ZEP Foundation

ZEP Foundation The Women empowerment movement.

'झेप' सहकारी व उत्पादित संस्था
रायगड जिल्ह्यात विशेषतः महिला सक्षमीकरणाच्या कार्यात अग्रेसर असणारी संस्था म्हणून 'झेप' संस्था कार्यरत आहे. खारेपाट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामुळे झेप संस्था आणि झेप संस्थेच्या अध्यक्षा सौ. चित्रा पाटील यांचे नाव संपूर्ण देशात पोहचले आहे.
झेप या संस्थेने रायगड जिल्ह्यात स्वतःच्या सामाजिक विकासाच्या ध्येयामुळे सामान्य लोकांमध्ये एक विश्वासाचे वातावरण निर्माण केले आ

हे. संस्थेने परिसरातील महिलांच्या दृष्टीने एक आदर्श निर्माण केला असून, महिलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी संस्था अध्यक्षा चित्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, आ. जयंतभाई पाटील व आ. पंडितशेठ यांच्या मार्गदर्शनाद्वारे यशस्वीपने वाटचाल करीत आहे.
संस्थेने आजपर्यंत राबवलेले यशस्वी उपक्रम
1.खारेपाट महोत्सव
2.पाककला स्पर्धा
3.आईच्या महानतेला सलाम
4. कला कौशल्य स्पर्धा
5. आदर्शांचा गौरव
6. महिला संगठन

भारताच्या नारीशक्तीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमीका सिंग  या दोन धाडसी महिलांनी ...
09/05/2025

भारताच्या नारीशक्तीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमीका सिंग या दोन धाडसी महिलांनी खऱ्या अर्थाने स्त्रीशक्ती काय असते हे जगासमोर सिद्ध करून दाखवले आहे. कर्नल कुरेशी या आंतरराष्ट्रीय सैनिकी मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी आहेत, तर विंग कमांडर व्योमीका सिंग यांनी भारतीय हवाई दलात अत्यंत कठीण परिस्थितीत देशसेवा करत आपल्या धैर्याची आणि समर्पणाची छाप उमटवली आहे. त्यांचे कर्तृत्व हे केवळ सैन्याच्या वेशात सिमित न राहता, लाखो तरुणींना प्रेरणा देणारे आहे. स्त्री म्हणजे केवळ कोमलता नव्हे, तर ती संकटाशी लढणारी, समाजाला दिशा देणारी आणि देशासाठी सर्वोच्च त्याग करणारी शक्ती आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. अशा वीर महिलांचा आपल्या देशाला अभिमान आहे.
#स्त्रीशक्ती

Address

Ambepur, Po. Poynad, Tal. Alibag, Dist. Raigad 402 108
Alibag
402108

Alerts

Be the first to know and let us send you an email when ZEP Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share