Navoday Foundation

Directions Website Contact the organization

Navoday Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Navoday Foundation, Non-Governmental Organization (NGO), Akola.

Navoday Graminvikas foundation working on sustainable development farmers, to educatiing their children, provide them sources of income, stopping migration of farmers families to other city.

09/08/2026

दि. 09/08/2026 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

विदर्भामध्ये वाढत चाललेली प्रचंड उष्णता, पर्यावरणातील बदल आणि वाढते प्रदूषण यांचा विचार करता, भविष्यातील पिढ्यांसाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. “निसर्गाचे ऋण फेडूया” या भावनेतून नवोदय फाउंडेशनतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे कार्य सातत्याने सुरू आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून यावर्षीदेखील नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमात कदंब, जांभूळ, नीम, वड आदी विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. आज लावलेले हे वृक्ष उद्याच्या पिढ्यांना शुद्ध हवा, सावली आणि निरोगी पर्यावरण प्रदान करतील, असा विश्वास आहे.

“एक झाड लावा, पर्यावरण वाचवा!”

🌱 नवोदय फाउंडेशन 🌱

PlantATree EcoFriendly NatureLovers EnvironmentalAwareness SustainableFuture

वृक्षारोपण झाडेलावा_झाडेजगवा पर्यावरणसंवर्धन हरितविदर्भ निसर्गप्रेमी स्वच्छहवा हरितक्रांती �

12/05/2026

02/05/2026
🌱 आपले उद्दिष्ट: • वाढते तापमान कमी करणे 🌡️ • जैवविविधता वाढवणे 🐦🦋 • हरित व स्वच्छ परिसर निर्माण करणे 🌍
02/05/2026

🌱 आपले उद्दिष्ट:
• वाढते तापमान कमी करणे 🌡️
• जैवविविधता वाढवणे 🐦🦋
• हरित व स्वच्छ परिसर निर्माण करणे 🌍

अमानतपूर (टाकोडा) आणि खडकी या दोन गावांच्या मधोमध उभारण्यात आलेला कचरा टाकण्याचा डेपो, जो मूळतः अकोला शहराच्या कचरा व्यव...
02/05/2026

अमानतपूर (टाकोडा) आणि खडकी या दोन गावांच्या मधोमध उभारण्यात आलेला कचरा टाकण्याचा डेपो, जो मूळतः अकोला शहराच्या कचरा व्यवस्थापनासाठी निर्माण करण्यात आला होता, तो सध्या आसपासच्या गावकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच मुलं, वृध्द आणि नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे.

समस्यांचा तपशील

आरोग्यावर गंभीर परिणाम :

या डेपोवर रोज मोठ्या प्रमाणात टाकण्यात येणारा मिश्रित व असंवर्गीकृत कचरा सतत कुजत राहतो, ज्यामुळे २४ तास असह्य दुर्गंधी पसरत आहे. मुलं, वृध्द, आजारी व्यक्ती आणि सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पर्यावरणीय प्रदूषण :

प्लास्टिक, रासायनिक अवशेष आणि कुजलेला कचरा यामुळे आसपासची जमीन, पिके व भूजल प्रदूषित होत आहे. शेतजमिनींची सुपीकता कमी होत असून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

लहान शेतकऱ्यांचा जीव धोक्यात :

शेतांच्या अगदी जवळ असलेल्या या डेपोमुळे पिकांना संसर्ग, कीड व रोग यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना सुरक्षित जीवनमान धोक्यात आले आहे.

कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही :

संपूर्ण डेपोवर कुंपण नाही, वैज्ञानिक कचरा प्रक्रिया नाही, देखरेख नाही – अशा परिस्थितीत हा डेपो गावकऱ्यांसाठी सततचा धोका बनला आहे.

जनावरांची व आरोग्याची हानी :

जनावरे कचऱ्यात चरत असून विषारी पदार्थ खात आहेत. मच्छर व कीटकांची संख्या वाढत आहे. गावात श्वसनविकार, त्वचारोग, ताप, संसर्गजन्य आजार वाढत आहेत.

गावकऱ्यांचा सवाल — आमच्या डोक्यावर कचरा डेपो का?

अकोला शहराचा कचरा ग्रामीण भागाच्या अंगणात टाकण्याचे योजनेत मानवी हक्क, पर्यावरण नियम आणि सार्वजनिक आरोग्य नियमांचे उल्लंघन होत आहे.

गावकऱ्यांचे जीवन धोक्यात घालण्यात कोण जबाबदार?

आमच्या मागण्या

वरील परिस्थिती लक्षात घेता, आम्ही खालील तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करीत आहोत :

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आरोग्य विभागाकडून तात्काळ स्थळ तपासणी.

कचरा डेपोचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन, Solid Waste Management Rules 2016 नुसार.

कचरा डेपो लोकवस्तीपासून दूर सुरक्षित जागी हलविणे.

निष्कर्ष

ही बाब जीवन-मरणाचा प्रश्न बनली असून तात्काळ कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे.

अमानतपूर (टाकोडा) व खडकी गावातील रहिवासी, शेतकरी व नागरिक यांच्यावर होणारा अन्याय त्वरित दूर करून क़ायम बंद करावा व या गंभीर प्रश्नावर शासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा ही नम्र विनंती.

Address

Akola
444006

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navoday Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Navoday Foundation:

Shortcuts

Share