SRT Marathwada Research Institute

SRT Marathwada Research Institute Swami Ramanand Teerth Marathwada Institute of Socio-Economic Research and National Integration – A non profit Organization registered under Public Trust Act.

This page is Social Connect initiative of the Institute. Based in Aurangabad, Maharashtra.

01/05/2026
*महाराष्ट्र दिन*  *ध्वजारोहण* एस आर टी संशोधन संस्थेच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले....
01/05/2026

*महाराष्ट्र दिन* *ध्वजारोहण*
एस आर टी संशोधन संस्थेच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले.

उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते
स्वावलंबी भारत अभियानाचे समन्वयक
*श्री. मिलिंद पोहनेरकर* यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले .

18/04/2026
दुःखद…..!लातूर पॅटर्न चे जनक माजी खासदार , माजी कुलगुरू, ज्येष्ठ साहित्यिक जनार्दनजी वाघमारे यांचे  निधन झाले आहे. सरांच...
02/03/2026

दुःखद…..!

लातूर पॅटर्न चे जनक माजी खासदार , माजी कुलगुरू, ज्येष्ठ साहित्यिक जनार्दनजी वाघमारे यांचे निधन झाले आहे. सरांच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सरांना एस आर टी संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!
सरांचा अंत्यविधी उद्या मंगळावर, दि. ०३/०३/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता कवठा येथे त्यांच्या शेतात संपन्न होणार आहे.
▪️

डॉ. वाघमारे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला. उस्मानिया विद्यापीठ (बीए), पुणे विद्यापीठ (एमए), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (पीएचडी) (एलएलबी) (एलएलएम), पंजाबी विद्यापीठ, पटियाला (डी. लिट) येथे त्यांनी शिक्षण पूर्ण केले.

डॉ. वाघमारे यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषेत विपुल लेखन केले. वैचारिक लेखनाबरोबरच कादंबरी, प्रवास वर्णन, आत्मचरित्रात्मक कादंबरी, व्यक्तिचित्रण, ललित, अनुवाद असे साहित्याचे विविध प्रकार प्रभावीपणे हाताळले.

डॉ. वाघमारे यांचा मूळ पिंड शिक्षणतज्ज्ञाचा होता. अध्ययन आणि अध्यापन हा त्यांनी जीवनधर्म मानला. डॉ. वाघमारे यांनी प्राध्यापक, प्राचार्य आणि त्यानंतर कुलगुरू म्हणून अनेक वर्षे काम पाहिले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे (नांदेड) ते पहिले कुलगुरू होते. वाघमारे हे इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक, निग्रो साहित्याचे भाष्यकार, दलित पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून आपला ठसा उमटवला होता. शिक्षण साहित्याबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचे विपुल योगदान होते.

*एस आर टी संशोधन संस्थेच्या वतीने* *संशोधन प्रकल्प प्रस्तावासाठी आवाहन*---------------छत्रपती संभाजीनगर येथील स्वामी राम...
27/01/2026

*एस आर टी संशोधन संस्थेच्या वतीने*
*संशोधन प्रकल्प प्रस्तावासाठी आवाहन*
---------------
छत्रपती संभाजीनगर येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीने मराठवाडा विभागातून संशोधन प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कृषी व सिंचन या पाच पैकी कोणत्याही एका विषयावर संशोधन करता येईल. निवड झालेल्या प्रस्तावाना संस्थेतर्फे संशोधन वृत्ती दिली जाणार आहे.
▪️
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीने मराठवाडा स्तरावर संशोधन प्रकल्प हाती घेतले जातात, या अनुषंगाने हे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यासाठी महाविद्यालयीन प्राध्यापक, पी एचडी चे विद्यार्थी व संशोधन करू इच्छिणारे अभ्यासक संशोधन प्रकल्पाचा प्रस्ताव पाठवू शकतात.
लघु, मध्यम आणि दीर्घ कालीन अशा तीन वर्गवारीत संशोधन प्रकल्प असतील. ढोबळ मानाने पुढील विषय आहेत - शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कृषी व सिंचन या पाच विषयांमधून एक विषय निवडून तो जिल्हा स्तर, दोन जिल्ह्यांतील तुलनात्मक अभ्यास किंवा संपूर्ण मराठवाडा पातळीवर अशा प्रकारे संशोधन करता येईल.
▪️
सविस्तर माहिती साठी एस आर टी संशोधन संस्था, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी मार्ग, छत्रपती संभाजीनगर येथे मिळू शकेल अथवा
srtmri1 .com
या मेल आयडीवर इच्छुकांनी संदर्भासह मेल करावे. किंवा 8484956141 या क्रमांकावर नाव, पत्त्यासह एस एम एस केल्यास विस्तृत माहिती पाठवली जाईल.
१५ फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव प्रकल्पाची रूपरेषा सादर करावी.

प्रजासत्ताक दिन!स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतआज नवनिर्वाचित नगरसेवक समीर राजूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण ...
26/01/2026

प्रजासत्ताक दिन!
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेत
आज नवनिर्वाचित नगरसेवक समीर राजूरकर
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले....
संस्थेच्या वतीने प्राचार्य जीवन देसाई यांनी
स्वागत केले.
संस्था पदाधिकारी आणि सदस्य, हितचिंतक यांची यावेळी उपस्थिती होती !

स्वामी रामानंद तीर्थ यांना विनम्र अभिवादन ! संभाजीनगर - क्रांती चौकात स्वामीजींच्या पुतळा अनावरण झाल्यावर हे पहिले पुण्य...
22/01/2026

स्वामी रामानंद तीर्थ यांना विनम्र अभिवादन !
संभाजीनगर - क्रांती चौकात
स्वामीजींच्या पुतळा अनावरण झाल्यावर हे पहिले पुण्यस्मरण. एस आर टी संशोधन संस्थेच्या वतीने
अभिवादन करण्यात आले.
ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. ज्ञानप्रकाश मोदानी, प्राचार्य जीवन देसाई, डॉ. विजय पांगरेकर, सुरेश देशपांडे, डॉ. मोहन फुले, डॉ. शिरीष खेडगीकर, भरत राठोड, डॉ. राजशेखर बालेकर, सारंग टाकळकर, शामला नाईक, नीलिमा देवरे, जास्वंदी साळवे यांची उपस्थिती होती.

*स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अर्धपुतळ्याचे**रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते क्रांतीचौक येथे अनावरण*           ...
15/11/2025

*स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अर्धपुतळ्याचे*
*रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते क्रांतीचौक येथे अनावरण*
••| निमंत्रण |••
हैदराबाद (मराठवाडा) मुक्तिसंग्रामाचे अग्रणी नेते
आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण
*राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते होत आहे.*
• रविवारी दिनांक १६ नोव्हेंबर
• दुपारी १.३० वाजता
• क्रांतीचौक, काला चबुतरा परिसर
छत्रपती संभाजीनगर

कृपया आपण आपल्या सहकाऱ्यांसह
कार्यक्रमाला उपस्थित रहावे ही विनंती.

•••विनीत •••
स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा संशोधन संस्था.

SRT is on google map with With location photos !
15/10/2025

SRT is on google map with
With location photos !

Find local businesses, view maps and get driving directions in Google Maps.

Address

Swatantrya Sainik Colony, Nageshwar Wadi Road
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 10:30am - 5:30pm
Tuesday 10:30am - 5:30pm
Wednesday 10:30am - 5:30pm
Thursday 10:30am - 5:30pm
Friday 10:30am - 5:30pm
Saturday 10:30am - 5:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when SRT Marathwada Research Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share