Sanskar Sansthan Etapalli

Sanskar Sansthan Etapalli Sanskar Sansthan Etapalli is an rising Educational Institute... They are in essence the saints of the social arena and the roots of the spiritual arena.

In Tukdojimaharaji’s “Gramgeeta” it is said that future saints, philosophers, social workers, grate personalities are remain hidden among the children; they need only proper guidance to achieve their goals. In other words, living a pure and divine life, exactly as per the wishes of Lord and therefore encompassing a level of purity in oneself where Lord would reside. It is essential that this is in

stilled in our Children so that they can fulfill this need, as they are the future which will shape our “tomorrow”. Children are innocent and like clean slates. They can therefore be moulded to lead divine lives and collectively can create a divine society for the future.For this Sanskar Santha is established with inspiration of thoughts of Rashtra Sant Tukdoji Maharaj and H.H. Pujya Shoonyoji Maharaj and working in a very remote area.

दुर्गम आणि आदिवासी भागातील जारावंडी (दिंडवी), ता. एटापल्ली येथील काशिनाथ संनू टेकाम हा संस्कार संस्थेच्या शैक्षणिक दत्तक...
07/05/2026

दुर्गम आणि आदिवासी भागातील जारावंडी (दिंडवी), ता. एटापल्ली येथील काशिनाथ संनू टेकाम हा संस्कार संस्थेच्या शैक्षणिक दत्तक उपक्रमांतर्गत आलेल्या पहिल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी आहे.
आपल्या गावात शिक्षणाच्या मर्यादित सुविधा असल्यामुळे चांगले शिक्षण घेण्याच्या उद्देशाने तो एटापल्ली तालुक्याच्या ठिकाणी आला. परिस्थिती अत्यंत साधी, आर्थिक अडचणी मोठ्या; पण डोळ्यांत शिक्षणाची जिद्द आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची तीव्र इच्छा होती.
मदतीच्या अपेक्षेने त्याचा संस्कार सरांशी संपर्क आला आणि संस्कार संस्थेने त्याला शैक्षणिक दत्तक घेतले. संस्थेच्या सहकार्याने आणि स्वतःच्या अथक मेहनतीच्या जोरावर त्याने 10 वी व 12 वी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण केली.
पुढे त्याने फॉरेस्ट भरतीची तयारी सुरू ठेवली आणि विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात वनविभागात नोकरी मिळवून यश संपादन केले.
आज काशिनाथ केवळ नोकरी करत नाही, तर आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी समाजजागृती, पर्यावरण संरक्षण, जनसेवा आणि सकारात्मक विचारांचा प्रसार करण्याचे कार्यही प्रामाणिकपणे करत आहे. संस्कार सर आणि सामुदायिक प्रार्थना या शिक्षणातून मिळालेले संस्कार आणि समाजाप्रती असलेली जाणीव यामुळे तो अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
एका दुर्गम गावातील विद्यार्थ्याचा हा प्रवास हे सिद्ध करतो की योग्य मार्गदर्शन, शिक्षणाची संधी आणि समाजाचे सहकार्य मिळाल्यास कोणताही विद्यार्थी यशाची उंच भरारी घेऊ शकतो.
या यशामागे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्व दानदाते, शुभचिंतक, मार्गदर्शक आणि सहयोगी यांचे मनःपूर्वक आभार.
आपले प्रेम, सहयोग आणि आशीर्वाद असेच कायम लाभत राहोत, ही नम्र अपेक्षा. 🙏

संस्कार च्या शैक्षणिक दत्तक – विद्यार्थी विकास योजना अंतर्गतराकेश कोठारे (रा. बेलगाव, पोस्ट मौशिखांब, जि. गडचिरोली)या वि...
05/05/2026

संस्कार च्या शैक्षणिक दत्तक – विद्यार्थी विकास योजना अंतर्गत

राकेश कोठारे (रा. बेलगाव, पोस्ट मौशिखांब, जि. गडचिरोली)
या विद्यार्थ्याने एका छोट्याशा खेड्यातून शिक्षण घेत NEET परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
सध्या तो पूर्णा, जि. परभणी येथे BAMS चे शिक्षण घेत आहे.
त्याचे घरचे वातावरण अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि कृतज्ञ असे आहे.
संस्कार संस्था व विद्यार्थी विकास योजना अंतर्गत त्याच्या कॉलेज फीची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्याने प्रथम वर्ष First Class मध्ये उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

*“आजचे विद्यार्थी उद्याचे समृद्ध व निरोगी राष्ट्र निर्माण करतील.”*

या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व
*दानदाते व शुभचिंतकांचे मनःपूर्वक आभार!*

संतोष हिचामी – संघर्षातून स्वावलंबनाकडेगडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हनपायलीसारख्या अतिदुर्गम आणि विकासापास...
07/01/2026

संतोष हिचामी – संघर्षातून स्वावलंबनाकडे
गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हनपायलीसारख्या अतिदुर्गम आणि विकासापासून दूर असलेल्या भागात जन्मलेला संतोष हिचामी हा अनेक अडचणींवर मात करत आज स्वावलंबनाचा आदर्श उभा करणारा युवक आहे. शिक्षण, रोजगार आणि सुविधा यांचा अभाव असलेल्या परिसरातही जिद्द, योग्य मार्गदर्शन आणि संस्कार संस्थेच्या पाठबळामुळे जीवन कसे घडवता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे संतोषची यशोगाथा.
संतोष हा विद्यार्थी असताना शैक्षणिक मदतीसाठी संस्कार संस्थेचा पहिला दत्तक गोसू हिचामी च्या मार्गदर्शनाने संस्कार संस्थेकडे आला. त्याची परिस्थिती आणि शिकण्याची तळमळ ओळखून संस्कार संस्थेने त्याचे पालकत्व स्वीकारले. संतोषने बारावीपर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबतच संस्थेच्या Earn and Learn केंद्रात त्याने संगणक, ऑनलाइन सेवा, ग्राहक सेवा यांचे प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले.
पुढे गडचिरोली ला Graduation पूर्ण केल्यानंतर काही कारणास्तव संतोष पुन्हा आपल्या गावात परतला. अनेक तरुणांप्रमाणे त्याच्यासमोरही बेरोजगार म्हणून “आता पुढे काय?” हा प्रश्न उभा राहिला. मात्र संस्थेने दिलेले प्रशिक्षण, आत्मविश्वास आणि मार्गदर्शन यामुळे तो खचला नाही. उलट, त्याने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून हनपायली आणि जारावंडी येथे स्वतःचे ग्राहक सेवा केंद्र सुरू केले.
आज त्या परिसरातील नागरिकांना विविध ऑनलाइन कामांसाठी 50 किमीपेक्षा जास्त अंतर प्रवास करण्याची गरज उरलेली नाही. आधार, पॅन, ऑनलाइन अर्ज, शासकीय सेवा अशा अनेक सुविधा गावातच उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे संतोषचा स्वतःचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला, तसेच संपूर्ण परिसरातील लोकांचे वेळ, पैसा आणि श्रम वाचले आहेत.
यश मिळाल्यावर संतोष थांबला नाही. तो आजही संस्कार संस्थेच्या ‘ग्रामनाथ प्रकल्पात’ सक्रियपणे मदत करत आहे. स्वतः शेती करत असतानाच तो परिसरातील शेतकऱ्यांना भातशेतीनंतर उन्नत व दुबार लागवड करून अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी प्रेरित करीत आहे. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी तो शेतकऱ्यांमध्ये निर्माण करत आहे.
संतोष हिचामीची ही यशोगाथा सांगते की, योग्य संधी, मार्गदर्शन आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर अतिदुर्गम भागातील युवकही यशस्वी उद्योजक आणि समाजोपयोगी व्यक्ती बनू शकतो. आज संतोष केवळ स्वतःचे आयुष्य घडवत नाही, तर संपूर्ण गावाच्या विकासाचा एक आधारस्तंभ बनला आहे. Girija Sirshikar Suparna Deshpande Subhash Gupta Nitesh Kitey Ganesh Thaware

दानदात्यांचे मनःपूर्वक आभारसंस्कार संस्था यांच्या शैक्षणिक दत्तक योजने अंतर्गत सेवा सहयोग यांच्या अमूल्य मदतीने यावर्षी ...
17/12/2025

दानदात्यांचे मनःपूर्वक आभार
संस्कार संस्था यांच्या शैक्षणिक दत्तक योजने अंतर्गत सेवा सहयोग यांच्या अमूल्य मदतीने यावर्षी अखिलेश वासुदेव समर्थ हा विध्यार्थी NIT आंध्रप्रदेश येथे उच्च शिक्षण घेत होता. आज अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब म्हणजे अखिलेश याचे नुकतेच नामांकित PEPSICO कंपनीत यशस्वी Placement झाले आहे.
हा प्रवास केवळ एका विध्यार्थ्याच्या यशाचा नसून, दानदात्यांच्या विश्वासाचा, सेवाभावाचा आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा जिवंत पुरावा आहे. आर्थिक अडचणी असूनही उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या होतकरू विध्यार्थ्याला योग्य वेळी मिळालेल्या सहकार्यामुळेच आज तो राष्ट्रीय स्तरावरील संस्थेत शिक्षण पूर्ण करून बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवू शकला.
सेवा सहयोग व सर्व दानदाते यांनी दिलेल्या मदतीमुळे अखिलेशचे भविष्य उज्ज्वल झाले असून, तो पुढे समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरेल, याची आम्हाला खात्री आहे. आपल्या सहकार्यामुळे एका कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे.
संस्कार संस्था, अखिलेश समर्थ व त्याचे कुटुंबीय यांच्या वतीने सर्व दानदात्यांचे मनःपूर्वक आभार व कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. भविष्यातही अशाच प्रकारे अनेक गरजू व होतकरू विध्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश पसरवण्यासाठी आपले सहकार्य लाभो, हीच सदिच्छा.
धन्यवाद!
– संस्कार संस्कार Girija Sirshikar Suparna Deshpande Ganesh Buddhawar Ganesh Thaware

धुरवीरहित चूल आणि ब्लॅंकेट वितरण
30/08/2025

धुरवीरहित चूल आणि ब्लॅंकेट वितरण

07/06/2025
06/06/2025

365 days निःशुल्क पाणपोई

उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव वृद्धिंगत व्हावा, जीवनकलेचे शिक्षण मिळावे तसेच सुसंस्कारित व्यक्तिमत्त्वाची ज...
09/05/2025

उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव वृद्धिंगत व्हावा, जीवनकलेचे शिक्षण मिळावे तसेच सुसंस्कारित व्यक्तिमत्त्वाची जडणघडण व्हावी, या उद्देशाने *"संस्कार केंद्र, एटापल्ली" येथील 10 विद्यार्थ्यांची* निवड "सुसंस्कार शिबिर, गुरुकुंज मोझरी" येथे करण्यात आली आहे.

या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना जीवनात सन्मार्गाने चालण्यासाठी आवश्यक अशा नैतिक मूल्यांचे, स्वच्छता, शिस्त, समता, सहकार्य, आणि राष्ट्रसेवा यांसारख्या बाबींचे शिक्षण दिले जाते. यामुळे ते सुसंस्कारित, जबाबदार आणि आत्मनिर्भर नागरिक म्हणून घडतात.

हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा असून त्यांच्यामध्ये समाजासाठी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतो.
With the aim of nurturing a spirit of service among students during the summer vacation, imparting the art of living, and shaping cultured personalities, 10 students from "Sanskar Kendra, Etapalli" have been selected to participate in the “Susanskar Shibir” at Gurukunj Mozari.

In this camp, students receive guidance on essential moral values needed to walk the path of righteousness in life—such as cleanliness, discipline, equality, cooperation, and national service. This helps them grow into cultured, responsible, and self-reliant citizens.

This initiative promotes the overall development of students and helps instill a positive outlook towards society.

लालसू तुमरेटी, जो एकेकाळी संस्कार संस्थेद्वारे शैक्षणिक दत्तक झाला होता, आज शेती व्यवसायात उल्लेखनीय प्रगती करत आहे. त्य...
18/12/2024

लालसू तुमरेटी, जो एकेकाळी संस्कार संस्थेद्वारे शैक्षणिक दत्तक झाला होता, आज शेती व्यवसायात उल्लेखनीय प्रगती करत आहे. त्याच्या प्रवासाची सुरुवात एका साध्या खेड्यातून झाली, जिथे शिक्षणाची साधने खूपच मर्यादित होती. संस्कार संस्थेच्या मदतीने लालसूने आपले शिक्षण पूर्ण केले आणि आधुनिक तंत्रज्ञान व कृषी तंत्रज्ञानाविषयी सखोल ज्ञान मिळवले.

शिक्षणाच्या आधारावर, तसेच संस्कारचा विध्यार्थी गोसू हिचामी याच्या मदतीने लालसूने शेतीकडे नवी दृष्टीकोनाने पाहायला सुरुवात केली. पारंपरिक पद्धतींबरोबरच त्याने सेंद्रिय शेती, सिंचन, पीक चक्र व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी उपकरणांचा वापर सुरू केला. सुरुवातीला लहानशा जमिनीवर काम करणाऱ्या लालसूने आता त्याचा शेत व्यवसाय विस्तारून विविध पिकांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

याशिवाय, तो इतर शेतकऱ्यांना सुद्धा सल्ला देतो आणि त्यांना आधुनिक शेती पद्धतींबद्दल मार्गदर्शन करतो. त्याच्या मेहनतीमुळे आणि तंत्रज्ञानाच्या योग्य वापरामुळे त्याला चांगले उत्पादन मिळाले, ज्यामुळे त्याच्या आर्थिक परिस्थितीतही खूप सुधारणा झाली आहे.

लालसूचे यश फक्त त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरले आहे. तो दाखवून देतो की शिक्षण व सातत्यपूर्ण प्रयत्नांनी कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते.

Address

Etapalli
Allapalli
442704

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9421728003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanskar Sansthan Etapalli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sanskar Sansthan Etapalli:

Share