मानव परिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अंबाजोगाई, जिल्हा - बीड

  • Home
  • India
  • Ambajogai
  • मानव परिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अंबाजोगाई, जिल्हा - बीड

मानव परिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अंबाजोगाई, जिल्हा - बीड सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, कृषी इत्यादी...

25/07/2025
01/07/2025
20/04/2025

*एक जिवघेणं सत्य कॅन्सर*
कॅन्सर म्हणले की धडकी भरते. आज कालची जीवनशैली आणि कॅन्सरचा वाढता प्रभाव पाहता त्याबाबत जागरूक होणे खूप गरजेचे आहे. कॅन्सरचा विळखा फार झपाट्याने उग्ररूप घेत आहे. त्यासाठी प्रत्येक महिलेने जागरूक होणे गरजेचे आहे ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशय कॅन्सर हा फार झपाटणे पसरत आहे. प्रारंभिक स्वरूपात हा आजार लक्षात येत नाही पण काळजीपूर्वक स्वतः स्वतःची तपासणी व स्वतःबद्दल जागरूक राहिल्यास पुढील संकटांना सामोरे जाता येते किंबहुना पळवून लावता येते. बीड जिल्ह्यात 21 एप्रिल ते 29 मे दरम्यान वेगवेगळ्या आरोग्यकेंद्रावर शिबिर घेण्यात येणार आहे. त्यामध्ये महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर व गर्भाशय कॅन्सर च्या तपासण्या होणार आहेत. मी गेले वर्षभर मला जसा कॅन्सर डिटेक्ट झाला तसं मी जनजागृती करत आहे त्या संदर्भात मला आलेले काही अनुभव लक्षात घेता महिला स्वतःच्या तब्येतीबद्दल खूप निष्काळजीपणाने वागतात. काही महिला सांगतात तपासणी केली आणि काही निघालं तर काय करायचं पण तपासणी अंती जर प्राथमिक स्वरूपात कॅन्सर लक्षात आला तर पुढील खूप अनर्थ टाळता येतात व खर्चही कमी लागतो आणि स्टेप पुढे गेल्यास खूप खर्चिक बाब होते, त्रासही खूप होतो. आपण सर्वांनी निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्हली या तपासण्यांना सामोरे गेलं पाहिजे. तपासणीअंती रिपोर्ट क्लियर आला तर खूपच आनंदाची गोष्ट आहे आपण आणखी चांगल्या पद्धतीने आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो. घरातील कर्त्या महिलेला कॅन्सर झाला तर पूर्ण घर कोलमडते असे अनेक उदाहरणं आहेत.आज-काल वीस वर्षाच्या पुढच्या तरुणी यांना सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरच्या गाठी आढळल्या आहेत व त्या उपचार घेत आहेत ही परिस्थिती खूप भयावह आहे त्यामुळे आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. गर्भाशयाचे कॅन्सर जास्तीत जास्त वयस्कर महिलांमध्ये आढळत आहेत. बऱ्याच महिला वयाच्या साठी नंतर जर पांढरा पदर जात असेल किंवा लाल पदर जात असेल तर सांगायला लाजतात . आता नातवंडे असताना या वयात आपलाच होणारा त्रास कसा सांगायचा म्हणून सांगत नाहीत.यामुळेच स्टेप खूप पुढे निघून जाते. असे न करता प्रत्येक तरुण पिढीने वयस्कर महिलांच्या मनामधील संकोच घालवला पाहिजे. त्यांना बोलतं केलं पाहिजे. तर पुढील अनर्थ टळेल. गव्हर्मेंटने गावोगाव व्हॅन द्वारे कॅन्सर तपासणीची मोहीम राबवली आहे. त्याचा अवश्य प्रत्येक महिलेने लाभ घेतला पाहिजे. *आपणास यापैकी पुढील काही लक्षणे आहेत का?*
*
*ब्रेस्ट कॅन्सर*:--१)स्तनांच्या आकारांमध्ये बदल, एक लहान किंवा एक मोठे दिसणे .
२)बाधित स्तन संत्र्याच्या सालीप्रमाणे भासणे.
३) निप्पल आत ओढल्यासारखे वाटणे, निपललाअतिशय खाज सुटणे.
४)निपल मधून चिकट द्रव येणे किंवा लालसर चिकट पाणी येणे.
५) अतिशय थकवा जाणवणे तोही काही कारण नसताना.
६) वजन अचानक कमी होणे.
७) चेहरा काळवंडणे .
८)स्तन किंवा बगले मध्ये गाठ जाणवणे.
९) शरीरावर एखादा तीळ किंवा मस अनपेक्षितपणे वाढत असेल.
*गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणे*:--१) पाळी गेलेली असताना किंवा पाळीव्यतिरिक्त लाल किंवा पांढरा पदर जाणे.
२) कारण नसताना ओटी पोटात सतत दुखणे.
३) शारीरिक संबंधाच्या वेळी ओटी पोटात वेदना होणे.
४) ओटी पोटावर सूज वाटणे किंवा जाणवणे .
यापैकी कोणतेही लक्षण असल्यास त्वरित मेमोग्राफी व गर्भाशय कॅन्सर तपासणी (पेपस्मॅर) करून पुढील धोके टाळता येऊ शकतात .आता आधुनिक उपचारांमुळे चौथ्या स्टेजचा कॅन्सरही आपण पळवून लावू शकतो फक्त दृढ आत्मविश्वास व आधुनिक तंत्रज्ञान याच्यासोबत आपण राहायला हवे . मीही सध्या या फेज मधून जात आहे. मला पूर्ण विश्वास आहे मी कॅन्सरला हरवणार. मला कॅन्सरची लक्षणे माहीत नसल्यामुळे मी चौथ्या स्टेजला गेले. यामुळेच मी प्रत्येक महिलेला कळकळीने सांगत आहे वरील काही लक्षणे आपणास असतील तर आपण सरकारी योजनेचा लाभ घेऊन 21 एप्रिल ते 29 मे दरम्यान होणाऱ्या गर्भाशय व स्तन कॅन्सरच्या तपासण्याचा लाभ घेऊ शकता किंवा तुमच्या सोयीने इतर कुठेही या तपासण्या करून घेऊ शकता. कृपया प्रत्येक महिलेने वरील लक्षणे असल्यास टाळू नये. तपासण्या करून घ्याव्यात.

🖊️ एक कॅन्सर पेशंट व कॅन्सर जनजागृती आणि मार्गदर्शन मोहिमेत सक्रिय.
सौ. अर्चना स्वामी अंबाजोगाई.

https://docs.google.com/forms/d/1bIsVX2qaCZ9BDkefCj4jQJsYi3YJYkeksI7Hhs3wJpk/editकॅन्सर पीडित कुटुंबातील कोणत्याही एका स...
08/03/2025

https://docs.google.com/forms/d/1bIsVX2qaCZ9BDkefCj4jQJsYi3YJYkeksI7Hhs3wJpk/edit

कॅन्सर पीडित कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याने वरील लिंक मध्ये दिलेली सर्व माहिती भरून कर्करोग जनजागृती अभियानात नाव नोंदणी करावी.🙏

कर्करोग रुग्णांची माहिती व जनजागृती अभियान.

08/03/2025

निस्वार्थ कर्म हेच सर्वश्रेष्ठ आचरण I

मुलींसाठी गर्भाशय मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) टाळण्यासाठी एचपीव्ही (HPV) लस उपलब्ध आहे.
लसीचे प्रकार :-
1. गार्डासिल (Gardasil)
2. गार्डासिल 9 (Gardasil 9)
3. सर्वरिक्स (Cervarix)
लसीकरणाचे वय :-
9 ते 14 वर्षे :- 2 डोस (पहिला डोस आणि 6-12 महिन्यांनी दुसरा डोस)
15 ते 26 वर्षे :- 3 डोस (पहिला डोस, दुसरा 1-2 महिन्यांनी, आणि तिसरा 6 महिन्यांनी)
महत्त्वाचे :-
ही लस एचपीव्ही विषाणूपासून संरक्षण करते, जो गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो.
लसीकरण जितके लवकर होईल, तितके चांगले, कारण पहिल्या लैंगिक संपर्कापूर्वी लस घेतल्यास जास्त प्रभावी ठरते.

लस घेताना आपल्याला कुठला आजार आहे किंवा कोणते औषध चालू आहेत ते डॉक्टरांना सांगूनच लस घ्यावी.

प्रत्येकाने आपल्या आरोग्याची वार्षिक तपासणी करणे खूप गरजेचे आहे तसेच कोणतेही संशयास्पद लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरित स्क्रीनिंग व टेस्ट्स जसे की मॅमोग्राफी, पॅप स्मिअर करून कर्करोगाचे लवकर निदान करता येते.

Address

Panchwati Niwas, Ram Nagar
Ambajogai
431517

Alerts

Be the first to know and let us send you an email when मानव परिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अंबाजोगाई, जिल्हा - बीड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to मानव परिवर्तन व विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अंबाजोगाई, जिल्हा - बीड:

Share