Unnati

Unnati More details, please call on
9503753333
9604687422

Unnati Sevabavi Sanstha ( NGO) is recently started and registered in the field of philanthropy.Unnati is working for deprived people, needy children, poor people, natural disaster help etc.

*पिंपळगाव माळवी भिल्ल वस्तीवर शालेय दप्तरे व साहित्यांचे वाटप*.. अहमदनगर. दि. १८ ऑगस्ट २०२४.उन्नती सेवाभावी संस्थेच्या व...
18/08/2024

*पिंपळगाव माळवी भिल्ल वस्तीवर शालेय दप्तरे व साहित्यांचे वाटप*..
अहमदनगर. दि. १८ ऑगस्ट २०२४.
उन्नती सेवाभावी संस्थेच्या वतीने व इंकी फॉर हेल्प या जर्मन संस्थेच्या सहकार्याने, आज पिंपळगाव माळवी येथील ४० शालेय विद्यार्थ्यांना दप्तरांचे व साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी डोंगरगन येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष काळे व अशोक चिंधे, आकश काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
भिल्ल वस्तिवरील मुलांना शाळेची गोडी लागावी, शाळेतील त्यांची उपस्थिती वाढवावी या करिता उन्नती संस्थे हा उपक्रम राबवला. बहुतांश वेळी शालेय साहित्य नसल्याने मुलांची शाळेतील उपस्थिती कमी असते या कारणाने मुले शाळाबाह्य होतात असे उपसरपंच पठारे यांनी या वेळी सांगितले, परंतू शालेय साहित्य मिळाल्या नंतर मुलांची शाळेतील हजेरी निश्चितच वाढणार असे या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. राजाभाऊ शिर्के यांनी या वेळी प्रतिपादन केले. संस्थेचे सह सचिव श्री. दत्ता लोखंडे यांनी सन २०१७ पासुन केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना या वेळी दिली.
कार्यकर्माच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप आस्मर होते. या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री. शाम थोरात, गजानन भंडारे, सौ संगीता वरुडे, रमेश बोंदर्डे, रमाकांत आस्मर, ज्ञानेश्वर फासे आणि सौ. हेमलता चंदेले या उपस्थित होत्या...

*स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर ७० मुलांना शालेय दप्तराचे वाटप.*उन्नती सेवाभावी संस्था भिंगार , या संस्थेने देऊळगाव घाट ...
15/08/2024

*स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर ७० मुलांना शालेय दप्तराचे वाटप.*
उन्नती सेवाभावी संस्था भिंगार , या संस्थेने देऊळगाव घाट येथील लमानतांडा येथील शाळा व देऊळगाव घाट ता. आष्टी, जि. बिड येथील प्राथमिक शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांना इंकि फोर हेल्प या जर्मन स्थित संस्थेच्या माध्यमातून ७० शालेय दप्तराचे वाटप करण्यात आले, देऊळगाव घाट येथील लमान तांड्यावर प्रथम ३५ दप्तराचे वाटप करण्यात आले, या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. गणेश उपरे, तसेच संचालक पराग खूपसे, रमेश बोंदर्डे, गजानन भंडारे, शंकर लोखंडे व संतोष फासे हे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भगत, ठोंबरे यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले. त्या नंतर देउळागव घाट येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गवंडे व शिक्षकवृद उपस्थित होते. संबंधीत सर्व कार्यक्रमासाठी, जनता विद्यालय धानोरा येथील माजी प्राचार्य श्री मुरलीधर मगर तसेच ग्रामस्थ श्री हरीकृष्ण ठोंबरे आणि श्री. ज्ञानेश्वर मगर यांचे सहकार्य लाभले. या वेळी राज्यस्तरीय कुस्तीपटू ज्ञानदा हरीकृष्ण ठोंबरे यांची उपस्थिती शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी ठरली.

भिंगारदि: २७ जानेवारी २०२४.*उन्नती सेवाभावी संस्थेने २३ एकल पालक, गरजू, होतकरू मुलिंना केले सायकलींचे  वाटप.*भिंगार मधील...
28/01/2024

भिंगार
दि: २७ जानेवारी २०२४.
*उन्नती सेवाभावी संस्थेने २३ एकल पालक, गरजू, होतकरू मुलिंना केले सायकलींचे वाटप.*
भिंगार मधील उन्नती सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि इंकी फोर हेल्प तसेच वुइथ कंपनीचे संचालक युस यांचे पुढाकारातुन २३ सायकलींचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री गणेश उपरे, अध्यक्ष श्री दिलीप आस्मर यांचे सह श्रीमती उलरिके हिलगर्स, श्रीमती निता डोड, कु सीसी हिलगर्स, श्री संजय आढाव, त्याच बरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लोकेश मेहतांनी, श्री संजय मळेकर, श्री जालिंदर बेल्हेकर हे उपस्थित होते.
या प्रसंगी भिंगार व नगर परीसरातील २३ निवडक एकल पालक, तसेच आई व वडील नसलेल्या, गरजु, होतकरु मुलिंना २३ सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लोकेशशेट मेहतानी यांनी उन्नती सेवाभावी संस्था करत असलेल्या कामाची प्रशंषा केली,. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दत्ता लोखंडे यांनी करताना मागील ७ वर्षामध्ये संस्थेने केलेल्या विविध कामांचा आढावा दिला. संजय मळेकर यांचा या वेळी सन्मान पत्र देवुन गौरव करण्यात आला,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचलन अॅड. राजाभाऊ शिर्के यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. शाम थोरात यांनी केले. या क्रायक्रमासाठी संबंधीत मुलींचे शिक्षक देखील उपस्थित होते, मुलींना या मदतीमुळे मनोबल वाढेल व शिक्षण पुर्ण करण्याची प्रेरणा मिळेल असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक श्री. पराग खूपसे,श्री. ज्ञानेश्वर फासे, श्रीमती संगिता वरुडे, श्रीमती ज्योती उदबत्ते,तसेच श्री गजानन भंडारे, अच्युत चिनके, रमेश बोंदर्डे, राधाकिसन पाटोळे व कार्यकर्ते उपस्थित होते...

*उन्नती संस्थेला हवे आहेत केवळ तुमचे ५१ रुपये.*होय जर तुम्हाला आजपर्यंत उन्नती सेवाभावी संस्थेने केले कार्य खरोखरच पटतअस...
14/12/2023

*उन्नती संस्थेला हवे आहेत केवळ तुमचे ५१ रुपये.*
होय जर तुम्हाला आजपर्यंत उन्नती सेवाभावी संस्थेने केले कार्य खरोखरच पटतअसेल, आवडत असेल व संस्थेवर तुमचा विश्वास असेल तर कृपया ५१ रू देणगी द्या. जेणेकरून संस्था किमान या महिन्याच्या खर्च तरी भागवू शकेल. रोख देणगी नको आहे. केवळ सोबत पाठवलेल्या क्यूआर कोड वर रक्कम पाठवा. तुम्हाला ज्या नंबर वरुन मेसेज आला त्या नंबर ला देणगी पाठवल्याची माहिती तुमचे नाव , पत्ता व संपर्क क्रमांक पाठवा. २४ तासाच्या आत तुम्हाला रितसर पावती पाठवू..
संस्थेचा मासिक खर्च ३० हजार रुपये आहे.

*दिवाळीच्या पुर्व संध्येला रंगल्या गाजल्यांना, उन्नतीचा हात.*सालाबादप्रमाणे उन्नती सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शहराती...
14/11/2023

*दिवाळीच्या पुर्व संध्येला रंगल्या गाजल्यांना, उन्नतीचा हात.*
सालाबादप्रमाणे उन्नती सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शहरातील निराश्रित, बेघर, अनाथ लोकांना नविन कपडे, शॉल, ब्ल॓ंकेट, दिवाळी फराळ वसु बारसेच्या रात्री वाटप करण्यात आले. उन्नती सेवाभावी संस्था हा उपक्रम मागील ५ वर्षापासुन अविरत व अखंडीत राबवत आलेली आहे. या वर्षी माजी नायब तहसिलदार श्री.ज्योतीप्रकाश जायकर, तसेच श्री अरविंद इखे, संचालक ज्ञानेश्वर फासे आणि अध्यक्ष श्री. दिलीप आस्मर, श्री नंदकुमार होगाडे, यांनी निराधारांकरीता नवीन कपडे व साड्यांची सोय केली होती, तसेच संस्थेतर्फे ब्लॅकेट्स आणि घरगुती फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. नगर शहरातील, मार्केट यार्ड, रेल्वे स्टेशन, माळीवाडा, कोठला, दिल्ली गेट परिसरातील ५० निराधार, निराश्रित बेघर लोकांना वरिल वस्तु व फराळाचे वाटप करण्यात आले. हितचिंतक, देणगीदार यांच्या सहकार्यातून व संचालक कार्यकर्ते यांच्या आत्मविस्वासातुन हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवित आली आहे. फराळ व कपडे वाटपासाठी संस्थेचे कार्यकर्ते श्री. शिवम भंडारी, प्रविण खर्पे, संचालक पराग खूपसे, अध्यक्ष दिलीप आस्मर, ज्ञानेश्वर फासे व गजानन भंडारे यांनी मेहनत घेतली...

13/11/2023

Address

Bhingar
Ahmednagar
414002

Telephone

+919503753333

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unnati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Unnati:

Share