योग्य: Savalee - Sankalp Pratishthan सावली - संकल्प प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Ahmednagar
  • योग्य: Savalee - Sankalp Pratishthan सावली - संकल्प प्रतिष्ठान

योग्य: Savalee - Sankalp Pratishthan सावली - संकल्प प्रतिष्ठान Sankalp Pratishthan runs ‘SAVALI’, a shelter home for 50 destitute and deprived children in Kedgaon,

‘संकल्प प्रतिष्ठान’ची स्थापना निराधार, वंचित, उपेक्षित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अहमदनगर शहरात सन २००१ साली करण्यात आली. समाजातील वेगवेगळे प्रश्न असणारी मुलं सावलीत येत गेली. काही मुलांचे आईवडील दुर्धर आजाराने निधन पावलेले, तर काहींच्या आईवडिलांनी आत्महत्या केलेली. काहींचे आई-वडील विभक्त झालेले तर काही मुलांचे आई-वडील मानसिक रुग्ण आहेत. अशा सर्व परिस्थितीतून आलेली, एकाकी, मानसिक दडपण असलेली,

आत्मविश्वास गमावलेली, त्यामुळे विध्वंसक मनोवृत्ती बनलेली, रोगाने पिडीत असलेली मुले सावलीत येत गेली. या 20वर्षांच्या काळात सामाजिक कृतज्ञता असणाऱ्या अनेक व्यक्तींच्या सहयोगाने, सावलीच्या कामावर विश्वास ठेवल्याने मुलांना कौटुंबिक वातावरण, चांगले शिक्षण, पोषक आहार, आरोग्याच्या सुविधा, शुद्ध पाणी, व राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन देता आली.

लोकसहभागामुळे मुलांना संगीताचे शिक्षण, संगणकाचे प्रशिक्षण, तायक्वान्दोचे प्रशिक्षण मिळते आहे. सामाजिक कृतज्ञता असणारी अनेक कुटुंबे व व्यक्ती ‘सावली’तील मुलांसाठी जबाबदारीने भक्कमपणे उभी राहिली, त्यामुळे मुलांना आज तात्पुरता निवारा मिळू शकला आहे. आज मुलांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा आहे. ही जागा ५० मुलांसाठी पुरेशी जागा नसली तरी, आजूबाजूची घरे तात्पुरत्या स्वरुपात राहण्यासाठी मिळाल्याने मुलांना कौटुंबिक वातावरण दिलं गेलं. “प्रत्येक मूल खास आहे” हा ‘सावली’च्या कामाचा मुख्य गाभा आणि “प्रत्येक मुलाचा विकास” हेच ‘सावली’चे स्वप्न आहे. मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी ‘सावली’ उभी राहिल्यामुळे ही स्वप्नं जिवंत झाली. तसेच, मुलांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण झाली. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यात काम करण्याचा दृष्टीकोन प्रत्येक मुलामध्ये निर्माण झाला. मुलांच्या उज्वल भविष्याची जबाबदारी घेण्यासाठी कुणीतरी उभे राहिल्याने मुलांना मूलपण उपभोगता आले आहे. आज ‘सावली’ची काही मुले डिप्लोमा करत आहेत, काही मुलांचे आयटीआयचे शिक्षण पूर्ण झाले आहे. आवडीनुसार मुले पदवीचे शिक्षण घेत आहे, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास, परसबाग, गो-शाला, तर काही मुले नोकरी-व्यवसाय करायला लागली आहेत. काही मुलींची लग्नं झाली असून त्या आनंदाने आयुष्य घडवू लागल्या आहेत.
असे असले तरी, आजपर्यंतचा प्रवास हा सातत्याने संघर्षाचा व तात्पुरत्या मदतीवरच अवलंबून राहिला आहे. आज या मुलांना घरातील मुलांसारखे सांभाळण्यासाठी कायमस्वरुपी मदतीचे हात नाहीत. अनपेक्षित येणाऱ्या मदतीवरच दैनंदिन गरजा पूर्ण होत आहेत. अशीच परिस्थिती राहिली, तर या मुलांना घरातील मुलांप्रमाणे सांभाळण्याचे स्वप्न अधुरेच राहील आणि समाजातील अनेक निराधार मुले सर्वांगीण विकासापासून वंचित राहतील. हीच मुले विध्वंसक दिशेने जाण्याच्या शक्यता निर्माण होतील. आपण ‘सावली’च्या या मुलांसाठी जबाबदारीने उभे राहिलात, तर मुलांचे आयुष्य चांगले आणि विधायक बनवता येईल आणि देशासाठी कार्य करणारे जबाबदार नागरिक घडवणे शक्य होईल.

मुलांना राहण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध करून देणे व मुलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे, यासाठी अनेक मदतीचे हात हवे आहेत. अनेक लोकांच्या विश्वासातून व सहयोगातून उभे राहत असलेल्या ‘सावली’च्या कार्याची संपूर्ण माहिती घेऊन, या मुलांच्या जडणघडणीत आपण सक्रीय सहभागी व्हाल अशी आम्हाला आशा आहे.

* मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण खालील प्रकारे सहकार्य करू शकता –

१} मुलांना राहण्यासाठी मुबलक जागेची आवश्यकता आहे. साधारण पाच एकर इतक्या जागेत, निवास व्यवस्था, प्रशिक्षण केंद्र, गो-शाला, कौशल्य-विकास केंद्र, व्यवसाय-शिक्षण (प्लंबिंग, इलेक्ट्रीकल, पेंटिंग, वेल्डिंग, ऑटोमोबाईल, इ.), शेती-अभ्यास केंद्र, संगणक केंद्र, विज्ञान प्रयोगशाळा, तसेच निवासी शाळा उभी करण्याची योजना आहे.
२} रोजच्या दोन वेळेच्या जेवणासाठी, दोन वेळेच्या नाष्ट्यासाठी आपण रु.५,००१/- देणगी देऊ शकता.
३} मुलांसाठी वर्षातून दोन नवीन ड्रेस, शाळेचे दोन ड्रेस घेऊन देऊ शकता. (कृपया जुने, वापरलेले कपडे देऊ नयेत. मुलांचा आत्म-सन्मान टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.)
४} एका मुलाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन वार्षिक रु.६,५००/- देऊ शकता.
५} एका मुलाचे भोजन, शिक्षण, आरोग्य, निवास, हॉबी क्लासेस, शिकवणी, कपडे, शूज, तेल, साबण, इ. दैनंदिन गरजेकरिता आपण वार्षिक रु.४१,०००/- देऊ शकता.
६} आपला अमूल्य वेळ व कौशल्य मुलांसाठी खर्च करु शकता. मुलांना शैक्षणिक व विविध छंदविषयक मार्गदर्शनाची सतत आवश्यकता असते. आपल्या मदतीने मुले त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणू शकतात.
७} ‘सावली’च्या कार्याची संपूर्ण माहिती घेऊन, समाजातील इतर जबाबदार व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करु शकता..
संपर्क..
9890969315
वेब साईट- www.savalee.org
ईमेल- [email protected]

17/05/2026

जो स्वतःच्या एकांतात आनंदी राहू शकतो, तोच दुसऱ्यांना खरा आनंद देऊ शकतो.

17/05/2026

"प्रत्येक माणसाच्या आत एक न दिसणारे सौंदर्य असते, आणि आपण जेव्हा एखाद्याची सेवा करतो तेव्हा आपण त्या सौंदर्याला स्पर्श करत असतो."

15/05/2026

आनंदाची सुट्टी...
आनंदाच्या सावलीत.
Nitesh Bansode #संकल्पप्रतिष्ठान #सावली #इंग्लिश

14/05/2026

इंग्लिश क्लास मराठीतून.. मुलांची इंग्रजी ची भीती हळूहळू कमी होत आहे. रोज अनेक इंग्रजी शब्द मुलांच्या पोतडीत जमा होत आहे...
Nitesh Bansode Sudhir Lanke #संकल्पप्रतिष्ठान #इंग्लिश #अहिल्यानगर #सावली

मराठीतून इंग्लिश शिकण्याचा online क्लास रोज संध्याकाळी सुरू आहे..सावलीच्या स्नेही शीतल फंड मॅडम यांनी खूप छान नियोजन केल...
14/05/2026

मराठीतून इंग्लिश शिकण्याचा online क्लास रोज संध्याकाळी सुरू आहे..
सावलीच्या स्नेही शीतल फंड मॅडम यांनी खूप छान नियोजन केल्यामुळे मुलांना संधी मिळाली आहे..
Nitesh Bansode #संकल्पप्रतिष्ठान #सावली #इंग्लिश

28/04/2026
 ोटासा बदल आणि माणुसकीचा 'क्यूआर कोड'! 📱❤️अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मी एक पोस्ट केली होती की, या सणाचे औचित्य साधून आप...
28/04/2026

ोटासा बदल आणि माणुसकीचा 'क्यूआर कोड'! 📱❤️
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मी एक पोस्ट केली होती की, या सणाचे औचित्य साधून आपल्या 'सावली'तील मुलांच्या भोजनासाठी मदतीचा हात द्यावा. एका मुलाचा दिवसाचा खर्च १०० रुपये, महिन्याचे ३००० आणि वर्षाचे ३६,००० रुपये... असा विषय घेऊन एक डिझाइनही तयार केलं होतं.
पण एक तांत्रिक अडचण येत होती, त्या डिझाइनमध्ये मला क्यूआर कोड (QR Code) व्यवस्थित सेट करता येत नव्हता. मी सकाळी जवळच्या काही लोकांना मेसेज पाठवला खरा, पण क्यूआर कोड नीट नसल्याने त्याचा उपयोग होत नव्हता.
आणि मदतीला धावून आले ' #डीडी'...
त्याच क्षणाला माझे मित्र #धनंजय_देशपांडे_डीडी) यांनी मला क्यूआर कोड मागितला. त्यांनी फक्त कोड मागितलाच नाही, तर काही क्षणातच मुलांच्या भोजनासाठी ३,००० रुपये पाठवून दिले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर मी बनवलेल्या त्या डिझाइनवर तो क्यूआर कोड तांत्रिकदृष्ट्या अगदी अचूक बसवून ती डिझाइन मला पुन्हा पाठवून दिली!
गोष्ट तशी छोटी वाटेल, पण यामागे डीडींची जी तत्परता आणि मदतीची भावना होती ती खरंच मोठी आहे.
काम सोपे झाले आणि आनंद द्विगुणीत झाला!
आमच्या एका ज्येष्ठ ताईंना बँक डिटेल्स बघून पैसे पाठवणं थोडं अवघड जायचं. पण डीडींनी दुरुस्त करून दिलेल्या त्या डिझाइनमुळे आणि क्यूआर कोडमुळे त्यांना पैसे पाठवणं इतकं सोपं झालं की त्यांनाही त्याचा मोठा आनंद वाटला. एक छोटीशी मदत किती लोकांचे काम सोपे करते आणि किती जणांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवते, याचंच हे उदाहरण!
#धनंजय_देशपांडे यांचे या प्रेमळ सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद!
आपणही 'सावली'च्या या कार्यात सहभागी होऊ शकता:
खालील बँक खात्यावर किंवा क्यूआर कोड स्कॅन करून आपण आपले योगदान देऊ शकता:अक्षयतृतीया #सावली #संकल्पप्रतिष्ठान #माणुसकी #मदत #धन्यवाद #अहिल्यानगर

 #इवल्याशा_हातांतील_पसाभर_धान्य' माणुसकीची नवी 'सावली'! 🌾✨​माणुसकी नेमकी कुठे असते? ती मोठ्या भाषणांत नसते, ती असते लहान...
28/04/2026

#इवल्याशा_हातांतील_पसाभर_धान्य'
माणुसकीची नवी 'सावली'! 🌾✨
​माणुसकी नेमकी कुठे असते? ती मोठ्या भाषणांत नसते, ती असते लहान मुलांच्या त्या निरागस डोळ्यांत आणि संकटात दुसऱ्यासाठी पुढे सरसावलेल्या इवल्याशा हातांत. असाच एक काळजाला भिडणारा प्रसंग नुकताच देडगाव तालुका नेवासा येथील ' #तक्षशिला शाळेत' अनुभवायला मिळाला.
​एक भन्नाट जिद्द: प्रा. विजय कदम सर
अहमदनगरच्या नगर कॉलेजमध्ये प्रोफेसर असलेले #प्रो_विजय_कदम सर हे व्यक्तिमत्व म्हणजे ऊर्जेचा झरा! केवळ २० टक्के दृष्टी असूनही, गेल्या १२ वर्षांपूर्वी त्यांनी एक स्वप्न पाहिलं—आपल्या ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाची शाळा उभी करायची. आज त्याच शाळेत ६०० हून अधिक मुले ज्ञानार्जन करत आहेत. कदम सर माझे जुने मित्र, त्यांनी शाळेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी मला निमंत्रित केलं होतं. पण तिथे जे घडलं, ते कोणत्याही बक्षीसापेक्षा मौल्यवान होतं.
​'पसाभर धान्य'... एक भावनिक साद
कार्यक्रमाच्या ओघात कदम सरांनी मुलांसमोर एक विचार मांडला. ते म्हणाले, "मुलांनो, आपल्या घरातून फक्त 'पसाभर धान्य' आपल्या सावलीतल्या भावंडांसाठी घेऊन या." सरांची ही एक छोटीशी हाक मुलांच्या मनाला थेट भिडली.
​भारावून टाकणारे ते दृश्य
बक्षीस वितरणाचा दिवस उजाडला आणि शाळेचं अंगण माणुसकीच्या ओलाव्यानं न्हाऊन निघालं. छोटी-छोटी मुलं, ज्यांना स्वतःचं दप्तर पेलवत नाही, ती मुलं आपल्या कुवतीनुसार धान्याची गाठोडी घेऊन शाळेत येत होती. काही मुलं तर घरून हट्ट करून धान्य घेऊन आली होती. त्यांच्या चेहऱ्यावर 'आपण आज काहीतरी मोठं काम केलंय' असा एक विलक्षण आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होतं.
​त्या दिवशी शाळेत तब्बल १० पोते धान्य जमा झालं! हे केवळ धान्य नव्हतं, तर विजय कदम सरांनी मुलांच्या कोवळ्या मनात पेरलेलं 'संवेदनांचं बीज' होतं.
​मदतीचा ओघ आणि बदलतं गाव
याच प्रसंगी #निवृत्त_प्राचार्य_ज्ञानदेव कदम यांनी ५,००० रुपये आणि #दत्तात्रय कदम यांनी २,५०० रुपयांची मदत दिली. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या छोट्या मुलांची प्रेरणा घेऊन गावातील आमचे मित्र #राजू_कदम यांनी एक मोठा निर्णय घेतला. भविष्यात गावात होणाऱ्या धार्मिक सप्ताहांच्या माध्यमातून 'सावली'साठी धान्य जमा करून देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
​एक छोटी कृती, एक मोठा बदल!
प्रा. विजय कदम सर स्वतः हे सर्व धान्य घेऊन जेव्हा 'सावली'मध्ये (संकल्प प्रतिष्ठान) आले, तेव्हा असं वाटलं की माणुसकी अजूनही जिवंत आहे. एका शिक्षकाच्या हाकेमुळे शेकडो मुलांच्या हातून घडलेली ही मदत 'सावली'तील मुलांसाठी खूप मोठा आधार ठरणार आहे.
​माणुसकीची ही 'पसाभर' माया अशीच वाढत राहो, हीच सदिच्छा!
​ #सावली #संकल्पप्रतिष्ठान #तक्षशिलाशाळा #माणुसकी #प्रेरणा #समाजकार्य #अहमदनगर

19/04/2026

Address

Savalee, Link Road, Bhushan Nagar
Ahmednagar
414005

Alerts

Be the first to know and let us send you an email when योग्य: Savalee - Sankalp Pratishthan सावली - संकल्प प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to योग्य: Savalee - Sankalp Pratishthan सावली - संकल्प प्रतिष्ठान:

Share