Lokpanchayat

Lokpanchayat A people's movement for egalitarian and sustainable development -active since 1993 in Sangamner (Maharashtra, India).

In 1990 senior freedom fighter & social activist Shri. Achyutrao Patwardhan appealed to youth of Maharashtra ti take up water conservation based Ideal village development work. Considering this appeal, Rashtra Seva Dal youth from sangamner formed Volunteer Groups and started work in drought prone areas of Sangamner. They selected one village and started watershed development work with long term go

al to convert village into Ideal village. Lokpanchayat is working continuously till then. Lokpanchayat is platform for youth, who work for progress of community. Lokpanchayat is working since 1993 on the principles of Freedom, Equality and Brotherhood. Lokpanchayat's basic pillars of working are social justice, Democracy, Science based approach and Secularism. It's work is based on principles of sustainable development and Environment Conservation for years together.

हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हाळी ओतूर आणि कोथळा या दोन गावातील NTFP (वनोपज) संकलक यांचे 28.3.2025 रोजी “clim...
29/03/2025

हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हाळी ओतूर आणि कोथळा या दोन गावातील NTFP (वनोपज) संकलक यांचे 28.3.2025 रोजी “climate action for community forest management” प्रकल्प अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण लोकपंचायत आणि HCL tech grant (India) या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
प्रशिक्षणाचा उद्देश -
• गावाला मिळालेल्या सामुहिक जंगलातील (Community Forest Rights) वनोपज याची महिण्यानुसार वार्षिक संकलनाचे कॅलेंडर तयार करणे.
• शाश्वत वनोपज संकलन करण्याची नियमावली तयार करणे.
• जंगल विकास आराखडा तयार करण्यासाठी वनोपज माहिती सहभागी गटातून घेणे.
या तीन उद्देश समोर ठेऊन प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये दोन्ही गावातील एकूण 39 हिरडा, वावडिंग, मध, जांभूळ, करवंदे. इ. वनोपज संकलकानी सहभाग घेतला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि प्रशिक्षणार्थी यांच्या सक्रीय सहभागाने प्रशिक्षण पार पडले.

किशोर वयीन मुलामुलींचे भावविश्व समजून घेताना........लोकपंचायत संस्थेच्या माध्यमातून बहिणा प्रकल्पांतर्गत किशोर किशोरीं स...
04/03/2025

किशोर वयीन मुलामुलींचे भावविश्व समजून घेताना........
लोकपंचायत संस्थेच्या माध्यमातून बहिणा प्रकल्पांतर्गत किशोर किशोरीं सोबत त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी विविध विषयांवर सत्र घेतले जातात. किशोरवयीनअवस्थेतील बदलांमुळे
शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक पातळीवर आव्हानं निर्माण होतात. ही आव्हानं पेलण्यासाठी ह्या टप्प्यावर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक ठरते. किशोरींमध्ये प्रामुख्याने होणारा शारीरिक बदल म्हणजे मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी चा व सुरू झाल्यानंतर चा काळ. आणि त्यासंदर्भात कुटूंबात व समाजात मोकळे पणाने बोलले जात नाही. हा खूप महत्वाचा विषय आहे ज्यामध्ये त्यांचे आरोग्य, स्वछता याविषयी मुलींना माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी अकोले तालुक्यातील खडकी खुर्द येथे दिनांक 3/3/2025 रोजी किशोरींसोबत मासिक पाळी संदर्भात सत्र घेण्यात आले. त्यामध्ये मासिक पाळी विषयी असलेले गैरसमज, मासिक पाळी त घ्यावयाची काळजी, Sanitary Napkins चा योग्य वापरआणि स्वच्छता , पोषक आहार, मासिक पाळी संदर्भात समाजातअसणाऱ्या अंधश्रद्धा-प्रथा याविषयी चर्चा करण्यातआली. यावेळी मुलींनी मोकळेपणाने त्यांचे प्रश्न देखील मांडले. मुलींसोबत खेळ घेण्यात आला. खेळात सर्व मुली आनंदाने सहभागी झाल्या. ह्या सत्रात वय वर्ष 12 ते 17 वयोगटातील एकूण 28 मुली सहभागी झाल्या होत्या.

आज, 28 फेब्रुवारी 2024 रोजी "जिवंत जंगलाचा माग काढताना" या संस्थेच्या पुस्तक प्रकाशन अत्यंत उत्साहात पार पडले. या कार्यक...
28/02/2025

आज, 28 फेब्रुवारी 2024 रोजी "जिवंत जंगलाचा माग काढताना" या संस्थेच्या पुस्तक प्रकाशन अत्यंत उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री. पडवळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवार सर, लोक पंचायत संस्थेचे अध्यक्ष विजय थोरात, सरपंच प्रकाश लहामटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात "डांगानी रानमेवा" या स्टॉलच्या उद्घाटनाने झाली. यानंतर पुस्तकाचे प्रकाशन बहिरोबा देवराई येथे करण्यात आले. पुस्तक प्रकाशनानंतर, लोक पंचायत संस्थेचे कार्यकारी विश्वस्त श्री. पांडे यांनी संस्थेचा उद्देश आणि कार्य सांगितले. रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री. पडवळे यांनी जंगल संरक्षण आणि संवर्धनाबद्दल महत्त्वाचे विचार मांडले, तर विजय थोरात यांनी संस्थेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. यावेळी लोकपंचायत संस्थेच्या विश्वस्त जाधव सर यांनी निसर्गाला अनुकूल गीत सादर करून जंगल संरक्षणासाठी प्रोत्साहित केले.

लोकपंचायत संस्थेच्या "Climate Action for Community Forest Management" प्रकल्प अंतर्गत कोथळा आश्रमशाळा, अकोले येथे लव्हाळ...
22/02/2025

लोकपंचायत संस्थेच्या "Climate Action for Community Forest Management" प्रकल्प अंतर्गत कोथळा आश्रमशाळा, अकोले येथे लव्हाळी ओतूर व कोथळे गावाच्या सामूहिक वन संसाधन व्यवस्थापन समिती सदस्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये मुख्यत्वे पुढील दहा वर्षाचा वन व्यवस्थापन आराखडा कसा तयार करायचा याचे मुद्दे गटचर्चा आणि गट कार्यातून स्पष्ट करण्यात आले. प्रशिक्षणाची सुरुवात सरपंच प्रकाश लहामटे, समिती अध्यक्ष यांनी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात केली, त्यानंतर उपस्थित सदस्यांची ओळख करून देण्यात आली. या प्रशिक्षणात आराखडा तयार करण्याचा उदेश, त्याची पूर्वतयारी, लागणारी विविध माहिती (नजरी नकाशा, वनौषधी माहिती, रानभाज्या कंदमुळे इ .) आराखडा तयार झाल्यावर त्याची अंमलबजावणी व इतर सर्व सरकारी विभागांचा यामध्ये सहभाग याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. गट कार्याच्या माध्यमातून आराखड्यासाठी लागणारी माहिती सर्वांनी तयार केली. या प्रशिक्षणास एकूण 31 CFRMC सदस्य उपस्थित होते. शेवटी समितीला कृती कार्यक्रम देऊन प्रशिक्षणाचा शेवट करण्यात आला.

दिनांक 13 फेब्रुवारी 2025, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या आदिवासी तालुक्यात काम करणारी पुकार संस्थेच्या प्रतिनिधींनी आपल्...
15/02/2025

दिनांक 13 फेब्रुवारी 2025, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या आदिवासी तालुक्यात काम करणारी पुकार संस्थेच्या प्रतिनिधींनी आपल्या संस्थेच्या लव्हाळी ओतूर आणि कोथळे गावांना भेट दिली. या भेटीचा मुख्य उद्देश लोकपंचायत संस्था आदिवासी भागात करत असलेल्या वन हक्काचे काम समजून घेणे आणि "सामूहिक वन हक्क" दावा करण्यापासून CFR व्यवस्थापन करणे हे समजून घेणे. यावेळी लव्हाळी ओतूर येथील जंगलात भेट देऊन वाळीबा आणि साहेबराव यांनी सविस्तर प्रक्रिया समजून सांगितली. आसिफ शेख यांनी लोकपंचायत संस्थेची ओळख करून दिली. या भेटीदरम्यान लव्हाळी ओतूर आणि कोथळा गावातील CFRMC सदस्य, युवक गट सदय, लव्हाळी ओतूरचे सरपंच प्रकाश लहामटे, मंदार सर, लोकपंचायत संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर सावरकुटे येथील बीज बँकेला सुद्धा भेट दिली इतर संस्थेचे काम समजून घेतले. पुकार संस्थेचे एकूण 17 सदस्य उपस्थित होते.

लोकपंचायत संस्था  लिंगभाव आधारीत न्यायव्यवस्था निर्माण करण्यासाठी संगमनेर व अकोले तालुक्यात अझीम प्रेमजी फौंडेशन च्या सह...
10/01/2025

लोकपंचायत संस्था लिंगभाव आधारीत न्यायव्यवस्था निर्माण करण्यासाठी संगमनेर व अकोले तालुक्यात अझीम प्रेमजी फौंडेशन च्या सहयोगाने काम करत आहे. दिनांक 6/1/2025 ते 9/1/2025 दरम्यान अझीम प्रेमजी फौंडेशनच्या वतीने श्रीमती अर्चना रेलन आणि श्री. अक्क्षत कृष्णा यांनी लोकपंचायत संस्थेच्या कार्यक्षेत्राला भेट दिली. यामध्ये
1. महिला आधार केंद्र, लोकांगण.
2.सॅनिटरी पॅड प्रकल्प, लोकांगण.
3.ग्रामीण तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था, कुरकुंडी.
4.बहिणा प्रकल्प कार्यक्षेत्र-संगमनेर तालुका- पेमगिरी व पिंपळगाव माथा
अकोले तालुका- अबीटखिंड व लव्हाळी ओतुर.
5.माहुली येथील लाकडी घाणा तेल व डाळ प्रक्रिया केंद्र
या ठिकाणी भेट देऊन त्यांनी संस्थेचे कामकाज समजून घेतले.
आधार केंद्रातील महिलांसोबत संवाद साधला. महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, कौशल्य विकास,उपजीविका केंद्र त्यातून मिळणारे प्रशिक्षण अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आधार केंद्रातील त्यांचे दैनंदिन उपक्रम, महिलांमध्ये झालेले बदल याविषयी समजून घेतले.
लिंगभाव आधारित न्यायव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी गावोगाव स्थापन केलेल्या जागृत महिला मंचच्या महिला, किशोरवयीन मुलं, मुली, युवक यांच्याशी संवाद साधला. लोकपंचायत संस्थेच्या माध्यमातून सामूहिक वनहक्क, वैयक्तिक वन हक्क मिळविण्यासाठी केलेले काम, पर्यावरण संवर्धन, शाश्वत शेती इत्यादी उपक्रमांनाही भेटी दिल्या.
पिंपळगाव माथा ह्या गावातील भेटीदरम्यान त्यांनी महिला स्नेही ग्रामपंचायत, महिला सरपंच म्हणून काम करताना आलेली आव्हानं, गावातील सोडविलेले प्रश्न, महिला सरपंच म्हणून निर्णय घेणे, महिला ग्रामसभा इ व महिला स्नेही ग्रामपंचायत च्या माध्यमातून शेततळे, गरजू महिलांना घरकुल योजना, गावातील पाणी प्रश्न, मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न, गावरान बियाणे संवर्धनासाठी महिलांनी दिलेल्या योगदानाबद्दल चर्चा करण्यात आली
ह्या भेटीदरम्यान लोकपंचायत संस्थेच्या ग्रामीण तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था, कुरकुंडी घारगाव येथे ही त्यांनी विद्यार्थी, शिक्षक यांच्या सोबत संवाद साधत , वेगवेगळे अभ्यासक्रम, संस्थेने राबविलेल्या Mission Earthing प्रोजेक्ट व पेटंट बद्दल माहिती जाणून घेतली. संस्थेतील वर्कशॉप ला भेट देऊन प्रक्रिया समजून घेतली. अर्चना मॅडम यांनी मुलींचे या क्षेत्रात प्रमाण वाढवावे यासाठी प्रयत्न व्हायला हवे अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी संस्थेच्या बहिणा प्रकल्पात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. प्रत्येकाची ओळख,कामाची जबाबदारी व एकूण प्रकल्पावर चर्चा करण्यात आली

संगमनेर मध्ये लाकडी तेलघाण्यावर काढलेले शेंगदाणा तेल मिळण्याचे एकमेव ठिकाण लोकपंचायत, कुरणरोड, न्यू चक्रपाणी ऑटोमोबाईलच्...
29/12/2024

संगमनेर मध्ये लाकडी तेलघाण्यावर काढलेले शेंगदाणा तेल मिळण्याचे एकमेव ठिकाण लोकपंचायत, कुरणरोड, न्यू चक्रपाणी ऑटोमोबाईलच्या वरच्या मजल्यावर, संगमनेर.
गुणवत्ता आणि दर्जा ही आमची हमी.
याशिवाय डाळी, कडधान्ये, धान्ये, नाचणी बिस्कीट आणि इतर बरीच उत्पादने.
संगमनेर अकोले तालुक्यातील महिला शेतकरी गटांचा उपक्रम
संपर्क - +919373535637
+91 98818 90677 (टीप - कुरिअर सुविधा उपलब्ध. कुरिअर चार्जेस वेगळे लागतील)

लोकपंचायत संस्थेच्या कार्यक्षेत्रातील हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या कोथळा गावात जंगलात अभ्यास दरम्यान फेरफटका मा...
16/12/2024

लोकपंचायत संस्थेच्या कार्यक्षेत्रातील हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या कोथळा गावात जंगलात अभ्यास दरम्यान फेरफटका मारत असताना एक विशेष झाड पाहायला मिळाले, ज्याला स्थानिक लोक "चव दवडी" म्हणतात.यालाच बेडकीचा पाला (गुडमार) असेही म्हणतात . गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी या झाडाचे स्थानिक औषधीय उपयोग आणि त्याचे पर्यावरणीय महत्त्व उलगडून सांगितले. अशा प्रकारे स्थानिक जैवविविधतेचा एक भाग अनुभवता आला.
याशिवाय, बेडकीचा पाला (गुडमार) या वनस्पतीची माहितीही मिळाली. ही वनस्पती मधुमेह नियंत्रणासाठी उपयोगी असून, प्राचीन आयुर्वेदात तिचा महत्त्वाचा उपयोग असल्याचे कळले.
निसर्गाचा हा अनुभव निसर्ग व मानव यातील नात्याची जाणीव करून देणारा आहे. जैवविविधतेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अशा संवादांचा उपयोग होतो. चला, निसर्गप्रेमी म्हणून आपण ही माहिती जपून ठेवू आणि पुढच्या पिढीसाठी हा वारसा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करू

सकस आहार हा उत्तम आरोग्य महत्त्वपूर्ण आहे. पुर्वी, आदिवासींचे आरोग्य जंगलातील नैसर्गिक अन्नामुळे ते सुदृढ होते. पण, सद्य...
09/12/2024

सकस आहार हा उत्तम आरोग्य महत्त्वपूर्ण आहे. पुर्वी, आदिवासींचे आरोग्य जंगलातील नैसर्गिक अन्नामुळे ते सुदृढ होते. पण, सद्यस्थितीत जंगलांच्या ऱ्हास, फास्ट फूड संस्कृती, गरिबी आणि कमी झालेली जमीनधारणा यामुळे आदिवासी महिलांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. महिला ह्या कुटुंबाचा कणा आहेत त्यामुळे, त्या सुदृढ असतील तरच कुटुंब सुखी-आनंदी राहू शकते..
लोकपंचायत आणि प्राज फाउंडेशनच्या वतीने अकोले तालुक्यातील १० दुर्गम आदिवासी गावांतील महिलांसाठी ‘आहारातून उत्तम आरोग्य’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘आहार हेच आरोग्य’ या जनजागृती अभियानात जागरूकता फेरी, गाव बैठका आणि माहिती पत्रके वाटप यांसारखे उपक्रम चालू आहेत. यातील पहिला टप्पा वांजुळशेत, लव्हाळी कोतुळ, आणि धामणवन या ३ गावांमध्ये पार पडला.
या उपक्रमाच्या अंतर्गत, अन्न शिजविण्याच्या पारंपरिक उपयुक्त आणि सध्याच्या चुकीच्या पद्धती, हिमोग्लोबिनची पातळी तपासणीची गरज, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होण्याची कारणे, त्याच्या कमतरतेमुळे उद्भवणारे संभाव्य आजार, आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कसा आहार घ्यावा याविषयी माहितीची देवाणघेवाण करण्यात आली.
अधिक माहितीसाठी संपर्क - किशोर सोनवणे +919881890677

06/12/2024

महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात लोकपंचायतची "बहिणा" महिला संघटना मैदानात__________________________________________________________Akole Times News Ne...

लूना माॅथ (Actias luna) हा उत्तर अमेरिकेत आढळणाऱ्या सगळ्यात आकर्षक पतंगांपैकी एक आहे, पण त्याचे दिसणे दुर्मिळ मानले जाते...
04/12/2024

लूना माॅथ (Actias luna) हा उत्तर अमेरिकेत आढळणाऱ्या सगळ्यात आकर्षक पतंगांपैकी एक आहे, पण त्याचे दिसणे दुर्मिळ मानले जाते, विशेषतः ग्रामीण किंवा नैसर्गिकरित्या समृद्ध भागात. हा पतंग 10-15 सें.मी. एवढ्या मोठ्या पंखांनी ओळखला जातो, ज्यांच्यावर गोलसर डाग (eyespots) असतात, जे भक्षकांपासून संरक्षण देण्यासाठी उपयोगी असतात. त्याचा जीवनचक्र चार टप्प्यांत असतो: अंडी, अळी (लार्वा), कोश (प्युपा), आणि प्रौढ पतंग. लूना मोथ अन्न म्हणून फक्त लार्वा टप्प्यात पानांचा (उदा. मेपल, ओक, हिकरी) उपभोग करतो; प्रौढ पतंगाला तोंड नसते, त्यामुळे तो फक्त प्रजननासाठी जगतो आणि त्याचा आयुष्यकाल केवळ 7-10 दिवसांचा असतो.

लव्हाळी ओतूर गावात लोकपंचायत संस्थेच्या जंगल संवर्धनाचे काम सुरू आहे. या भागात लूना मोथचे दिसणे हे प्रदूषणमुक्त आणि नैसर्गिक परिसंस्थेच्या शाश्वततेचे द्योतक आहे. हा पतंग रात्री सक्रिय असतो आणि तो प्रकाशाकडे आकर्षित होतो. या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी जंगल व्यवस्थापन समितीने त्याच्या अधिवासाचे संरक्षण करणे, तसेच जंगलतोड आणि रासायनिक प्रदूषण टाळणे आवश्यक आहे. या नोंदी वैज्ञानिक संशोधनासाठीही अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात.

महिला हे प्रत्येक घराचा आधारस्तंभ असतात. कुटुंब व्यवस्थापनामध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पण अनेक वेळा त्यांचे...
27/11/2024

महिला हे प्रत्येक घराचा आधारस्तंभ असतात. कुटुंब व्यवस्थापनामध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पण अनेक वेळा त्यांचे प्रयत्न दुर्लक्षित केले जातात आणि लोक म्हणतात, “तीला काही येत नाही.” पण खरे तर, महिला सतत नवीन गोष्टी शिकत असतात, पण त्यांची ही गोष्ट अवढ्या सहज जगासमोर येत नाही.

हाच पूर्वग्रह दूर करण्यासाठी लोकपंचायत संगमनेर येथील विविध गावांतील महिलांसाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करीत आहे. या कार्यशाळेमध्ये महिलांना घरातील दररोज वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचे दुरुस्ती कौशल्य शिकवले गेले. या कौशल्यांमुळे त्यांना रोजच्या समस्यांवर अधिक आत्मविश्वासाने मात करता येईल.

जेव्हा महिला सक्षम होतात, तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समाज अधिक मजबूत होतो. या उपक्रमाद्वारे आम्ही त्यांच्या ताकदीचा, जिद्दीचा आणि नेतृत्वक्षमतांचा गौरव करत आहोत.

#महिला सबलीकरण #कौशल्य प्रशिक्षण #लोकपंचायत #सशक्त महिला

Address

8, Tulsi Complex, Kuran Road, Sangamner Block/Sangamner
Ahmednagar
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokpanchayat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Lokpanchayat:

Share