Manavlok Ambajogai

Manavlok Ambajogai We are a non-profit organization. We work for the betterment of less privileged people with a new idea A new experiment in rural development was launched.

In the early 1970s, a socialist group of youth began seeking solutions to local, social and political problems with the general aim of achieving a more just and happy society. After nearly 20 years of effort and agitations, however, they concluded that socio-political change was not possible without economic change. With this point of view in mind, they established MANAVLOK

in 1982, a voluntary

organization for socio-economic upliftment of the rural poor. MANAVLOK has been developing its activities over an increasing scale, never straying from the tenet that programs be based on the specific needs of people. Soil and water conservation, a mobile health clinic, community wells for marginal farmers, legal support for destitute and deserted women, skill training for women and landless farmers, a hostel for impoverished college girls, the Employment for Community Development program, empowerment for the rural poor specially women, organizing small farmers, landless labourers, women and youth to solve their problems with available resources. These are just some of the important activities initiated.

19/06/2026

घरात मारहाण, मानसिक त्रास (कौटुंबिक हिंसाचार) सहन करणाऱ्या अनेक महिलांसाठी आपली व्यथा कोणालाही सांगणं अतिशय कठीण असतं. सांगितलं तरी ते आपल्यावर विश्वास ठेवतील का, ही शंका, धाकधूक सतत मनात असते. त्यामुळे अनेक महिला त्रास सहन करत राहतात, पण बोलण्यासाठी पुढे येत नाहीत, कोणापाशीच तक्रार घेऊन जात नाहीत. आपण एकटे, असहाय, निराधार आहोत अशा भावनेत अनेक जणी आयुष्य काढत राहतात.

मनस्विनीच्या माध्यमातून महिलांना समुपदेशन, मोफत कायदेशीर मदत, भावनिक आधार आणि स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची संधी मिळते.

एखाद्या अत्याचाराच्या घटनेची रीतसर पोलीस नोंदणी, न्यायालयीन प्रक्रिया आणि खटला चालवण्यापर्यंत विविध मार्गांनी मनस्विनीचे स्वयंसेवक स्त्रियांना आधार देतात.

त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. पीडित किंवा हिंसाचारग्रस्त महिलांना परत आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी टप्प्या-टप्प्यावर मनस्विनीचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत खंबीर साथ देत उभे असतात.

पतीने केलेल्या भयानक हल्ल्यानंतर नव्याने उभं राहण्याचं बळ मिळालेल्या एका लाभार्थी महिलेची ही कहाणी, तिच्याच शब्दांत.


[manavlok, women empowerment, domestic abuse, violence against women, gender equality, legal aid, counselling, skill development, rural women, Maharashtra, social work]

मानवलोकच्या जनसहयोग कार्यालयात नुकतेच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ७५ ज्येष्ठ नागरिकांच्या रक्तदाब...
17/06/2026

मानवलोकच्या जनसहयोग कार्यालयात नुकतेच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ७५ ज्येष्ठ नागरिकांच्या रक्तदाब, रक्तातील साखरचे प्रमाण आणि हिमोग्लोबिन इत्यादी चाचण्या करण्यात आल्या. त्यांना डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला आणि आवश्यक औषधोपचार देण्यात आले.

तपासणीदरम्यान ज्या लाभार्थ्यांमध्ये थोडी अधिक तीव्र स्वरूपाची किंवा गंभीर लक्षणे आढळून आली, त्यांना पुढील उपचारांसाठी योग्य मार्गदर्शनदेखील करण्यात आले. यासोबतच सर्वांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आजार टाळण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

निरोगी आयुष्य हा प्रत्येकाचा हक्क आहे. सुदृढ आणि सशक्त जनता हीच आपल्या देशाची खरी संपत्ती आहे! ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित केलेला हा एक छोटासा पण महत्त्वाचा प्रयत्न होता.


[rural, elderly citizens, medical check-up, health camp, doctors, service, social work]

14/06/2026

शेतकऱ्याचा प्रवास फक्त पीक घेतलं आणि कापणी झाली की संपत नाही. हाती आलेल्या मालाला योग्य बाजारपेठेपर्यंत न्यावही लागतं. सर्वसामान्यपणे शेतकरी स्वतःच्या कांद्याची आकारानुसार प्रतवारी करतात. पण ती फक्त डोळ्यांनी बघून, अंदाजाने आणि ढोबळमानाने होते. ग्रेडिंग-सॉर्टिंग मशीन ही हॉर्टिमॅक्स फार्मर्स प्रॉड्यूसर कंपनीची खूप जमेची बाजू आहे. आकारातील अगदी मिलिमीटर इतक्या बारीक फरकाने ह्यात कांदे पटकन वेगळे होऊ शकतात. शेतकऱ्याचा कष्टाचा वेळ तर वाचतोच, पण त्याहून महत्वाचं म्हणजे वेगळ्या झालेल्या मोठ्या आकाराच्या मालाला बाजारात जास्त किंमत मिळते!

जेव्हा एकटा शेतकरी आपला सगळा माल एकाच बाजारपेठेत जाऊन विकतो, तिथे मालाची सरमिसळ असते, आणि मोठ्या आकारासाठी साजेसा असा योग्य भाव न मिळाल्याने एक प्रकारे शेतकऱ्याचं नुकसानच होतं. जेव्हा ४०० हून जास्त शेतकरी एकत्र येतात, तेव्हा एका वेेळी जास्त माल उपलब्ध होतो. मशीनच्या सहाय्याने त्याची उत्तमरीत्या प्रतवारी करून ज्या मार्केटमध्ये योग्य दर मिळेल तिथेच माल नेण्याची मुभा मिळते.

हे खरं सक्षमीकरण आणि स्वातंत्र्य आहे. शेतकऱ्यांचं हित हेच FPC मॉडेल्सचं खरं यश आहे.


[manavlok, Hortimax FPC, onion value chain, farmer producer company, market linkages, agriculture]

मागच्या वर्षी उद्भवलेल्या भयंकर पूर परिस्थितीमुळे सोलापूर आणि धाराशिवमधील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांचं खूप मोठं नुकसान...
12/06/2026

मागच्या वर्षी उद्भवलेल्या भयंकर पूर परिस्थितीमुळे सोलापूर आणि धाराशिवमधील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांचं खूप मोठं नुकसान झालं. वर्ग, बसण्याची व्यवस्था, फर्निचर, शौचालयं ह्या सर्वच गोष्टींना फटका बसला आणि मुलांना शिकण्यायोग्य वातावरण आणि परिस्थिती राहिली नाही. शेकडो मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. संकटकाळातून या शाळांना वर काढण्यासाठी मानवलोक आणि म्युनिशन्स इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने २२ पूरग्रस्त शाळांसाठी मदतकार्य केले गेले.

शाळांची पुन्हा उभारणी करण्याच्या कामातील महत्वाचे तपशील:

सहाय्य मिळालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या - २२
लाभ मिळालेले विद्यार्थी - १६७८
लाभ मिळालेले शिक्षक - ७९

मदतकार्याचे स्वरूप:
• मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहांची उभारणी व दुरुस्ती
• वर्गखोल्यांचे रंगरकाम
• छतांची व फरशीची दुरुस्ती
• बसण्याचे बाक, टेबल, खुर्च्या इत्यादी फर्निचर उपलब्ध करून देणे
• स्मार्ट टीव्ही, इंटरॲक्टिव्ह बोर्ड आणि इतर शैक्षणिक साहित्याचा पुरवठा
• पाठ्यपुस्तके, कपाट, क्रीडा साहित्य आणि प्रयोगशांमधील आवश्यक उपकरणांचा पुरवठा
• पाणीपुरवठा निगडीत टाकी, फिल्टर, बोअरवेल, RO प्युरिफायर यांची व्यवस्था
आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

नुकताच सोलापूर येथे या शाळांसाठी साहित्य-वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी मानवलोकचे कार्यवाह श्री. अनिकेत लोहिया, कृषी तज्ज्ञ श्री. आशिष वेले, म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे श्री. नंदकिशोर नाईक आणि श्री. प्रसाद काळे, आयकर आयुक्त श्री. संग्राम गायकवाड, तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मानवलोकचे कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमामुळे पूरग्रस्त शाळांना नवसंजीवनी मिळाली आणि विद्यार्थी स्वच्छ, सुरक्षित जागेत आपले शिक्षण नव्या जोमाने सुरू करू शकले.

शालेय शिक्षणाच्या पायाभूत सुविधा पुन्हा उभारून देण्यासाठी आणि पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी सहकार्य करणाऱ्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेड आणि श्री. संग्राम गायकवाड यांचे मानवलोकतर्फे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. शाळांच्या पुनर्बांधणीचा परिणाम केवळ इमारती दुरुस्त होण्यापर्यंत मर्यादित नसतो. मुलांची स्वप्नं, त्यांना उपलब्ध होणाऱ्या संधी आणि ग्रामीण भागाचे भविष्य या सर्वच गोष्टींना ह्या कार्यामुळे नवी उभारी मिळते.


[manavlok, social work, flood relief, children, schools, solapur, dharashiv, impact]

मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे!MSW प्रथम वर्ष • मर्यादित ४० जागा • शिष्यवृत्ती सुविधा • ...
08/06/2026

मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे!

MSW प्रथम वर्ष • मर्यादित ४० जागा • शिष्यवृत्ती सुविधा • विविध स्पेशलायझेशन

फक्त करिअर नाही, समाजात बदल घडवण्याची संधी!
प्रवेशासाठी संपर्क साधा.

पावसाळा अनुभवण्याची वास्तविकता शहरी आणि ग्रामीण भागात सारखी नसते. शहरांमध्ये पाऊस अनेकदा आनंद, आठवणी आणि विरंगुळा घेऊन य...
07/06/2026

पावसाळा अनुभवण्याची वास्तविकता शहरी आणि ग्रामीण भागात सारखी नसते. शहरांमध्ये पाऊस अनेकदा आनंद, आठवणी आणि विरंगुळा घेऊन येतो. घरच्या खिडकीत बसून पाऊस बघत चहा पिण्यासारख्या कल्पना करणं शक्य असतं. पण ग्रामीण मराठवाड्यात पाऊस येणंही, आणि न येणंही अनिश्चिततेचा पाईक असतो. लवकर आला तर अडचण, खूप उशीरा आला तरी नुकसानीचा धोका. पेरणी, लागवडीच्या हंगामात सतत डोक्यावर टांगती तलवार. शेतकऱ्यांसाठी पाऊस हा केवळ हवामानाचा भाग नसून त्यांच्या उत्पन्नाचा, अन्नाचा आणि जगण्याचा आधार असतो. तो वेळेवर आला नाही, जास्त झाला किंवा कमी झाला, तरी त्याचे परिणाम थेट उत्पन्नावर आणि पर्यायाने कुटुंबांच्या आयुष्यावर होतात.

पावसाळ्यात केवळ शेतीच नव्हे तर दैनंदिन जीवनही विस्कळीत होते. रस्ते, दळणवळण, आरोग्यसेवा आणि निवारा या मूलभूत गोष्टीही अनेकदा संकटात सापडतात.

पावसाचे सौंदर्य अनुभवणे चुकीचे नाही. पण त्यामागील वास्तव समजून घेणे तितकेच आवश्यक आहे. कारण अनेकांसाठी पाऊस हा नुसता एक ऋतू नसून दैनंदिन जगण्याचा प्रश्न असतो.

[manavlok, rural India, Marathwada, climate resilience, agriculture, monsoon, watershed development]

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलू या.आज सोशल मीडियावर झाडे, निसर्ग, हवामान बदल,...
05/06/2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलू या.

आज सोशल मीडियावर झाडे, निसर्ग, हवामान बदल, वितळणारे हिमनग, आणि पर्यावरण संवर्धनाविषयी अनेक पोस्ट्स दिसतील. पण पर्यावरण ही केवळ चर्चा करण्याची किंवा वर्षातून एक दिवस, एक झाड लावून साजरी करण्याची गोष्ट नाही. त्यासाठी रोज, सातत्याने, शाश्वत पावले उचलणे गरजेचे आहे.

निसर्ग आणि मानवी जीवन यात आपण फार मोठी तफावत करून ठेवली आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी पर्यावरण म्हणजेच जीवन. विहिरीतील पाणी, शेतातील पीक आणि उपजीविकेची साधनं. निसर्गाचे संरक्षण आणि माणसाचे जीवन या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. आपले आयुष्य निसर्गाशी घट्ट जोडलेले आहे.

मराठवाड्यात हवामान बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. कधी दुष्काळ, कधी अवेळी पाऊस, कधी पिकांचे नुकसान, तर कधी स्थलांतराची वेळ. हवामान बदल ही कुठलीतरी भविष्यातील समस्या नाही, ते आज अनेकांच्या आयुष्यातील वास्तव आहे.

म्हणूनच 'पर्यावरण' हा केवळ एक दिवस चघळायचा विषय नसून; आपल्या पाणी, अन्न, उपजीविका आणि भविष्यासाठीची सामूहिक जबाबदारी आहे.


[manavlok, environment day, climate change, rural livelihoods, floods, drought, protection, trees, soil, water, river, nature]

🏅 MANAVLOK Receives GuideStar India Platinum Seal of TransparencyWe are proud to share that MANAVLOK has been awarded th...
03/06/2026

🏅 MANAVLOK Receives GuideStar India Platinum Seal of Transparency

We are proud to share that MANAVLOK has been awarded the prestigious GuideStar India Champion Level – Platinum Certification, the highest level of recognition for transparency and accountability awarded by GuideStar India.

For over four decades, MANAVLOK has worked alongside rural communities across Marathwada in the areas of watershed development, sustainable agriculture, livelihoods, education, elderly care, women's empowerment, and community development.

GuideStar India is India's largest and most reliable online information repository of NGOs, with over 21,000 organisations listed. The Platinum Certification is awarded after a rigorous due diligence process and signifies a high level of accountability, good governance, and public disclosure practices.

This recognition belongs not only to our organisation but also to the thousands of our donors, partners, supporters, staff, volunteers and community members who have placed their trust in us over the years.

We extend our heartfelt gratitude to GuideStar India and to everyone who has been part of our journey.

Together, we remain committed to creating sustainable change and empowering rural communities.

🔗 View our GuideStar India profile:
https://www.guidestarindia.org/GSN-1072/MARATHWADANAVNIRMANLOKAYAT(MANAVLOK)


[guidestar india, transparency, rural, social work, community, development, NGO, certification]

02/06/2026

For a drought-prone region of North Solapur, developing onion value chains through Farmer Producer Companies is a ray of hope.

MANAVLOK, with support from Thermax Foundation, runs Hortimax FPC, where farmers come together to build a network. They get support from seeds and farming technology to market access and greater bargaining power.

Balkrishna Patil explains how uniform size and colour of the harvest ensure better pricing. How technology intervention saves input costs, how bigger-sized onions can reach newer and high-paying markets, and how, when multiple farmers come together, their unity becomes their strength.


[onion value chain, forward backward linkages, Thermax, solapur, farmers, farm, farming, agriculture, fair price]

'सह्याद्री फार्म्स'चे श्री. विलास शिंदे, श्री. प्रमोद राजेभोसले आणि श्री. मंगेश भास्कर यांनी नुकतीच मानवलोकला भेट दिली.य...
30/05/2026

'सह्याद्री फार्म्स'चे श्री. विलास शिंदे, श्री. प्रमोद राजेभोसले आणि श्री. मंगेश भास्कर यांनी नुकतीच मानवलोकला भेट दिली.या भेटीदरम्यान विलास सरांनी हॉर्टिमॅक्स फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या संचालक मंडळाशी संवाद साधला. शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी, आणि त्यांना सक्षम करण्याच्या आपल्या समृद्ध अनुभवातून त्यांनी मार्गदर्शन केले. एफपीसींसमोरील विविध आव्हाने, त्यांवर मात करण्याचे व्यावहारिक मार्ग, सामूहिक नेतृत्वाचे महत्त्व, पारदर्शकता, शेतकऱ्यांचा विश्वास आणि दीर्घकालीन दृष्टीकोन या विषयांवर सखोल चर्चा झाली. संचालक मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रश्न विचारले. सरांच्या अनुभवातून अनेक उपयुक्त गोष्टी शिकण्याची संधी मिळाली.

हा संवाद हॉर्टिमॅक्सच्या संपूर्ण टीमसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि ज्ञानवर्धक ठरला.


[farmer producer company, hortimax, sahyadri farms, manavlok, agriculture, farming, learning, visit, guidance]

Address

Dhadpad, Post Box No – 23, Ring Road, Ambajogai. Block Ambajogai, District Beed
Ambajogai
431517

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manavlok Ambajogai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Manavlok Ambajogai:

Share