Swami Vivekanand Group Of Organization

Swami Vivekanand Group Of Organization INDIA

 #प्रा_राजेश_पाटिल_ताले_यांना  #राज्यस्तरीय_पुस्तकमित्र_पुरस्कार_२०२६_जाहीरपश्चिम विदर्भातील वाचन चळवळीचे प्रेरणादायी ने...
16/03/2026

#प्रा_राजेश_पाटिल_ताले_यांना
#राज्यस्तरीय_पुस्तकमित्र_पुरस्कार_२०२६_जाहीर

पश्चिम विदर्भातील वाचन चळवळीचे प्रेरणादायी नेतृत्व करणारे
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष, राष्ट्रीय व्याख्याते #प्रा_राजेश_पाटील_ताले
यांना यावर्षीचा मानाचा
#राज्यस्तरीय_पुस्तकमित्र_पुरस्कार_२०२६
वीर भगतसिंग युथ फोरम, मुंबई यांच्या वतीने जाहीर झाला आहे.
गेल्या १२ वर्षांपासून “गाव तिथं वाचनालय-शाळा तिथं ग्रंथालय” या उपक्रमातून त्यांनी ग्रामीण भागात वाचन संस्कृतीचा दीप प्रज्वलित केला आहे.
📚 या उपक्रमांतर्गत –
▪️ पश्चिम विदर्भात ११५ वाचनालयांची स्थापना.
▪️ १ लाखांहून अधिक पुस्तके ग्रामीण शाळांना व विद्यार्थ्यांना वितरण.
▪️ अकोला जिल्ह्यातील माझोड गाव “पुस्तकांचे गाव” बनविण्याचा उपक्रम.
▪️ विद्यार्थी व पालकांमध्ये वाचनाची सवय वाढविण्यासाठी “वाचनध्यास” अभियान.
या उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर घेतलेली दखल म्हणजेच हा सन्मान होय.
📖✨ “ज्ञानाचा दीप तेवत राहो, वाचन चळवळ अधिक व्यापक होवो”
अशा शुभेच्छा वीर भगतसिंग युथ फोरम कडून व्यक्त करण्यात आल्या.

👏💐 *हार्दिक अभिनंदन* 💐👏

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

💐🎂🎂🎂🎂🎂🎂💐 #वाढदिवस_अभिष्टचिंतनपूर्ण भारतातून ७ लोकांना दिल्या जाणारा #आऊटस्टँडिंग_यंग_पर्सन ंडिया_अवॉर्ड२०२४ चे विजेतेयुथ...
22/02/2026

💐🎂🎂🎂🎂🎂🎂💐
#वाढदिवस_अभिष्टचिंतन

पूर्ण भारतातून ७ लोकांना दिल्या जाणारा
#आऊटस्टँडिंग_यंग_पर्सन
ंडिया_अवॉर्ड
२०२४ चे विजेते
युथ आयकॉन,युथ आयडॉल
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष,युवा व्याख्याते
#प्रा_राजेश_पाटिल_ताले
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यानेअकोला जिल्हा,महाराष्ट्र राज्याचे नाव #आंतरराष्ट्रीय_पातळीवर नावलौकिक करणारे,अकोला जिल्ह्यात वाचनालय चळवळीच्या माध्यमातून
#गाव_तिथं_वाचनालय आणि #पुस्तकांचं_गाव_माझोड चे संकल्पक,स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष,
#प्रा_राजेश_पाटिल_ताले
यांना
#वाढदिवसाच्या_मनःपूर्वक #हार्दिक_शुभेच्छा
💐🎂🎂🎂🎂🎂🎂💐

 #माझोड_येथे_स्वामी_विवेकानंद_सन्मान_कर्तृत्वाचा  #पुरस्कार_सोहळा_आणि_गुणवंत_विद्यार्थ्यांचा_सत्कार  #समारंभ_संपन्नस्वाम...
14/09/2025

#माझोड_येथे_स्वामी_विवेकानंद_सन्मान_कर्तृत्वाचा #पुरस्कार_सोहळा_आणि_गुणवंत_विद्यार्थ्यांचा_सत्कार #समारंभ_संपन्न

स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशन द्वारा माझोड येथे राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार सोहळा आणि इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओझोन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. विनीत हिंगणकर, उदघाटक म्हणून साने गुरुजी शिक्षक सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.दिलीप अंधारे, प्रमुख अतिथी म्हणून जागेश्वर विद्यालय वाडेगाव चे प्राचार्य गोपाल मानकर,प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ.प्रणय महल्ले, युवा उद्योजक नीरजदादा देशमुख, चिखलगाव सर्कल पंचायत समिती सदस्य सचिनदादा थोरात उपस्थित होते. या कार्यक्रमध्ये विदर्भात शैक्षणिक/सामाजिक/कृषि,/आरोग्य इ.क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा.मनीष मानकर, प्रा.अश्विनी फोकमारे, प्रा.वृषाली ताले,
प्रा.गोकुळ राठोड, प्राचार्य प्रशांत बोथे आणि
प्रा.अभिजित मुळे यांना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार-2025 देऊन ग्रुपच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये स्वामी विवेकानंद ग्रुप च्या वतीने अकोला जिल्ह्यातील जवळपास १०० विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. प्रा. राजेश पाटिल ताले यांनी मार्गदर्शन करताना #पुस्तकांचे_गाव_माझोड या उपक्रमाविषयी माहिती दिली.स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशन चे शैक्षणिक व सामाजिक कार्य अकोला जिल्ह्याकरिता अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन डॉ.विनीत हिंगणकर यांनी अध्यक्षीय भाषण करताना केले.

 #माझोड_पुस्तकांचे_गाव_घडवणारे_परिवर्तनकारी_तरुण*आज माझ्या निवासस्थानी माझोड या महाराष्ट्रातील दुसऱ्या पुस्तकांच्या गावा...
28/07/2025

#माझोड_पुस्तकांचे_गाव_घडवणारे_परिवर्तनकारी_तरुण*

आज माझ्या निवासस्थानी माझोड या महाराष्ट्रातील दुसऱ्या पुस्तकांच्या गावाचे शिल्पकार, तरुण, तडफदार आणि प्रेरणादायी व्याख्याते,स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशन चे अध्यक्ष आदरणीय प्रा.राजेशजी ताले आणि उपाध्यक्ष त्यांचे सहकारी प्रतीक ताले यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांच्या वाचन प्रेरणा मोहिमेची माहिती ऐकताना मन भारावून गेले. त्यांनी आतापर्यंत अकोला जिल्ह्यात ११३ गावांमध्ये वाचनालय उभे केले असून, ७ ठिकाणी पुस्तक बँका सुरू केल्या आहेत.
"गाव तिथं वाचनालय, शाळा तिथं ग्रंथालय" हा त्यांचा उपक्रम काळाच्या गरजेनुसार समाजमनात बदल घडवणारा आहे.

#स्वामी_विवेकानंद_ग्रुप_ऑफ_ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून त्यांनी माझोड गावात ३५ हजार पुस्तके लोकवर्गणीतून जमा करून अभूतपूर्व वाचन चळवळ उभारली आहे. याच वाचनसंस्कारातून आज त्या गावात ३५० हून अधिक वक्ते घडले आहेत ही बाब खरंच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.

आज या गावाला अनेक सामाजिक आणि राजकीय दिग्गजांनी भेट दिली असून, आदरणीय प्रा.राजेश ताले यांना त्यांच्या कार्याची प्रचिती म्हणून अनेक सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

या विलक्षण कार्यकर्तृत्वासाठी आदरणीय प्रा.राजेशजी ताले व त्यांच्या संपूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!!!

#नितीन_वरणकार
(हास्यकवी-शेगाव )

ज्यांचे अवघे जीवन म्हणचे पराक्रमाचा,पौरुषाचा,धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांच्या जयघोषाचा एक महोत्सव होता.लाखो तरुणांना द...
04/07/2025

ज्यांचे अवघे जीवन म्हणचे पराक्रमाचा,पौरुषाचा,धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांच्या जयघोषाचा एक महोत्सव होता.लाखो तरुणांना देशप्रेम,देशातील गोरगरीब जनतेच्या सेवेची प्रेरणा देणारे ज्ञान,कर्म,भक्ती,योग,ध्यान-धारणा व समाधी या संकल्पनांचे जाणकार व भाष्यकार,
योद्धा संन्यासी :- स्वामी विवेकानंद यांचा आज स्मृतिदिन.
"आपल्या एका जन्मात अनेकांचे जन्म ते जगले".
-प्राचार्य शिवाजीराव भोसले.

#स्वामी_विवेकानंद_यांना_स्मृतिदिनानिमित्य
#विनम्र_अभिवादन...!!!

 #दैनिक_दिव्य_मराठी अंतर्गत  #माझे_गाव विशेष सदरवाचन संस्कृतीला चालना देणारे  #पुस्तकांचे_गाव_माझोड #स्वामी_विवेकानंद_ग्...
27/06/2025

#दैनिक_दिव्य_मराठी अंतर्गत
#माझे_गाव विशेष सदर
वाचन संस्कृतीला चालना देणारे
#पुस्तकांचे_गाव_माझोड

#स्वामी_विवेकानंद_ग्रुप_ऑफ_ऑर्गनायजेशन
चा अभिनव उपक्रम.

 #सन्मान_सोहळा...!!!इयत्ता १० वी आणि १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन...
24/06/2025

#सन्मान_सोहळा...!!!
इयत्ता १० वी आणि १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार-२०२५ सन्मान सोहळा कार्यक्रम...!!!

 #शिवराज्याभिषेक_दिन_कार्यक्रम.वर्धमान बहूउद्देशिय संस्था अंतर्गत रसिकलालजी धारिवाल खा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलेगाव...
06/06/2025

#शिवराज्याभिषेक_दिन_कार्यक्रम.

वर्धमान बहूउद्देशिय संस्था अंतर्गत रसिकलालजी धारिवाल खा.औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलेगाव ता. पातूर जि. अकोला द्वारा #शिवराज्याभिषेक_दिन_कार्यक्रम आयोजित करण्यात आला.महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक संस्थांमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतेच्या मंत्रालयाच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे व्हिडिओद्वारे ऑनलाईन उद्घाटन #महाराष्ट्र_राज्याचे_मुख्यमंत्री_माननीय
#देवेंद्रजी_फडणवीस यांनी केले.
या वर्षीच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त, महाराष्ट्र राज्य सरकारने पंचपरिवर्तन व्याख्यान संकल्पना राबवली,याअंतर्गत स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष,राष्ट्रीय व्याख्याते #प्रा_राजेश_पाटिल_ताले यांनी
#सामाजिक_समरसता या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात व्यासपीठावर मा. श्री. सुभाषजी जैन (अध्यक्ष:- आलेगाव एज्युकेशन सोसायटी व आदर्श गोसेवा अनुसंधान प्रकल्प अकोला), मा. डॉ. मोहन राऊत (पशुधनविकास अधिकारी 'गट अ' अकोला), मा. श्री. कपिल खरप, मा. श्री. नानासाहेब देशमुख, मा. श्री. राधेशाम शर्मा आणि मा. श्री. अनंत शेळके उपस्थित होते.
शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील विविधता व एकात्मतेवर संवाद साधला गेला आणि सामाजिक समरसतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रा.राजेश पाटिल ताले यांनी मार्गदर्शन करताना केले.

वर्धमान बहूउद्देशिय संस्था द्वारा संचालित  #रसिकलालजी_धारिवाल_खा #औद्योगिक_प्रशिक्षण_संस्था_आलेगाव (ता.पातूर जि.अकोला)द्...
05/06/2025

वर्धमान बहूउद्देशिय संस्था द्वारा संचालित
#रसिकलालजी_धारिवाल_खा
#औद्योगिक_प्रशिक्षण_संस्था_आलेगाव
(ता.पातूर जि.अकोला)
द्वारा आयोजित
#शिवराज्याभिषेक_दिन_कार्यक्रम...!!!

#प्रमुख_मार्गदर्शक
प्रा.राजेश पाटिल ताले
(अध्यक्ष :-स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशन)

#विषय :- सामाजिक समरसता.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

 #राज्यस्तरीय_स्वामी_विवेकानंद_सन्मान_कर्तृत्वाचा  #पुरस्कार_२०२५_जाहीर. #स्वामी_विवेकानंद_ग्रुप_ऑफ_ऑर्गनायजेशन द्वारा द...
28/05/2025

#राज्यस्तरीय_स्वामी_विवेकानंद_सन्मान_कर्तृत्वाचा #पुरस्कार_२०२५_जाहीर.

#स्वामी_विवेकानंद_ग्रुप_ऑफ_ऑर्गनायजेशन द्वारा दरवर्षी शैक्षणिक /सामाजिक/साहित्य/कृषि/प्रशासकीय /आरोग्य /पत्रकारिता इ. क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६ मान्यवरांना
#राज्यस्तरीय_स्वामी_विवेकानंद_सन्मान_कर्तृत्वाचा
#पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.यावर्षीसुद्धा स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशन च्या संशोधन व विकास समिती मार्फत "राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार:-२०२५" ची माझोड येथे घोषणा करण्यात आली. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाची निवड करण्यात आलेली आहे.

 #अकोला_जिल्ह्यातील_माझोड_हे_गाव_पुस्तकगाव  #होण्याच्या_मार्गांवर स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशन चा अभिनव उपक्रम ...
13/05/2025

#अकोला_जिल्ह्यातील_माझोड_हे_गाव_पुस्तकगाव #होण्याच्या_मार्गांवर

स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशन चा अभिनव उपक्रम

#पुस्तकगाव_माझोड

 #चला_देश_घडवूया :- प्रा. राजेश पाटिल ताले(बालसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद)स्वयंभू महादेव मंदिर, अंत्री(म...
04/05/2025

#चला_देश_घडवूया :- प्रा. राजेश पाटिल ताले

(बालसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद)

स्वयंभू महादेव मंदिर, अंत्री(मलकापूर) येथे भारत एक कदम ग्रुप, मर्जी पांडुरंगाची ग्रुप आणि अनिल अंभोरे यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्ती महाराज माळी, सचिन महाराज कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली
#सर्वांगीन_विकास_वारकरी_बालसुसंस्कार_शिबीर चे आयोजन करण्यात आलेले आहे.स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशन चे अध्यक्ष, राष्ट्रीय व्याख्याते प्रा. राजेश पाटिल ताले या शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. #चला_देश_घडवूया या विषयावर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व विचार रुजविणे काळाची गरज आहे. बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून संताचे विचार विद्यार्थ्यांना कळावेत, संतांच्या विचारांवर विद्यार्थ्यांची पायाभरणी व्हावी, विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावी हे कार्य सृजनशील समाजनिर्मितीसाठी आवश्यक असल्याचे प्रा. राजेश पाटिल ताले यांनी सांगितले.या मार्गदर्शन कार्यक्रमाकरिता ह.भ. प.निवृत्ती महाराज माळी, ह.भ. प.सचिन कराळे, अनिल अंभोरे प्रतीक ताले उपस्थित होते.स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशन च्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शिबिर आयोजन समितीच्याकडून प्रा. राजेश ताले यांना सन्मानित करण्यात आले.

Address

Akola
444006

Telephone

9158401280

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekanand Group Of Organization posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Swami Vivekanand Group Of Organization:

Share