Akola Association Of Physiotherapy.

Akola Association Of Physiotherapy. Association of Professional Physiotherapist practicing in Akola District.

2nd Western Vidarbha Physio Meet.
25/08/2025

2nd Western Vidarbha Physio Meet.

77 Followers, 24 Following, 16 Posts

14/07/2025
15/05/2025
अकोला येथे जागतिक महिला दिनानिमित्त जनजागृती व्याख्यानमाला संपन्नअकोला: जागतिक महिला दिनानिमित्त अकोला असोसिएशन ऑफ फिजिय...
15/03/2025

अकोला येथे जागतिक महिला दिनानिमित्त जनजागृती व्याख्यानमाला संपन्न
अकोला: जागतिक महिला दिनानिमित्त अकोला असोसिएशन ऑफ फिजियोथेरेपिस्ट महिला सेलच्या वतीने दिनांक ९, ११ आणि १२ मार्च २०२५ रोजी विविध जनजागृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेत महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. माहेश्वरी महिला संघ आणि रोटरी क्लब ऑफ अकोला यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.
९ मार्च रोजी हनुमान नगर इथे डॉ. शिरीन देशमुख यांनी व्यायामाबद्दलचे गैरसमज आणि डॉ. कीर्ती कोठारी यांनी चाळीशीनंतर स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्या या विषयांवर मार्गदर्शन केले. ११ मार्च रोजी महात्मा फुले नर्सिंग महाविद्यालय येथे डॉ. मेघना गांधी यांनी नर्सिंग विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. १२ मार्च रोजी माहेश्वरी भवन इथे डॉ. दुर्गा लढ्ढा आणि डॉ. बेला राठी यांनी स्त्री आरोग्यासाठी पेल्विक फ्लोर चे महत्व याबद्दल मार्गदर्शन केले.

आज दि.८/०९/२०२४ रोजी जागतिक फिजिओथेरपी दिनाचे औचित्य साधून अकोला असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट आयोजित वेस्टर्न विदर्भ फिजिओ ...
08/09/2024

आज दि.८/०९/२०२४ रोजी जागतिक फिजिओथेरपी दिनाचे औचित्य साधून अकोला असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट आयोजित वेस्टर्न विदर्भ फिजिओ मिट कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.
सदर कार्यक्रमाचे मुख्य वक्ते डॉ. विशाल पटले सर व डॉ. आशीष अग्रवाल सर यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन केले. तसेच,अकोला असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट संघटनेचे १० वर्ष पुर्ण झाल्याबद्दल एसोसिएशन च्या दशकातील कार्याचा आढावा घेणारी एक चित्रफीत डॉ अतुल काळे सरांनी सादर केली.
तसेच एसोसिएशन च्या नवीन कार्यकारिणी समितीचे गठन झाले त्यानुसार समितीचे पद पुढील प्रमाणे.
डॉ. दर्शन लढ्ढा -अध्यक्ष
डॉ. प्रणव पाथरकर- सचिव
डॉ. दुर्गा लढ्ढा- सहसचिव
डॉ.विद्याधर वणवे-खजिनदार
डॉ. कैवल्यनाथ पारसकर-जनसंपर्क
तसेच या कार्यक्रमात डॉ. जवाहर बगडीया सरांना त्यांच्या आदर्श जीवन कार्य कर्तुत्व याचा गौरव करत त्यांना जीवन-गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम vissco,flamingo,Sun-Pharma,Neurowalk system,Truehealthy यांनी काही अंशी प्रायोजित केला होता.

पश्चिम विदर्भातील फिजिओथेरपिस्ट व्यावसायिकांना अकोला एसोसिएशन ऑफ  फिजिओथेरपिस्ट कडून आग्रहाचे निमंत्रण. टिप.       आपल्य...
22/08/2024

पश्चिम विदर्भातील फिजिओथेरपिस्ट व्यावसायिकांना अकोला एसोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट कडून आग्रहाचे निमंत्रण.
टिप.
आपल्या कार्यक्रमाची जागा आरक्षित करण्यासाठी खालील लिंक वर फॉर्म 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन भरणे अनिवार्य आहे.

https://docs.google.com/forms/d/1rcX0nLcxSu5iti5Do1VwMKO_BCEPyArpJoOuy5HkBk8/edit

Address

Akola
444001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akola Association Of Physiotherapy. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share