SFI Aurangabad

SFI Aurangabad SFI Chh.Sambhajinagar is the official page of SFI district committee which works under the banne

NEET UG 2026 च्या प्रश्नपत्रिका फुटीविरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे SFI चे आंदोल...
19/05/2026

NEET UG 2026 च्या प्रश्नपत्रिका फुटीविरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे SFI चे आंदोलन!

छत्रपती संभाजीनगर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) जिल्हा समितीच्या वतीने NEET UG 2026 च्या प्रश्नपत्रिका फुटीविरोधात दि. १३ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता विद्यापीठ गेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी “NTA बरखास्त करा, विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत केंद्र सरकार आणि NTA विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

NEET UG 2026 परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटीमुळे देशभरातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आल्याचा आरोप एसएफआय च्या वतीने करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच NTA बरखास्त करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.

एसएफआय चे अरुण मते यांनी सांगितले की,भाजप सरकार विद्यार्थ्यांच्या आकांक्षांची लूट करत असून शिक्षण क्षेत्रात सातत्याने होत असलेला भ्रष्टाचार आणि परीक्षा व्यवस्थेतील निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत होत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत होणारा हा अन्याय थांबवण्यासाठी एसएफआय पुढेही तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी कॉम्रेड नितीन वाव्हळे, रोहिणी नवले, एसएफआय जिल्हा अध्यक्ष सुरज देवकर, जिल्हासचिव मनिषा बल्लाळ, शितल चोपडे, विजय उमाळे, प्रदीप तेलंग, सलमान खान, जीवन मोरे, प्रकाश ढाले, गणेश अमरूळे,आतिक्षा लांडगे,प्रतिक्षा लांडगे व शहरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



दिनांक 01 मे 2026 रोजी जागतिक कामगार दिनी होणाऱ्या SFI छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिवेशनाच्या पोस्टरचे अनावरण डॉ. बाबासाहेब...
30/04/2026

दिनांक 01 मे 2026 रोजी जागतिक कामगार दिनी होणाऱ्या SFI छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिवेशनाच्या पोस्टरचे अनावरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी करण्यात आले.

यावेळी SFI छ. संभाजीनगर जिल्हाध्यक्ष मनिषा बल्लाळ, जिल्हा सचिव अरुण मते, साथी सलमान, साथी विजय, साथी प्रदीप व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.



✊🏾✊🏾✊🏾
09/04/2026

✊🏾✊🏾✊🏾


मराठी भाषा गौरव दिन || २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या सदिच्छा! 💐✨
27/02/2026

मराठी भाषा गौरव दिन || २७ फेब्रुवारी

मराठी भाषा गौरव दिनाच्या सदिच्छा! 💐✨

महान समाजवादी क्रांतिकारक, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे संघटक शहीद कॉम्रेड चंद्रशेखर आझाद यांना हौतात्म्य दि...
27/02/2026

महान समाजवादी क्रांतिकारक, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे संघटक शहीद कॉम्रेड चंद्रशेखर आझाद यांना हौतात्म्य दिनी SFI छत्रपती संभाजीनगर जिल्हा समितीच्या वतीने क्रांतिकारी अभिवादन!

#आझाद #शहादत_दिन

एसएफआय  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ४१ वे युनिट अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न!अधिवेशनात युनिट अध्यक्ष म...
26/02/2026

एसएफआय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ४१ वे युनिट अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न!

अधिवेशनात युनिट अध्यक्ष म्हणून जीवन कुमार तर सचिव म्हणून शीतल चोपडे यांची एकमताने निवड.

छ.संभाजीनगर (ता.२६) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ युनिट चे ४१ वे अधिवेशन आज दिनांक २६ फेब्रुवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लेणी परिसरात संपन्न झाले. अधिवेशनाची सुरुवात एसएफआय च्या लाल रंगात स्वातंत्र्य-लोकशाही-समाजवाद हे शब्द व लाल तारा असलेल्या सफेद झेंड्याचे ध्वजारोहण करून व शहीद भगतसिंग यांना अभिवादन करून करण्यात आली.

अधिवेशनाचे उद्घाटन एसएफआय माजी नेते प्राचार्य योगेश खोसरे यांनी केले. उद्घाटकीय संबोधनात प्राचार्य योगेश खोसरे यांनी अधिवेशनास 'विद्यार्थी चळवळीसमोरील आव्हाने' या विषयावर मार्गदर्शन केले. तर एसएफआय चे माजी नेते डॉ. लोकेश कांबळे यांनी अधिवेशनाला सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी एसएफआय छ. संभाजीनगर जिल्हाध्यक्ष मनिषा बल्लाळ व जिल्हा सचिव अरुण मते यांची प्रमुख उपस्थिती होती. अधिवेशन उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान गीतिका औटे यांनी भूषवले.

अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्रात संघटनेचा कार्यात्मक, संघटनात्मक, आंदोलनात्मक आणि शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल मांडण्यात आला. यावेळी अधिवेशनात वेगवेगळे ठराव पारित करण्यात आले.१)नविन शैक्षणिक धोरण २०२० हाणून पाडा.२)विकसित भारत शिक्षा अधिष्ठान बिल रद्द करा.३)युजिसी इक्विटी रेगुलेशन २०२६ लागू करा.४) विद्यापीठात मूलभूत सोयीसुविधांसाठी लढा तीव्र करणार.५) संघटनात्मक बांधणीसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमांवर भर देणार. इत्यादी ठराव एकमताने पारित करण्यात आले.

या अधिवेशनाने एसएफआयची १९ सदस्यीय नवीन विद्यापीठ युनिट ची निवड केली. यामध्ये नवनिर्वाचित युनिट अध्यक्ष म्हणून जीवन कुमार आणि युनिट सचिव म्हणून शीतल चोपडे यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून वर्षा कदम, सहसचिव म्हणून प्रकाश ढाले तर कोषाध्यक्ष म्हणून प्रदीप तेलंग व सचिव मंडळ सदस्य म्हणून विजय उमाळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

अधिवेशनात विद्यापीठाच्या विविध विभागाचे विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले होते. अधिवेशन यशस्वीतेसाठी सलमान खान, प्रिया झोरे, आदित्य लांडगे सुमित देशमाने इ. कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अधिवेशनाचा समारोप क्रांतिकारी गीताने करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आणि रेड बुक डे निमित्त एसएफआयचे सामूहिक वाचनछत्रपती संभाजीनगर : दि. २१ फेब्रुवारी रोजी आंतररा...
22/02/2026

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आणि रेड बुक डे निमित्त एसएफआयचे सामूहिक वाचन

छत्रपती संभाजीनगर : दि. २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आणि रेड बुक डे च्या निमित्ताने स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर येथे सामूहिक वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल अभिमानाची भावना निर्माण व्हावी तसेच वाचन संस्कृतीला चालना मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा दरवर्षी UNESCO च्या पुढाकाराने साजरा केला जातो. भाषिक विविधता जपणे आणि मातृभाषांचे संवर्धन करणे हा या दिनाचा मूलभूत हेतू आहे.
तसेच रेड बुक डे निमित्त सामाजिक परिवर्तन, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि समतावादी विचार मांडणाऱ्या "नवयुवक राजनीतिक कार्यकर्ताओं के नाम पत्र" या भगतसिंग यांच्या लेखाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी भाषिक विविधतेचे महत्त्व, संविधानिक मूल्ये आणि वाचन संस्कृती याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. “मातृभाषा ही आपल्या ओळखीचा पाया आहे. तिचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून भविष्यात अशा प्रकारचे वाचन उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार एसएफआयच्या वतीने व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमात एसएफआयच्या जिल्हा अध्यक्ष मनिषा बल्लाळ, जिल्हा सचिव अरुण मते, विजय उमाळे, सलमान खान, प्रदीप तेलंग, जीवन मोरे, प्रकाश ढाले, कुमार आशितोष, शितल चोपडे, वर्षा कदम तसेच विद्यापीठातील विविध विभागांतील विद्यार्थी उपस्थित होते.




शेतमजूर युनियनचे बीड जिल्हा सहसचिव व एसएफआयचे माजी कार्यकर्ते कॉ. पंडित शिंदे यांचे दुःखद निधन.विनम्र अभिवादन💐💐💐💐💐शेतमजू...
17/02/2026

शेतमजूर युनियनचे बीड जिल्हा सहसचिव व एसएफआयचे माजी कार्यकर्ते कॉ. पंडित शिंदे यांचे दुःखद निधन.

विनम्र अभिवादन
💐💐💐💐💐

शेतमजूर युनियनचे बीड जिल्हा सहसचिव व परळी तालुका सचिव व एसएफआयचे माजी कार्यकर्ते कॉम्रेड पंडित शिंदे (वय ४१) यांचे आज सकाळी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले. मागील आठ दिवसा पासून अपघातानंतर त्यांच्यावर उपचार चालू होते.

पंडित शिंदे विद्यार्थी दशेपासून चळवळीमध्ये सक्रिय होते. शालेय जीवनात व पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये SFI चे काम केले. विद्यार्थी - युवक संघटना नंतर त्यांनी शेतमजूर युनियन चे काम सुरु केले. २०२५ मध्ये सिरसाळा येथील जिल्हा अधिवेशनात त्यांची जिल्हा सहसचिव पदी निवड झाली.

मूळ मोहा गावचे असलेले शिंदे हे मागील अनेक वर्षापासून सीरसाळा येथे उदरनिर्वासाठी राहत होते. रोजंदारीने झाड तोडत असताना अंगावर पडल्याने त्यांना मल्टिपल फ्रॅक्चर्स झाले होते. उपचार दरम्यानच आज सकाळी सहा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भावंडे असा परिवार आहे. अंत्यविधी आज सायंकाळी मोहा या गावी होणार आहे.

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया शिंदे कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सहभागी आहे.

कॉ. पंडित शिंदे यांना अखेरचा लाल सलाम.
विनम्र अभिवादन.

  ✊🏾✊🏾✊🏾
03/01/2026


✊🏾✊🏾✊🏾

Address

Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when SFI Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to SFI Aurangabad:

Shortcuts

Share