकावा.
संपुर्ण गोठ्यात कीटकनाशक फवारावे, या व्हायरसची लागन झालेल्या जनावरांचा मृत्यु होतो.

आज खरंच खूप मनासारखे काम झाले आहे.
सूर्वात थोडी कठीण नक्कीच होती पाऊस चिखल दग दग पण या गोष्टी टीम ला ना कधी कोणी थांबवु शकला ना कधी थांबवेल 💪
#प्राण्यांच्या #प्राणा साठी जो स्वतःच्या प्राणाची परवाह न करता अविरत कार्य करत असतात ...

आजच्या उपक्रमात उपस्थिती सदस्य - रोहित राठोड, किरण सुरे, जफर शेख, कैसर शेख, सुमित इंगळे, आदित्य देशमुख, प्रतिक जाधव, प्रमोद वाघ, गोविंद इनामदार, राजपूत मॅडम

...
Team - VFS 💪

Address

Aurangabad

Telephone

+919970521506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Voice for speechless posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Voice for speechless:

Share