23/02/2026
२२ फेब्रुवारी २०२६ रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ५२ व्या स्थापना दिनाचे अवचित्य साधून अरंण्यम् संरक्षण संस्था, अमरावती च्या वतीने परतवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मधील वन्यजीवांच्या सुश्रुशेसाठी आर्थिक मदत करून खारीचा वाटा उचलला आहे.
दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित , कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुश्री जयोती बॅनर्जी (भा. व. से), मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), अमरावती , प्रमुख अतिथी श्री एम. आदर्श रेड्डी (भा. व. से), वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प; श्री सुमित कुमार (भा. व. से), उपवनसंरक्षक सामाजिक वनीकरण, अमरावती; श्री अर्जुना के. आर. (भा. व. से), उपवनसंरक्षक, अमरावती वन विभाग; श्री राहुलसिंह टोलिया (भा. व. से), उपवनसंरक्षक अकोट वन्यजीव विभाग, आकोट; श्री गणेशन सी. (भा. व. से), उपवनसंरक्षक कार्य आयोजन, अमरावती; श्रीमती कीर्ती जमदाडे-कोकाटे (भा. व. से), उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा; श्रीमती निता कट्टे (भा. व. से), उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा; श्री अनंता डिगोळे (म. व. से), विभागीय वनाधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा; तसेच डॉ. मयूर भैलुमे (म. व. से), विभागीय वनाधिकारी, अमरावती, श्रीमती वर्षा हरणे (म. व. से), वनपरिक्षेत्र अधिकारी, निसर्ग निर्वजन संकुल, मेळघाट व्याघ्र प्रकल्प; निसर्गतज्ञ व अभ्यासक श्री विशाल बनसोड, पर्यटन व्यवस्थापक स्वप्निल बांगडे आणि अन्य वन कर्मचारी उपस्थित होते. अरंण्यम् संरक्षण संस्थेचे अध्यक्ष सर्वेश मराठे, शुभम पवार, साक्षी पवार, पर्ण जसापुरे व इतर सभासद उपस्थित होते.