Legal Square

Legal Square -Legal and health awareness- Legal Square
सोबत जुळण्यासाठी खालील Link वर जाऊन Membership Form भरा.

09/01/2026
आज शिकलेला एक छोटासा धडा, उद्या एखाद्या मुलाचे संपूर्ण आयुष्य सुरक्षित करू शकतो.  - गुड टच – बॅड टच’ (जनजागृती कार्यक्रम...
05/01/2026

आज शिकलेला एक छोटासा धडा, उद्या एखाद्या मुलाचे संपूर्ण आयुष्य सुरक्षित करू शकतो. - गुड टच – बॅड टच’ (जनजागृती कार्यक्रम)

अलीकडच्या काळात चिमुकल्यांसोबत घडणाऱ्या असामाजिक घटनांचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. अनेक वेळा लहान मुलांना अशा प्रकारच्या वर्तनाची कल्पनाच नसते आणि नकळत ते शोषणाचे बळी ठरतात.
म्हणूनच आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती आपल्याशी कसे वागायला हवे आणि कसे वागू नये, याची ओळख लहान वयातच होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, जर कधी अनपेक्षित किंवा चुकीचा प्रसंग घडला, तर प्राथमिक स्तरावर स्वतःची सुरक्षा कशी करायची, याचे योग्य मार्गदर्शन मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने, मुलांना कोणतीही भीती न वाटता, हसत-खेळत, संवादातून आणि विविध खेळांच्या माध्यमातून ‘गुड टच – बॅड टच’ या विषयाचे गांभीर्य समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यामुळेच #लिगल_स्क्वेअर तर्फे तिवसा येथील ज्ञानमाता इंग्लिश स्कूल येथे ‘गुड टच – बॅड टच’ विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमातील काही क्षणचित्रे… 📸

LegalSquare
SafeChildhood Followers anyone

Roses In December व्याख्यानमाला - 2024       अमरावती जिल्हा वकील संघातर्फे Roses In December व्याख्यानमाला - 2024 व्याख्...
21/12/2024

Roses In December व्याख्यानमाला - 2024
अमरावती जिल्हा वकील संघातर्फे Roses In December व्याख्यानमाला - 2024 व्याख्यानमालेचे आयोजन दि. 19, 20, 21 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती येथील सेंट्रल हॉल येथे करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून जेष्ठ अधिवक्ता यांच्या आयुष्यातील अनुभव वकिली करते वेळी आलेले संकट, गमती जमती, नैतिक मूल्ये, अश्या अनेक मुद्यावर जेष्ठ वकील सदस्यांनी संवाद साधला तसेच नवोदित वकील सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी जेष्ठ अधिवक्ता श्री. ऍड. के एच देशपांडे, ऍड. श्री. डी. एम. श्रीमाळी ऍड. पी वी देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमावेळी अध्यक्ष स्थान हे वकील संघांचे अध्यक्ष ऍड. श्री वी काळे सर यांनी भूषविले तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य कर्मचारी वृंद तसेच जेष्ठ तसेच नवोदित वकील सदस्य मोठ्या संख्येने हजर होते.

ऍड. सुरज ग. जामठे
कार्यकारिणी सदस्य
अमरावती जिल्हा वकील संघ अमरावती.

फोटो साभार
, अमरावती.

सर्व सन्माननीय वकील सदस्यांना सूचीत कारण्यात येते कि, ऍडव्होकेट टेलिफोन डिरेक्ट्री तयार करण्याची प्रक्रिया सरु असून खाली...
04/12/2024

सर्व सन्माननीय वकील सदस्यांना सूचीत कारण्यात येते कि, ऍडव्होकेट टेलिफोन डिरेक्ट्री तयार करण्याची प्रक्रिया सरु असून खालील मेसेज जास्तीत जास्त वकील सदस्यांपर्यंत पोहोचवावा. 🙏

वकील संघातर्फे मॉक टेस्ट चे आयोजन       अमरावती जिल्हा वकील संघाद्वारे तसेच ऍड एन डी राऊत यांच्या विशेष पुढाकाराने अमराव...
30/11/2024

वकील संघातर्फे मॉक टेस्ट चे आयोजन 
      अमरावती जिल्हा वकील संघाद्वारे तसेच ऍड एन डी राऊत यांच्या विशेष पुढाकाराने अमरावती येथील होतकरू वकील सदस्यांसाठी ज्यांचे भविष्यात न्यायाधीश बनून समाजासाठी आपले योगदान द्यायचे आहे अश्यासाठी अमरावती येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे जे एम एफ सी परीक्षेची मॉक टेस्ट चे आयोजन करण्यात आले यात अनेक वकील सदस्य तसेच विधी परीक्षेचा अभ्यास करणारे विध्यार्थी सुद्धा उपस्थित होते.
     यावेळी कार्यक्रमाला मुख्य आतिथी म्हणून श्री. ऍड. अजय पाटील, अध्यक्ष म्हणून वकील संघांचे अध्यक्ष ऍड. विश्वास काळे, उपाध्यक्ष श्री. ऍड. एन. डी. राऊत सचिव चंद्रसेन गुळसुंदरे तसेच सर्व कार्यकारिणी उपस्थित होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड सुरज जामठे यांनी केले.

ऍड. सुरज ग. जामठे 
कार्यकारणी सदस्य 
अमरावती जिल्हा वकील संघ अमरावती.

दीपोस्तव २०२४        अमरावती जिल्हा वकील संघाच्या परंपरेंनुसार दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दीपोत्सव मोठ्या थाटामाटात...
28/10/2024

दीपोस्तव २०२४
        अमरावती जिल्हा वकील संघाच्या परंपरेंनुसार दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दीपोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शना नंतर दीप प्रज्वलीत करून न्यायालयीन परिसरात रोषणाई कारण्यात आली. तसेच सामाजित भान म्हणुन बाल न्याय मंडळ यांच्या तर्फे निर्मित दिव्या ची विक्री करून फुल ना फुलांची पाकडी म्हणून आर्थिक उभारणी देण्याचा प्रयत्न कारण्यात आला.
        तसेच वकील संघातर्फे सर्व सन्मा. न्यायाधीश व सन्मा. वकील सदस्यांसाठी "कार्यकारिणी भोजनाची" विशेष मेजवाणी ठेवण्यात आली होती.
        यावेळी कार्यक्रमाला उदघाटक म्हणुन अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचे सन्मा. प्रमुख न्यायाधीश श्री. एस. व्हि. यार्लगड्डा साहेब तसेच कार्यक्रमास विशेष आतिथी म्हणुन सन्मा. न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय श्री. आर आर पोंडकुले साहेब, जिल्हा वकील संघांचे सन्मा. अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. ऍड. विश्वास काळे साहेब विशेष सरकारी अधीवक्ता श्री. ऍड. परीक्षित गणोरकर साहेब, उपाध्यक्ष श्री. ऍड. एन. डी. राऊत साहेब, सचिव श्री. ऍड. चंद्रसेन गुळसुंदरे साहेब , ग्रंथपाल सचिव श्री. ऍड. वसीम शेख साहेब व सर्व कार्यकारिणी सदस्य व मोठ्या संख्येने सर्व वकील बंधू भगिनी उपस्थित होते. 

फोटो साभार - सागर देशमूख.
डेकोरेशन - अस्तित्व डेकोरेश. 

ऍड. सुरज गजाननराव जामठे 
कार्यकारिणी सदस्य 
अमरावती जिल्हा वकील संघ अमरावती.

वृक्ष-रक्षाबंधन।। वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे।।      कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्या मनात आपुलकीची भावना तयार करण्यासाठी ...
20/08/2024

वृक्ष-रक्षाबंधन

।। वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे।।
      कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्या मनात आपुलकीची भावना तयार करण्यासाठी त्या गोष्टी सोबत आपल्याला भावनीक नाते बनवने तेवढेच महत्वाचे आहे. त्याचमुळे आज दि.20 आँगस्ट रोजी लिगल स्क्वेअर तर्फे 40 वृक्षारोपण करुन त्या वृक्षांना राखी बांधुन त्याच्या सोबत नाते प्रस्थापित केले, ज्यामुळे फक्त वृक्षांची लागवड करुन सोडुन न देता जो पर्यत ते मोठे होत नाही तोपर्यंत त्यांची जबाबदारी हि आपल्या वर असेल जेव्हा मोठे होतील त्यानंतर मात्र जबाबदारी हि वृक्षांची असेल. 

      या कल्पनेनुत सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला लिगल स्क्वेअर चे सर्व पदाधिकारी हजर होतो तसेच सर्वांनी अगदी मेहनतीने कार्यक्रमात योगदान दिले.

Address

Amravati

Telephone

9766257067

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Legal Square posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share