शव वाहिनीची सुविधा समाजासाठी उपलब्ध ?
Address
Alibag
402201
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Hearse Van - शव वाहिनी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Shortcuts
Category
HEARSE - शव वाहिनी
विश्वास दत्तात्रय खोत MH 06 AG 7062
गरीब कुटुंबातील, कोळीवाडा, अलिबाग येथे रहाणाऱ्या विश्वासने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करण्याच्या इराद्याने ३० ते ३२ वर्षापूर्वी एक टेम्पो कर्ज काढून विकत घेतला व तो व्यवसाय करू लागला, मात्र वेगळीच ट्रान्सपोर्ट सेवा करणे त्याच्या नशिबात होते अलिबाग सिव्हील हॉस्पिटल मध्ये रोहा तांबडी येथिल एक रुग्ण मरण पावला, त्याची पत्नीस ते शव तांबडीस न्यायचे होते ती खूप गरीब होती तिच्याकडे पैसेही नव्हते. गाडीने किंवा अम्बुलंसने नेणे तिला परवडणार नव्हते, कर्म धर्म संयोगानी विश्वास ला हे समजले, त्याला तिची दया आली. अंगावरील मंगळसूत्र विकून पैश्याची व्यवस्था करायचे तिने ठरविले. विश्वास ने तिला सांगितले गाडी वगैरे खर्च करत बसू नकोस, पार्थिव मी नेतो तांबडीला. कसलाही विचार न करता, अशा प्रकारचे विश्वास पहिले भाडे घेऊन तांबडीला पोहचला तेथे त्यांनी दिली ती रक्कम घेऊन अलिबागला परत आला आणि त्याचा समाजसेवेचा प्रवास तेथूनच सुरु झाला तो आजपर्यंत चालूच आहे. आज पर्यंत त्यांनी हजारो शव पोहचवली आहेत.
एखादा ट्रान्सपोर्टर आठवड्यातून एक दिवस सुटी घेईल, पण विश्वास कुठलीही सुटी न घेता दिवस, रात्र, केंव्हाही, कोठेही, कोणाचेही, पार्थिव पैसे मिळतील किंवा नाही याचा विचार न करता, बोलावणे आल्यावर घेऊन जातो, तो एवढेच करून थांबत नाही तर मदतही करतो, अगदी शव उचलण्यापासून, लाकडे गाडीत भरणे, उतरवण्या पर्यंत सर्वकाही.
त्याच्या या कार्यामुळेच तो सर्वपरिचित झाला आहे, त्याला माझा सलाम.