VARHAD

VARHAD Voluntary Action for Rehabilitation & Development
(1)

05/09/2026

अमरावती कारागृहात सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी; नेमकं काय घडलं? पहा सविस्तर Video-

31/08/2026

६२ बंद्यांची ७४ मुलांशी भेट; भावनिक क्षणांनी वातावरण गहिवरले. अमरावती मध्यवर्ती कारागृह आणि ‘वऱ्हाड’ संस्थेचा संयुक्तीक उपक्रम...

अमरावती : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षाबंद्यांसाठी शनिवारी (२९ ऑगस्ट) ‘गळाभेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कारागृहाच्या भिंतीआड शिक्षा भोगणाऱ्या बंद्यांना त्यांच्या लहान मुलांचा प्रत्यक्ष सहवास आणि भावनिक आधार मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात अनेक भावनिक क्षण पाहायला मिळाले.

कारागृहात बंद्यांना कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी दूरध्वनी, ई-मुलाखत, प्रत्यक्ष मुलाखत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि पत्रव्यवहार अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, वाढत्या वयातील मुलांना पालकांचा सहवास आणि भावनिक स्पर्शही आवश्यक असतो. याच भावनेतून कारागृह विभागाने मागील दहा वर्षांपासून ‘गळाभेट’ हा उपक्रम सुरू केला आहे.

अमरावती मध्यवर्ती कारागृहात झालेल्या या कार्यक्रमात ६२ बंद्यांनी त्यांच्या १८ वर्षांखालील एकूण ७४ मुला-मुली व नातवंडांची प्रत्यक्ष गळाभेट घेतली. सहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले असलेल्या बंद्यांसोबत त्यांच्या १६ पालकांनाही कारागृहात प्रवेश देण्यात आला. मुलांचे आधारकार्ड तपासून नियमानुसार त्यांना प्रवेश देण्यात आला.

या भेटीदरम्यान बंद्यांनी कारागृहाच्या उपहारगृहातून स्वतःच्या वेतनातून खरेदी केलेले बिस्कीट, चॉकलेट आदी खाऊ मुलांना प्रेमाने भरविला. कारागृह प्रशासनाकडून मुलांसाठी पुलाव आणि शिरा असा अल्पोपहारही देण्यात आला.

कारागृह अधीक्षक श्रीमती कीर्ती चिंतामणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कारागृह शिक्षक ललित मुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी बंदी व त्यांच्या मुलांशी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली. या प्रसंगी अनेक मुलांना अश्रू अनावर झाले आणि उपस्थित बंदीजनही भावूक झाले.

या उपक्रमासाठी वऱ्हाड या अशासकीय सेवाभावी संस्थेचे सहकार्य लाभले. अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी संस्थेच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक श्रीमती कीर्ती चिंतामणी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी देवराव जाधव, राजेंद्र राठोड, तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार, हेमंत इंगोले, कारागृह शिक्षक संजय घोलप, ललित मुंडे, लिपीक श्रीमती पद्मजा वैद्य यांच्यासह सुरक्षाव्यवस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच वऱ्हाड संस्थेचे अध्यक्ष रविंद्र वैद्य, सोशल वर्कर मनोज गायकवाड, सौम्यकांत सिंग, जया खरडे, प्रियंका घुरड, अनुष्का काळे, गौरव कुमरे, नामदेव सोनवणे यांच्यासह शासकीय बालगृहाचे समुपदेशक प्रशांत विघ्ने आणि होली क्रॉस बालगृहाच्या श्रीमती दीपा किस्पोटा उपस्थित होते.

या उपक्रमामुळे शिक्षा भोगणाऱ्या बंद्यांना आपल्या मुलांसोबत काही काळ का होईना, मायेचा आणि आपुलकीचा सहवास अनुभवता आला. त्यामुळे ‘गळाभेट’ हा उपक्रम बंदी आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील भावनिक नातं जपणारा संवेदनशील उपक्रम ठरला.

मध्यवर्ती कारागृह नागपूर या ठीकाणी शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनाच्या १० वी मध्ये शिकत असलेल्या पाल्याला ‘वऱ्हाड’ संस्थेम...
21/08/2026

मध्यवर्ती कारागृह नागपूर या ठीकाणी शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनाच्या १० वी मध्ये शिकत असलेल्या पाल्याला ‘वऱ्हाड’ संस्थेमार्फत सायकल प्रदान करण्यात आली.
#वऱ्हाड

05/08/2026

बंदीजनांसाठी आशेचा कीरण म्हणजे ‘वऱ्हाड’

27/07/2026

ज्यांच कुठेही नाही बिऱ्हाड, त्यांच्यासाठी हक्काच घर म्हणजे वऱ्हाड

10/07/2026

ज्यांच कुठेही नाही बिऱ्हाड, त्यांच्यासाठी हक्काच घर म्हणजे वऱ्हाड

25/06/2026

#वऱ्हाड

01/06/2026

Address

Chandrasudha Nagar, Near Priya Colony, Post/Rukhmini Nagar
Amravati
444606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VARHAD posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share