Ahmednagar Backstage Artist's Association (ABAA)

Ahmednagar Backstage Artist's Association (ABAA) Marathi stage art is marching on intensely in spite of all other strong media domains, we are proud of marathi theatre and its advancements.

Ahmednagar Backstage Artist's Association (ABAA) Founded in 2002 by a group of Artist's from Ahmednagar, Marathi stage art is marching on intensely in spite of all other strong media domains, we are proud of Marathi theater and its advancements. While Bharatmuni’s stage art is getting success along with new ideas & techniques. There are various stage art teams who want to build up on their own & t

echnically fulfilled, for them this is a small effort. Obviously this work is incomplete without society’s advice & guidance. Therefore your contribution is necessary. Along with backstage & stage art there are similar acts such as storytelling, solo performance, one act plays, drama, we are trying to run such kinds of competitions and we feel this is our genuine effort and contribution to our passion “Theatre”

So with all the help and support of all likeminded people we take this movement ahead. Drama workshops, Technical knowhow by the masters, Film Club these are the proposed activities that we are heading for. We feel our organisation will prove a sound support system for all the theatre enthusiasts and professionals who are handling different subjects on stage and making the theatre stronger. We expect your glorious response like always for all our efforts to make our movement strong enough.

चांगला कलाकार होण्यासाठी मुलांना जे आवडते ते मनापासून करू द्या- अभिनेत्री विभावरी देशपांडे स्व. सेठ शामसुंदरजी बिहाणी स्...
23/07/2025

चांगला कलाकार होण्यासाठी मुलांना जे आवडते ते मनापासून करू द्या- अभिनेत्री विभावरी देशपांडे

स्व. सेठ शामसुंदरजी बिहाणी स्मृती कथाकथन
स्पर्धेत समर्थ शाळेने पटकावला सांघिक करंडक

नगर – नगरची बॅकस्टेज आर्टिस्टस् असोसिएशन लहान मुलांसाठी सातत्याने २२ वर्ष मनापासून करत असलेले काम हे कौतुकास्पद व अभिनंदनीय असून मुलांसाठी करत असलेल्या कामातून पैसा, ग्लॅमर मिळत नसले तरी मानसिक समाधान निश्चितच मिळते. पालकांनी मुलांना चांगला कलाकार होण्यासाठी त्यांची आवड लक्षात घेऊन जे आवडते ते मनापासून, अस्सल व दर्जेदार करण्यास पाठिंबा दिल्यास ,ही कलाच मुलांना व्यावसायिक जीवन व उज्ज्वल भविष्य देईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी केले.

अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्टस् असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्व. सेठ शामसुंदरजी बिहाणी स्मृती कथाकथन स्पर्धा व स्व. मनिष कुलकर्णी स्मृती सुगम संगीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे यांच्या हस्ते रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे, स्पर्धेचे प्रायोजक राघवेंद्र बिहाणी यासह दोन्ही स्पर्धांचे परीक्षक व्यासपीठावर उपस्थित होते. स्व.मनीष कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमास सुरूवात झाली. यावेळी बॅकस्टेज आर्टिस्ट्स असोसिएशनचे सर्व सदस्य, विविध क्षेत्रातील नागरिक व सहभागी स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन्ही राज्यस्तरीय स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे मुख्य प्रायोजक राघवेंद्र बिहाणी म्हणाले, दरवर्षी बॅक स्टेज आर्टिस्टस् असोसिएशनच्या उत्कृष्ट व नियोजनबद्ध टीम वर्कमुळे या स्पर्धा यशस्वी होत असतात. अशा सांस्कृतिक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या या संस्थेला प्रायोजकत्व देऊन या चळवळीत आमच्या परिवार सहभागी होत आहे.

अभिनेते मिलिंद शिंदे म्हणाले, नगरची बॅकस्टेज आर्टिस्ट असोसिएशन सांस्कृतिक क्षेत्रात नवी वाट कोरत कलाकार घडविण्याच्या कामात खारीचा वाटा उचलत आहे. शहराचे सांस्कृतिक आरोग्य चांगले राहावे यासाठी योगदान देत आहे. या चळवळीचे स्वरूप एक दिवस फार मोठे होणार असून , विद्यार्थी -पालक अनेक वर्षे नव्या उत्साहात स्पर्धेत सहभागी होत आहेत, हेच आमचे यश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित काळे यांनी तर सूत्रसंचालन राधिका कुलकर्णी यांनी केले. श्रीनाथ केसकर, संतोष बडे, प्रा ज्ञानेश कुलकर्णी यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. अभिजित क्षीरसागर यांनी निकालपत्राचे वाचन करून आभार मानले.

यावेळी बॅकस्टेज आर्टिस्टस् असोसिएशनचे विक्रांत मनवेलीकर, गौरव मिरीकर, सागर जोशी, दादासाहेब बेरड, अमोल दाते, कामोद खराडे, योगेश कुलकर्णी, मनीष घोलप, प्राची कुलकर्णी गरूड, शिल्पा देशपांडे,उपेंद्र कुलकर्णी, मंगेश देवचके यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

स्पर्धे दरम्यानची काही क्षणचित्रे खालील प्रमाणे.

Address

Santosh Bade , Parvati Towers, Near Renavikar Colony, Pipeline Road, Savedi
Ahmednagar
414003

Telephone

+919823385156

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ahmednagar Backstage Artist's Association (ABAA) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share