03/09/2024
इंदिरानगर बर्डी आरमोरी येथे तान्हापोळा साजरा
आज दि. 3 सप्टेंबर 2024 रोजी इंदिरानगर बर्डी हनुमान मंदिर , आरमोरी येथे तान्हापोळा साजरा करण्यात आला. तान्हापोळा ची सुरवात हनुमान मंदिर येथे आरती करून करण्यात आली, प्रमुख पाहुणे म्हणून वार्डातील दयाराम जी धारणे, वामनजी तितीरमारे, ऋषींजी ठाकरे, मधुकरजी ठवकर, भाऊराव सोनकुसरे, सातव गुरुजी, ठवकर गुरुजी, दडमल साहेब, विठ्ठलजी बारापात्रे हे उपस्तिथ होते . यामध्ये विशेषतः “पालवी फाऊंडेशन आरमोरी “ द्वारा ईश्वर चिट्ठी काढण्यात आली त्यानुसार प्रथम बक्षीस उर्विल सुरेश सोरते 501 रु., द्वितीय बक्षीस देव राहुलजी टेम्भूर्ने 301 रु. व तृतीय बक्षीस लोकेश गराटे 201 रु. यांना पालवी फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रफुल खापरे, उपाध्यक्ष नेपचंद्र पेलणे, सचिव अजय कुथे, सहसचिव बादल सपाटे, कोषाध्यक्ष प्रफुल मोगरे, सदस्य प्रवीण काळबांधे, महेश पेलणे, अजय हेडाऊ, राहुल हर्षे, तुषार भोयर, चेतन जुआरे, अभिषेक जुआरे, मयूर सोरते, यांच्यातर्फे देण्यात आले, सदर तान्हा पोळ्यात जवळपास ८० ते ९० बालगोपाल नंदी सजावट सह सहभागी झाले त्या सर्वाना प्रमुख पाहुण्यांतर्फे पेन, नोटबुक, व प्रत्येकाना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाची सांगता तान्हापोळा फोडून करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी कारण्यकारिता किशोर सारवे, मोरेश्वर चौके, जगदीश घरजारे, प्रदीप सारवे, दशरथ भांडेकर, हरी दुमाने, संदीप ठवकर, अशोक धारने, हिमेश गराटे हरी हजारे, किसन दुमाने आणि इंदिरानगर वार्डातील पुरुष व महिलांणी सहकार्य केले.