Amravati Spandan Parivar Bahuddeshiy Sanstha

Call Directions

Amravati Spandan Parivar Bahuddeshiy Sanstha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amravati Spandan Parivar Bahuddeshiy Sanstha, Non-Governmental Organization (NGO), Plot no 16, Sonal colony , Shegaon/Rahatgaon Road, Amravati.

26/08/2026

*‘JCB ’ च्या प्रभावी सादरीकरणाने जिंकली प्रेक्षकांची मने...*

अकोला येथे दि. १५ व १६ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या १२ व्या स्वातंत्र्य करंडक विदर्भ स्तरीय एकांकिका स्पर्धेत अमरावती स्पंदन परिवार बहुद्देशीय संस्था संचालित Being Artist Academy Of Film & Theatre Arts, Amravatiच्या विद्यार्थी संघाने ‘JCB’ या एकांकिकेचे प्रभावी आणि दर्जेदार सादरीकरण करून प्रेक्षकांसह उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
‘JCB’ या एकांकिकेतून मांडण्यात आलेला विषय अत्यंत आशयपूर्ण आणि समाजाला विचार करायला लावणारा ठरला. विद्यार्थ्यांनी विषयाची मांडणी करताना सादरीकरणातील बारकावे, प्रसंगानुरूप अभिनय, संवादफेक, देहबोली आणि रंगमंचावरील प्रभावी वावर यांचा उत्कृष्ट मेळ साधला.
एकांकिकेच्या सादरीकरणादरम्यान विद्यार्थ्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकांकिकेचा विषय, विद्यार्थ्यांचा अभिनय, सादरीकरणाची शैली आणि संपूर्ण संघाच्या मेहनतीचे उपस्थित मान्यवर व रसिकांनी भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरणातून आपल्या कलागुणांची प्रभावी झलक दाखवत स्पर्धेत अमरावतीचे नाव अभिमानाने उंचावले.
JCB या एकांकिकेचे लेखन आशिष राजेश टिळक यांनी केले असून निर्माते म्हणून पंकज धन्दर व स्नेहा वासनिक यांनी प्रमुख जबाबदारी पार पाडली. एकांकिकेचे दिग्दर्शन संदेश बायस्कर , वेशभूषा - रंगभूषा विज्ञप्ती पर्वतकर , नेपथ्य - प्रवीण सिंग तोवर , पार्श्वसंगीत संयोजन - प्रवीण वानखडे , प्रकाश योजना - नंदकिशोर गवळी यांनी केले . त्याच प्रमाणे कलावंत म्हणून संदेश बायस्कर , पवन वाकोडे, अक्षय बकसरे, साक्षी जिभकाटे , योगेश लोन्दे , नवीन गुडधे , आराध्य इसळ , सम्यक खडसे यांनी चोख भूमिका बजावल्या . त्याच प्रमाणे या एकांकिकेच्या उत्तम सादरीकरणासाठी स्वप्निल धन्दर , तेजल डहाणकर, आकाश पांडे, तेजस लहाने आणि हर्षद ससाणे यांचे सुद्धा महत्वाचे सहकार्य लाभले .

‘JCB’ च्या प्रभावी सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी केवळ एकांकिका सादर केली नाही, तर आपल्या अभिनयाची आणि रंगभूमीवरील आत्मविश्वासाची दमदार छाप उमटवली.

Being Artist Academy Of Film & Theatre Artsच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या उल्लेखनीय सादरीकरणातून संस्थेत दिल्या जाणाऱ्या अभिनय व नाट्य प्रशिक्षणाची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या कलात्मक कामगिरीबद्दल संस्था, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

12/08/2026

"ABHIVYAKTI"
Acting & Drama Production Workshop 2026
Acting Training Through Actual Drama Production.
By
Being Artist Academy Of Film & Theatre Arts, Amravati.

08/08/2026

अमरावती स्पंदन परिवार बहुद्देशीय संस्था द्वारा संचालित बिईंग आर्टिस्ट अकॅडेमी ऑफ फिल्म अँन्ड थियेटर आर्ट्स, अमरावती द्वारा आयोजित

"अभिव्यक्ती - अभिनय तथा नाट्य निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा 2026"

काही क्षण चित्रे...

*अभिव्यक्ती* - अभिनय तथा नाट्य निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न ...नाटक म्हणजे फक्त अभिव्यक्ती किंवा लोकरंजनाचे माध्य...
06/08/2026

*अभिव्यक्ती* - अभिनय तथा नाट्य निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न ...

नाटक म्हणजे फक्त अभिव्यक्ती किंवा लोकरंजनाचे माध्यम नसून ते व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाचे महत्वपूर्ण साधन आहे . - पंकज धंदर

अमरावती स्पंदन परिवार बहुद्देशीय संस्था द्वारा संचालित बिईंग आर्टिस्ट अकॅडेमी ऑफ फिल्म अँन्ड थियेटर आर्ट्स, अमरावती द्वारा आयोजित "अभिव्यक्ती - अभिनय तथा नाट्य निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा" नुकतीच दि. 16 जुलै ते 05 ऑगस्ट या कालावधीत अतिशय उत्स्फूर्तपणे संपन्न झाली.
मर्यादित निवडक प्रशिक्षणार्थींना प्रवेश असणाऱ्या या महत्वपूर्ण कार्यशाळेला अमरावती , परतवाडा, तिवसा, चांदूर बाजार, शिराळा, नांदगाव खंडेश्वर , मोझरी अश्या वेगवेगळ्या भागांतून आलेले प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना अभिनयाची मूलतत्त्वे, संवादफेक, शरीरभाषा, आवाजावरील नियंत्रण, भावाभिव्यक्ती, रंगमंचावरील वावर, पात्रनिर्मिती, प्रसंग सादरीकरण, नाट्यनिर्मिती प्रक्रिया तसेच कॅमेऱ्यासमोरील अभिनयाची तांत्रिक माहिती यांचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विविध प्रात्यक्षिके, गटचर्चा, नाट्यखेळ आणि सादरीकरणांमुळे व प्रशिक्षणार्थींना घेऊन प्रत्यक्ष एकांकिका निर्मितीच्या माध्यामातून प्रशिक्षण अधिक प्रभावी व अनुभवसमृद्ध ठरले.
"अभिनय म्हणजे केवळ भूमिका नव्हे, तर स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे" या संकल्पनेवर आधारित या कार्यशाळेने सहभागी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास, आत्मविश्वास वाढीस आणि कलात्मक अभिव्यक्तीला तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला नवी दिशा दिली. कार्यशाळेत अभिनय -नाटक म्हणजे नेमकं काय ? विविध विभाग व त्यांची ओळख तसेच कार्य पद्धती , नाट्य निर्मितीची संपूर्ण प्रक्रीया, संहिता लेखन ते प्रत्यक्ष मंचन - सादरीकरण, नाटकाच्या माध्यमातून अभिव्यक्ती , संवादकौशल्य, लोकरंजन , लोकशिक्षण , स माज प्रबोधन व व्यक्तिमत्व विकास तसेच व्यवसाय संधी, नाट्य संस्थाना - कलावंतांना मिळणाऱ्या शासकीय योजना , अर्थ सहाय्य व अनुदान योजना याविषयी रीतसर मुद्देसूद माहिती व प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाची Being Artist Academy of Film & Theatre Arts च्या संचालीका तसेच अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव स्नेहा वासनिक व प्रशिक्षक म्हणून संस्थेचे अध्यक्ष पंकज धन्दर यांनी जबाबदारी पार पाडली .सहभागी विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यात संदेश बायस्कर , पवन वाकोडे , अक्षय बकसरे , साक्षी जिभकाटे , विज्ञप्ती पर्वतकर ,योगेश लोन्दे , नवीन गुडधे , आराध्य इसळ, सम्यक खडसे, प्रवीण वानखडे, श्रुतिका दंदे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

02/08/2026

*अमरावती स्पंदन परिवार बहु. संस्था*

*Being Artist Academy Of Film & Theatre Arts, Amravati.*

आयोजित करीत आहेत

*"स्वातंत्र्य ?..म्हणजे काय रे भावा ?"*

*🎬Reels And Short Video Competition🎭*

स्वातंत्र्य..म्हणजे काय ? या विषयावर आपल्या कल्पना शक्तीचा पुरेपूर सदुपयोग करून आणि कस लावून एक अर्थपूर्ण आणि आकर्षक Reel / Short Video बनवा आणि पाठवा खाली दिलेल्या नंबर वर .

*पारितोषिके*

प्रथम : रु. 3000/ व प्रमाणपत्र
द्वितीय : रु. 2000/ व प्रमाणपत्र
तृतीय : रु. 1000/ व प्रमाणपत्र

तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना *सहभाग प्रमाणपत्र*

आपल्या रिल्स किंवा शॉर्ट विडियो आणि फॉर्म पाठविण्याची *शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2026.*

अधिक माहिती व प्रवेश अर्जासाठी संपर्क करा .

9324363600, 9518381132.

"पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे"..लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वि...
01/08/2026

"पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे"..

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
विनम्र अभिवादन 🙏😊🙏

25/07/2026

"Cinema Cinema खेळताना.."
चित्रपट उद्योजकता -व्यवसाय आणि रोजगार संधी माहिती तथा प्रशिक्षण कार्यशाळा
काही क्षणचित्रे ...

22/04/2026

Hurry Up..Enroll & Grab Your Seat Now..😊👍

FILM / SCREEN ACTING WORKSHOPby Being Artist Academy Of Film & Theatre Arts, Amravati
10/04/2026

FILM / SCREEN ACTING WORKSHOP
by Being Artist Academy Of Film & Theatre Arts, Amravati

Address

Plot No 16, Sonal Colony , Shegaon/Rahatgaon Road
Amravati
444604

Telephone

+919324363600

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amravati Spandan Parivar Bahuddeshiy Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share