Gaolao Breeders Association

Gaolao Breeders Association Gaolao Cattle Conservation, Research & Breed Developme
Gaolao Breeding Centre,
Grassland Conservation

गौळाऊ संवर्धन ट्रस्ट द्वारे मागील वर्षभरात 15 गावातील पशुपालकांचे पशु सहित यात गौळाऊ गाय आणि नागपुरी म्हशी तब्बल 9000 पश...
16/05/2026

गौळाऊ संवर्धन ट्रस्ट द्वारे मागील वर्षभरात 15 गावातील पशुपालकांचे पशु सहित यात गौळाऊ गाय आणि नागपुरी म्हशी तब्बल 9000 पशुचे चारा व पाण्यासाठी होणार्या स्थलांतराचा हा प्रश्न लावून ठेवत यावर तोडगा काढण्याकरता सतत प्रयत्न करत आहे. आज मा. राज्यमंत्री पंकजजी भोयर यांच्या उपस्थितीत यावर शासकीय सर्व विभागाची बैठक बोलावण्यात आली होती. या प्रश्नाचे गांभीर्य ट्रस्टचे मार्गदर्शक मा. सुधीरजी दिवे व ट्रस्ट चे अध्यक्ष पुष्पराज कालोकार यांनी मांडले व वेळीच उपाययोजना कराव्यात याची सर्व विभागांना मागणी केली. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी जलसंधारण विभाग, पशुसंवर्धन विभाग, वन विभाग, महसूल आणि कृषी विभाग यांनी एकत्र काम करण्याची गरज लक्षात आणून दिली. यातून गौळाऊ गोवंश संवर्धन बरोबर यांचा चारा असलेला अधिवास आणि यावर आधारित उपजिविका सुधारणेला बळ मिळेल असे नमूद करण्यात आले. शासनाच्या सोबतीने या १५ गावात गौळाऊ संवर्धन ट्रस्टने सोबत काम करण्याची हमी दिली.

विदर्भाची शान गौळाऊ गोवंश विदर्भाच्या मातीत रुजलेला आणि निसर्गाशी घट्ट नाळ जुळवून घेतलेला गौळाऊ गोवंश आजही ग्रामीण अर्थव...
21/04/2026

विदर्भाची शान गौळाऊ गोवंश

विदर्भाच्या मातीत रुजलेला आणि निसर्गाशी घट्ट नाळ जुळवून घेतलेला गौळाऊ गोवंश आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत आधार आहे. काटक बांधा, उष्णतेला तोंड देण्याची क्षमता आणि औषधी गुणांनी समृद्ध A2 दूध ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. मात्र बदलत्या परिस्थितीत लुप्ततेच्या उंबरठ्यावर आलेल्या या वारशाचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक समुदाय पुढे सरसावला आहे.
#गौळाऊ #विदर्भ #देशी_गोवंश

विदर्भाच्या मातीत रुजलेला आणि निसर्गाशी घट्ट नाळ जुळवून घेतलेला गौळाऊ गोवंश आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत ...

19/04/2026
गौळाऊ ट्रस्ट द्वारे पशुपालक महिला मेळाव्याचे आयोजन ..जागतिक महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय माळरान व पशुपालक वर्ष २०२६ च्या ...
25/03/2026

गौळाऊ ट्रस्ट द्वारे पशुपालक महिला मेळाव्याचे आयोजन ..

जागतिक महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय माळरान व पशुपालक वर्ष २०२६ च्या औचित्यने दिनांक २५ मार्च २०२६ ला खरांगणा येथील संत काळे महाराज मंगल कार्यालयात 'पशुपालक महिला मेळाव्याचे' भव्य आयोजन करण्यात आले होते. गौळाऊ गोवंश जतन संवर्धन संशोधन व पैदासकार चॅरिटेबल ट्रस्ट (तळेगाव रघुजी), वर्धा जिल्हा गवळी समाज संघटना (महिला आघाडी, आर्वी) आणि सेंटर फॉर पीपल्स कलेक्टीव (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाद्वारे पशू पालनातील महिलांचे भरीव योगदान व पशुपालक महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याकरिता आयोजन केला गेला होता याप्रसंगी संघटित दुग्ध व्यवसायाचे महत्व आणि महिलांचे कायदेशीर हक्क यावरील माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मा. कांताताई कालोकार होत्या, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून महिला व बाल कल्याण विकास विभागाच्या मा. लीना पुसदेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
प्रास्ताविक भाषणात ट्रस्टचे अध्यक्ष श्री. पुष्पराजजी कालोकार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा दिला. गवळी समाज संघटना वर्धा जिल्हाध्यक्ष श्री देवेंद्रजी ढोबळे यांनी समाजातील भविष्यातील कामांची माहीती दिली, मुख्य मार्गदर्शक लीना पुसदेकर यांनी महिलांचे अधिकार, कायदेशीर तरतुदी आणि सामाजिक जबाबदारी यावर सविस्तर प्रकाश टाकला. तर उषाताई कदम यांनी सहकारी तत्वावर दुग्ध उभारणीतुन महिलांचे आर्थिक स्वावलंबन याविषयी मार्गदर्शन केले. संतोष गवळे यांनी अमूल च्या धर्तीवर येथे महिला दूध उत्पादक संघ होण्याकरिता मार्गदर्शन केले. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सौ. प्रभाताई कालोकार अध्यक्ष गवळी समाज महिला आघाडी, सरपंच सौ. सविताताई कालोकार, सौ. संगीताताई गळहाट यांनी पशुपालन व्यवसायात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. या मेळाव्यात समाजातील कर्तृत्ववान महिला रूपालिताई चेके आणि अश्विनी घंगाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात कांताताई कालोकार यांनी महिलांवरील अत्याचार व फसवणूक रोखण्यासाठी स्त्रीशक्तीने जागरूक राहण्याचे आवाहन केले. या मेळाव्यात प्रामुख्याने विधी, सामाजिक प्रश्न आणि आगामी काळातील दुग्धव्यवसायातील संधी या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुल सोनोने यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. प्रभाताई कालोकार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौळाऊ संवर्धन ट्रस्टचे सर्व पदधिकारी तसेच सचिव लोभेश्वर आसोले, प्रफुल्ल कालोकार, महेंद्र जून्नाके, अमोल कालोकार, राहुल गळहाट, महेश कालोकार यांनी कार्यक्रम नियोजनबाबत परिश्रम घेतले. या मेळाव्याला परिसरातील पशुपालक समाजाच्या महिलाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

24/03/2026
सर्वांना गौळाऊ गोवंश जतन, संवर्धन, संशोधन व पैदासकार चॅरिटेबल ट्रस्ट, तळेगाव रघूजी यांच्या वतीने होळीच्या हार्दिक शुभेच्...
02/03/2026

सर्वांना गौळाऊ गोवंश जतन, संवर्धन, संशोधन व पैदासकार चॅरिटेबल ट्रस्ट, तळेगाव रघूजी यांच्या वतीने होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻🎉
रंगांच्या या पवित्र सणानिमित्त आपण आपल्या देशी गोवंशाच्या जतन व संवर्धनाचा संकल्प करूया.
जशी होळी वाईट प्रवृत्तींचा नाश करून नवचैतन्याचा संदेश देते, तशीच गोसेवा आपल्या शेतीला, पर्यावरणाला आणि संस्कृतीला नवी ऊर्जा देते.
चला, या होळीला नैसर्गिक रंगांसह गोसंवर्धनाचा संदेशही घराघरांत पोहोचवूया.
“गोवंशाचे रक्षण – भविष्यासाठी संरक्षण”

Address

गौळाऊ गोवंश जतन, संवर्धन, संशोधन व पैदासकार ट्रस्ट तळेगाव रघुजी
Arvi
KHARANGANA

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gaolao Breeders Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gaolao Breeders Association:

Share