14/10/2021
*डॉटर्स मॉम व शिवरत्न फाउंडेशन तर्फे नवदुर्गा यांचा सन्मान*
शिवरत्न फाउंडेशन डॉटर्स फाउंडेशन आयोजित खास नवरात्रीनिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा म्हणजेच नवदुर्गाचा आदरणीय सौ शीतल देवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तुत्व स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात स्त्री म्हणजे अनंताची साथ आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारताना ज्या महिलांनी विविध क्षेत्रात यशस्वी पणे आपले काम केलेले आहे अशा नवदुर्गा यांचा सन्मान शिवरत्न फाउंडेशन व डॉटर्स मॉम फाउंडेशन तर्फे अध्यक्ष सौ शीतल देवी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या महिलांमध्ये डॉक्टर रेवती नितीन राणे स्त्री रोग तज्ञ, स्वाती कांबळे पीएसआय अकलूज पोलीस स्टेशन, कुमारी राजश्री राजेमाने, सौ सोनम व्होरा नारायणकर ,हरिभक्त परायण बाल कीर्तनकार कुमारी ज्ञानेश्वरी घाडगे,डॉक्टर सौ अपर्णा कुचेकर
सौ अनिता बल्लाळ जोशी, श्रीमती तांबोळी एन एस सौ.वनिता बाळासाहेब कोरटकर
यांचा सन्मान करण्यात आला.
डॉक्टर रेवती नितीन राणे या एम बी बी एस एस सी पी एस डी एम बी आहेत त्या अपेक्स हॉस्पिटल व राणे मॅटर्निटी होम अकलूज येथे स्त्री रोग तज्ञ म्हणून यशस्वीपणे कार्यरत आहेत . तसेच वंध्यत्व चिकित्सा तज्ञ व आय व्ही फ तज्ञ अकलूज टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे यशस्वीपणे काम करत आहेत .
मेडी क्वीन मिसेस महाराष्ट्र राज्यस्तरीय वैद्यकीय सौंदर्य स्पर्धेच्या त्या विजेत्या आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या डॉक्टर रेवती राणे यांना डॉटर्स मॉम फाउंडेशन तर्फे सन्मान चिन्ह , सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच राजश्री राजेमाने या स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत एन एस एस मध्ये त्यांना उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे
गौरविण्यात आले असून, इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे मिळालेल्या आहे नॅशनल लेवल ऑर्गनायझेशन चलो कुछ नया करते है याच्या त्या फाउंडर मेंबर आहेत अनेक शासकीय व खाजगी क्षेत्रांमध्ये युनिसेफ आधार फाउंडेशन युथ डेव्हलपमेंट अंड सोशल रेफॉर्मर यामध्ये त्या उत्कृष्टपणे काम करत आहेत याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
सोनम होरा नारायणकर या भरत नाट्यम परफॉर्मर आहेत सोनम या मूळच्या मुंबईच्या आहेत अकलूज मध्ये डान्स कोरिओग्राफर म्हणून यशस्वीपणे काम करत आहेत बॅचलर अँड मास्टर डिग्री इं परफॉर्मिंग आर्ट्स भरतनाट्यम त्यांनी पूर्ण केलेला आहे .अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय भरतनाट्यम विशारद आहेत.
राष्ट्रीय नृत्य शिरोमणी या पुरस्काराने देखील सोनम यांना सन्मानित करण्यात आलेला आहे.
भारतामधील विविध राज्यांमध्ये व भारताबाहेर अनेक देशांमध्ये त्यांना क्लासिकल डान्स परफॉर्मर म्हणून यशस्वीपणे काम करत आहेत .नॅशनल व इंटरनॅशनल परफॉर्मन्स नॉर्वे डान्स फेस्टिवल नोर्वे इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिवल मुंबई डान्स केलेला आहे त्यांच्या या कलेचा कार्याबद्दल डॉटर्स मॉम समान फाउंडेशन तर्फे त्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले
हरिभक्त परायण कुमारी बाल कीर्तनकार ज्ञानेश्वरी ताई घाडगे त्या मूळच्या टाकळी टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील आहेत त्या कीर्तनातून समाज प्रबोधन समाज प्रबोधन पर कार्य करतात अनेक विषय आई वडील मुली जनजागृती संस्कार व्यसनमुक्ती इत्यादीविषयी ते आपल्या कीर्तनातून मांडतात आत्तापर्यंत त्यांनी 367 कीर्तने केलेली आहेत यासाठी त्यांचा डॉटर्स मॉम फाउंडेशन तर्फे सन्मान फाउंडेशन तर्फे सन्मान करण्यात आला.
डॉक्टर अपर्णा कुचेकर यांनी सेट परिक्षा पास करून डॉक्टरेट पदवी मिळाली आहे .
या पंचवीस वर्ष शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथे हिंदी विषयांमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत 2020मध्ये हिंदी सेवेसाठी अखिल भारतीय पुरस्कार नुकताच त्यांना जाहीर झालेला असून सोलापूर विद्यापीठाची पीएचडी मार्गदर्शक म्हणून देखील मान्यता मिळालेली आहे त्यांच्या या यशाबद्दल शिवरत्न व
डॉटर्स मॉम फाउंडेशन तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
सौ अनिता बल्लाळ जोशी यांना सणांचा सोहळा पुणे तर्फे महाराष्ट्रातील स्त्री भूषण , अभिज्ञान पुणेतर्फे संपूर्ण भारतातून रामरक्षा पठण स्पर्धेत प्रथम ,कथाकथन स्पर्धेत प्रथम अभिज्ञान पुणेतर्फे गीता प्रवचन मध्ये भारतात प्रथम संस्कृत भारती पुणे तर्फे घेण्यात आलेल्या गीतापठण स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
सौ वनिता बाळासाहेब कोरटकर
सुशिक्षित बेरोजगार महिला संग महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष व धनश्री महिला सक्षमीकरण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र याबद्दल त्यांचा डॉटर्स मॉम फाउंडेशन तर्फे सन्मान करण्यात आला.
तसेच
स्वाती कांबळे पीएसआय अकलूज पोलीस स्टेशन त्यांच्या या यशाबद्दल फाउंडेशन त्यांचा सन्मान केला.
तांबोळी एन एस आरोग्य सेविका प्राथमिक आरोग्य केंद्र माळीनगर येथे कार्यरत आहेत गेली वीस वर्ष झाले आरोग्य खात्यात त्या उत्कृष्टपणे काम करत आहेत 2014 ते 2020 या काळात बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात काम केलेले आहे त्या काळात सलग पाच वर्ष जिल्हा परिषद सोलापूर सीईओ यांच्या हस्ते संस्थेत सर्वात जास्त चांगल्या पद्धतीने प्रसूती यशस्वीपणे केल्या म्हणून त्यांना सन्मानपत्र व चेक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच कुटुंब कल्याण व प्रसूती मध्ये त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या या कार्याबद्दल डॉक्टर समान फाउंडेशन आणि सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित केले.
या या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ शीतल देवी मोहिते पाटील म्हणाल्या नवदुर्गा पूजन म्हणून स्त्री कर्तुत्वाचा सन्मान करून खरी दुर्गा पूजा आम्ही केली .
कोविड च्या काळा मध्ये डॉक्टर , नर्स आणि पोलिस या लोकांमुळे आपण सुखरूप जगलो त्यामुळे सर्व पोलिसांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांच्या चांगल्या कारकीर्दीबद्दल आपण स्वाती कांबळे , तांबोळी मॅडम यांचा सन्मान करणार आहोत .
शिवरत्न फाउंडेशन हे गेली सात वर्ष पेक्षा जास्त काळ झाला महिला सबलीकरणाचे काम करत आहे यामध्ये दरवर्षी आपण महिलांसाठी विविध उपक्रम राबवतो पण या वर्षी मला विविध क्षेत्रात उत्कृष्टपणे काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करावा अशी इच्छा होती म्हणून वैद्यकीय क्षेत्र , कलाक्षेत्र,शिक्षण क्षेत्र,पोलीस क्षेत्र,अध्यात्म क्षेत्र,,सामाजिक क्षेत्र इत्यादी मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा म्हणजेच नवदुर्गा यांचा सन्मान करणं त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचा आहे असं मला वाटलं म्हणून मी या कार्यक्रमाचे शिवरत्न फाउंडेशन व डॉटर्स मॉम फाउंडेशन तर्फे आयोजन केले.
महिला विविध क्षेत्रात काम करते तेव्हा तिला कुटुंबा सोबत मुलांसोबत अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात हे सर्व करण्यासाठी तिला मानसिक व शारीरिकसमतोल असणे खूप गरजेचे आहे तरच ती उत्कृष्टपणे काम करू शकते यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याकडे मानसिक व शारीरिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे रोज कमीत कमी एक तास स्वतःसाठी काढावा व्यायाम करावा योग्य आहार घ्यावा व आपल्या मैत्रिणीशी मोकळेपणाने बोलावे जेणेकरून कोणतेही मानसिक घुसमट होणार नाही असे मत शिवरत्न फाऊंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय सौ शीतल देवी मोहिते पाटील यांनी मांडले .
या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर रेवती राणे म्हणाल्या सर्व महिलांनी शरीराबरोबर आपल्या मनाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे मानसिक दृष्ट्या जर महिला सबल असेल तरच ती चांगल्या पद्धतीने काम करू शकते चांगल्या पद्धतीने कुटुंब सांभाळू शकते त्यासाठी स्वतःचे छंद जोपासा स्वतःला वेळ द्या व नवरात्राच्या रंगाचे महत्व विविध रंगात असणाऱ्या भाज्यांचा फळांचा समावेश आपल्या आहारात असणे गरजेचे आहे तरच आपले आरोग्य चांगले राहू शकते असे मत देखील डॉक्टर रेवती राणे यांनी मांडले.
याप्रसंगी बाल कीर्तनकार कुमारी ज्ञानेश्वरी घाडगे हिने आपल्या कीर्तनातून मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा संदेश तर दिलाच पण राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर झाशीची राणी यांच्या कार्यांचा कीर्तनातून त्यांनी आढावा देखील मांडला मुलगा हा वंशाचा दिवा असला तरीहीमुलगी ही वंशाची पणती आहे असे मत तिने व्यक्त केले .
स्वाती कांबळे पीएसआय अकलूज पोलीस स्टेशन याप्रसंगी बोलताना महिलांना कायद्याचे ज्ञान असणे खूप गरजेचे आहे महिलांनी स्वतःचे आरोग्य सांभाळले पाहिजे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महिला शारीरिक व मानसिक सबल असणे खूप गरजेचे आहे आम्ही सर्व पोलीस तुम्हा तुमच्या पाठीशी सदैव उभे आहोत त्यांनी सांगितले की मुली ल सक्षम बनवा आणि जसे मुली ल संस्कार करतो तसे मुलाला ही तू कुणावर अत्याचार करू नको हे संस्कार आई नि देने गरजेचे आहे असे सांगितले .
कोणतीही अडचण असेल तर आम्हाला त्वरीत कळवावे आम्ही ती सोडवू असे मत पीएसआय स्वाती कांबळे यांनी व्यक्त केले .
सोनम होरा नारायणकर या कलेच्या क्षेत्रात कोरियोग्राफर म्हणून काम करत आहेत या कार्यक्रमात या बोलताना म्हणाल्या आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाने आपले छंद जोपासले पाहिजेत मग तो छंद कोणताही असेल त्यातून मिळणारा आनंद हा प्रत्येकालाखूप समाधान देणारा असतो मानसिक दृष्ट्या सबळ बनवणार असतो आयुष्यात प्रत्येकाने एक तरी छंद जोपासावा असे मत त्यांनी व्यक्त केले .
तसेच तांबोळी एन एस आरोग्य सेविका यांनी बोलताना
कोवीड लसीकरण महत्त्वाचे आहे कोवीड अजून संपूर्णपणे नाहीसा झालेला नाही मास्क व सॅनिटायझर सर्वांनी वेळोवेळी वापरा व सर्व नियमांचे पालन करा आपल्या आरोग्याची काळजी घ्या असे मत तांबोळी मॅडम यांनी व्यक्त केले .
कुमारी राजश्री राजेमाने या अनेक ठिकाणी एन एस एस मध्ये उत्कृष्टपणे काम करत आहेत त्यांना मिळालेल्या या यशामध्ये अकलूज मधील अनेक शिक्षण संस्थांचा मोहिते पाटील परिवाराने जी संस्कृती जपली आहे त्याचा त्यांना खूप मोठा पाठिंबा मिळाला असे मत व्यक्त केले अकलूजमध्ये शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक अनेक उपक्रम होतात यासाठी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये खूप मदत होते असे मत त्यांनी व्यक्त केले .
सौ अनिता बल्लाळ जोशी यांनी आपल्या आयुष्यातील अध्यात्माचे महत्त्व सकारात्मक विचार चे महत्त्व तसेच लहानपणापासून रामरक्षा पठण श्लोक पठण या मुळे होणारे संस्कार याबद्दल माहिती दिली .
अष्टमी निमीत्याने सर्व फाउंडेशन च्या महिलांनी पूजन करून त्यांना शैक्षणिक साहित्य फळे वा खाऊ देऊन सन्मान केला .