28/03/2026
*आज सकाळी १०.०० वाजता "आम्ही बी घडलो" या व्याख्यान मालेचे श्री केदारेश्वर विद्यालय येथे पाचवे पुष्प डॉ. श्री. नानाभाऊ खणकर यांनी गुंफले.कार्यक्रमाची सुरुवातीला श्री.जाधव सर यांनी व्याख्यातांचे परिचय करून दिला.त्यानंतर व्याख्याते डॉ नानाभाऊ खणकर यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सपत्नीक स्वागत करण्यात आले.त्यानंतर व्याख्याते डॉ .नानाभाऊ खणकर यांनी* *आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली.प्रथम त्यांनी गणेश वंदना आणि गुरुस्तवन म्हटले.त्यानंतर त्यांनी आपला जीवनपट उलगडण्यास सुरुवात केली.१९६० ला त्यांनी पाहिलीत प्रवेश घेतला.सुरुवातीला शाळेची त्यांना फार भीती वाटत होती.त्यांचे वडील डॉ ना शाळेत घेऊन येत असत.हळूहळू भीती कमी झाली.शाळेतील शिरोळे गुरुजी यांनी त्यांना पाहिलीत घडवले .पहिलीत असताना त्यांच्या मामानी त्यांच्या परीक्षा घेताना कोंबडा हा शब्द काढण्यास सांगितले . तो डॉ नी न अडखळता पटकन काढला.त्यावरून त्यांच्या हुशारीचा परिचय झाला.पुढे त्यांचे शिक्षक श्री गेटम गुरुजी यांनी मुलांवर खूप प्रेम केले.वेळप्रसंगी दुसऱ्या गावाला पडद्यावर चित्रपट पाहण्यासाठी सायकल उपलब्ध करून दिली. शाळेत असताना डॉ खूप खेळायचे आणि अभ्यास पण करायचे खेळात सूर पारंब्या ,आट्यापाट्या,हुतूतू, कब्बडी इत्यादी खेळ खेळले जातं होते.डॉ लाईट ची सोय नसल्याने कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास केल्याचे सांगितले.त्यानंतर डॉ च्या जीवनावर सर्वात मोठा प्रभाव त्यांचे सातवीचे शिक्षक श्री.सखाराम जगदाळे गुरुजी यांचा राहिला.श्री.जगदाळे गुरुजी यांनी त्यांची हुशारी पाहून घरच्यांना त्यांना मुंबईला शिक्षणासाठी पाठवण्यास प्रवृत्त केले.त्यामुळेच डॉ च्या आयुष्याला वेगळे वळण मिळून ते डॉक्टर झाले.आठवीत त्यांना ९६% गुण होते.तरी त्यांना उशिरा गेल्यामुळे ठाणे येथील न्यू इंग्लिश स्कूल.येथे प्रवेश मिळाला नाही.परंतु परत दुसऱ्या दिवशी जाऊन गुणपत्रिका पाहिल्या बरोबर त्यांना त्वरित प्रवेश मिळाला. त्यानंतर मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण तेथे झाल्यावर मॅट्रिक ला चांगले म्हणजे ७९% गुण मिळाल्यावर पुढे रुईया कॉलेज येथे प्रवेश घेतला.तेथे सायन्स आणि इंटर सायन्स केल्यावर ६८% गुण मिळाल्यावर ग्रँट मेडिकल कॉलेज येथे एम बी बी एस ला प्रवेश मिळाला. मेडिकल शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी १९८० मध्ये मुंबई भांडुप येथे आपला दवाखाना सुरू केला .सुरुवातीला त्रास झाला त्यामुळे सुरुवातीला काही दिवस बेस्ट मध्ये आरोग्य अधिकारी म्हणून काम सुरू केले .१९८३ मध्ये त्यांचे लग्न झाले.त्यांना दोन मुले आहेत.त्यांची दोन्ही मुले संगणक अभियंता म्हणून अमेरिकेत कार्यरत आहेत. डॉ नी पुढे सांगताना आई वडिलांची काळजी घ्या त्यांच्यावर प्रेम करा गुरुजनांना कधी विसरू नका त्यांची काळजी घ्या असे सांगितले.आपल्या आहार आणि आरोग्याकडे विशेष करून लक्ष द्या.जेवणात नेहमीचा आहार ठेवा फिझ्झा,बर्गर ,चायनीज पदार्थ खाऊ नका असा सल्ला त्यांनी दिला.शिवाय मुलानी मोबाईल च्या आहारी जाऊ नका त्याचा मर्यादित वापर करण्यास सांगितले.आपले मन स्वच्छ ठेवा कोणाचा मत्सर न करता उलट त्याने यश मिळवले तर त्याला शाबासकी देऊन त्याला प्रोत्साहन देण्यास सांगितले.दररोज पोहणे,योगासने या सारखे व्यायाम करण्यास सांगितले. कोणाशी स्पर्धा न करता फक्त स्पर्धा आपल्याशी करा आपण जास्तीत जास्त एखादी गोष्ट कशी अधिक चांगली करता येईल.याचा प्रयत्न करा म्हणून सांगितले.त्यांच्या जीवनात त्यांच्या पत्नीने खूप साथ दिली याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही हे त्यांनी अधोरेखित केले.जीवनात अनेक चढ उतार येतात परंतु न डगमगता त्याचा सामना करा तुम्हाला यश नक्की मिळेल असा संदेश दिला.शेवटी पसायदानच्या चार ओळी उद्धृत करून आपल्या व्याख्यानाला त्यांनी पूर्णविराम दिला.त्यानंतर त्यांची पत्नी यांनी मुलांना कष्ट करा,आईवडिलांची सेवा करा असा संदेश दिला.शेवटी मुख्याध्यापक नवले सर यांनी डॉ खणकर यांच्या व्याख्यानांचे सार सांगून आभार मानले.शेवटी डॉ खणकर यांच्या तर्फे मुलांस खाऊ वाटप आणि पेन वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास भाऊसाहेब जगदाळे,गणपत खणकर,तुकाराम खणकर,विवेक खणकर,प्रमोद खणकर,हनुमंत खणकर,नरवडे,रामचंद्र बोरुडे,अनंत खणकर,दिलीप बोरुडे,सावळेराम जगदाळे,दौलत शिर्के ,वरखडे सर, कारखिले सर,जगदाळे मॅडम,नरसाळे मॅडम,ठुबे सर,जाधव सर इत्यादी उपस्थित होते.*