मातृभूमी युवा प्रतिष्ठान

मातृभूमी युवा प्रतिष्ठान दान हे यश आणि आनंदाच्या दिशेने घेऊन जाणारी एक अखंड प्रक्रिया आहे

माणूस हा समाजशील प्राणी आहे असे म्हटले जाते . याचा अर्थ माणूस समूहाने राहतो केवळ असा होत नाही कारण समूहात अनेक प्राणी शहतात परंतु माणूस समाजशील आहे कारण समाज म्हणून मानवजात एकमेकांवर अवलंबलेली आहे . वेळप्रसंगी जाणीवपूर्वक एकमेकांना मदत करण्याची वृत्ती मानवाला समाजशील बनवते . स्वतःच्या कुटुंबाच्या ही पुढे समाज नावाच्या एका मोठ्या कुटुंबाचे आपण सदस्य आहोत ही भावना मानवाला समाजशील बनवते आपल्या जडण घड

णीत घराइतकाच वाटा आपल्या समाजाचा असतो या भावनेने प्रेरीत होऊन ह्या आपल्या विस्तृत कुटुंबाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना ज्या मानवात दिसते तो खऱ्या अर्थाने समाजशील मनुष्यप्राणी होय .
मित्रांनो आपल्या साठी आपला समाज म्हणजे आपला गाव . आपल्या सर्वांच्या मनात गावाविषयी एक उच्च प्रतिची अबाधित भावना असते . आपल्या गावाशी आपली नाळ नकळत जोडलेली असते . गाव हे एक आपलं कुटुंबच आहे. परंतु आपल्या या कुटुंबातील काही सदस्य अनेक प्रकारच्या संकटांना व अडचणींना सामोरे जात असतात आपल्या डोळ्यासमोर अनेक वेळा अकल्पित घटना घडून कुटुंबच्या कुटुंब उद्वस्थ होतात . अशा वेळी आपलं मन अगदी हळहळतं . अशा गरजू लोकांना मदत करावी मनापासून वाटतं पण आपल्या एकट्याच्या मदतीने फारसं काही साध्य होणारं नसतं अशा वेळी विचार येतो तो आपल्यात असलेल्या समाजशील मनाचा .
मित्रांनो अशीच आपल्या गावातील समाजशील मने जर एकत्र आली तर गावातील अनेक गरजू लोकांना मदत व आश्वासक आधाराचे ठिकाण होऊ शकेल . याच भावनेतून जन्म झाला *मातृभूमी युवा प्रतिष्ठान* चा . गावातील लोकांनी एकत्र येवून संकटात सापडलेल्या कुटुबाचं ओझं हलकं करायचं, गरजू कुटुंबास आर्थिक अडचण , शैक्षणिक अडचण , वैद्यकिय अडचण , नोकरीसाठी मदत,
लग्नकार्यात मदत, गावच्या विकास कामांना मदत, जगदंबा मंदीर परिसर विकसनात मदत अशा पध्दतीने करता येईल तेवढी मदत करता यावी यासाठी या गृपची निर्मिती करण्यात आली .

समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यांच्यातले काहीजण मात्र खरोखरच उभे राहतात आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी झोकून देतात. लौकिक अर्थाने त्यांचं काम फार मोठं नसेलही कदाचित, पण समाज पुढे जाण्याच्या प्रक्रियेत तो खारीचा वाटा खूप महत्त्वाचा असतो. कुणीतरी करायला पाहीजे यापेक्षा मी काहीतरी करायला पाहीजे, दान हे यश आणि आनंदाच्या दिशेने घेऊन जाणारी एक अखंड प्रक्रिया आहे, हाच दृष्टिकोन घेऊन हा ग्रुप मदत पुरवण्यासाठी आणि गरजूंसाठी पैसे गोळा करण्यासाठी स्थापन केला आहे, काही ठळक मुद्दे ,

१. ग्रुप मधील व्यक्तीचे प्रथम प्राधान्य हे पूर्णपणे त्याचे कुटुंब असेल
२. हा पूर्णपणे एक अव्यवसायिक ग्रुप आहे
३. ग्रुप मध्ये सामील होणे म्हणजे पैसे दिलेच पाहीजे असा कुठलाही हेतु ग्रुपचा नसेल. तुम्ही इतरांना प्रेरित पण करू शकता, तुम्ही आपले विचार/कल्पना पण येथे सामायिक करु शकता
४. आपल्या गावातील गरजुंना मदत करणे हा दानधर्मापाठीमागील ग्रुपचा मुख्य उद्देश आहे आणि कौटुंबीक आनंद हा दुसरा उद्देश. (गरजु : अन्नदान, विद्यादान, द्रव्यदान, कन्यादान (लग्नकार्यात मदत), वस्त्रदान , अडचणीत असलेल्या लोकांस मदत इ. स्वरूपात व्यक्तीने किंवा समूहाने धार्मिक किंवा नैतिक बुद्धिने केलेला परोपकार म्हणजे दान होय. )
५. ग्रुप मधील सर्वजण हे leader असतील आणि याची वाढ व संगोपन चांगल्या पद्धतीने करतील.
या माध्यमातून मदत म्हणून दरमहा काही ऐच्छिक निधी आपण जमा करून तो एका ठिकाणी संकलित करून त्यातून गरजू व्यक्तिंना मदत करायची असे नियोजन आहे . निधी किती द्यावा किंवा द्यावा अथवा न द्यावा हे सर्वस्वी ज्याच्या त्याच्या मनावर असणार आहे . मात्र गृपमध्ये अॅक्टिव असणे मात्र बंधनकारक आहे . अर्थात आपले काम ,आपले कुटुंब यांना वेळ देऊन उरलेल्या वेळातच आपण हे सर्व करणार आहोत . गृपमध्ये जॉईन होण्यासाठी कुणालाही जबरदस्ती नाही . ज्या कुणाला मनापासून आपल्या गाव या कुटुंबासाठी मदतीची तळमळ असल्यास गृप जॉईन करा आणि दुसऱ्यांना प्रेरित करा. गृप जॉईन केल्यानंतर कार्यवाही विषयी काही कल्पना आपल्या मनात असतील तर नक्की शेअर करा

Address

Ahmednagar
422601

Telephone

+919881286268

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मातृभूमी युवा प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to मातृभूमी युवा प्रतिष्ठान:

Share