या संस्थे अंतर्गत मराठी भाषा वर्ग,बालसंस्कार वर्ग,मायबोली -वाचनालय यासारखे निरनिराळे उपक्रम राबवले जातात.संकल्प- एक निश्चय'च्या निर्मितीची गोष्ट!
'संकल्प- एक निश्चय ' ही 'ना नफा- ना तोटा' तत्वावर चालणारी एक सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणून कार्यरत आहे. सदर संस्था आपल्या आणि आपल्या बालकांच्या " शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कला" क्षेत्रातील गुणांना वाव देण्यासाठी , व्यासपीठ देण्यासाठी कार्य करत आ
हे . या संस्थे अंतर्गत आम्ही खूप काही वेगवेगळे उपक्रम करीत आहोत. सुरुवात म्हणून खालील उपक्रम चालू केले आहेत आणि ते खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे . बरेच लोक याच्याशी जोडले जात आहेत आणि हा परिवार असाच वाढवण्याचा आमचा संकल्प आहे
१. मराठी भाषा शाळा
२. बाल-संस्कार वर्ग
३. मराठी संस्कृती जपणूकी साठी सण-वार साजरे करणे
४. कलेच्या जोपासनेसाठी संगीत, नृत्य आणि वाद्य शिकवणी. " मराठी माझी भाषा, मराठी माझा धर्म, मराठीच पंथ आणि मराठीच अमुची जाती,
माय-मराठीच्या संवर्धनासाठी अन प्रसारासाठी घेवुया हे कार्य हाती"
हा एक संकल्प
… संकल्प मराठी संस्कृती जोपासण्याचा!
… संकल्प मराठी भाषा वृद्धिंगत करण्याचा!
… संकल्प ऑस्ट्रेलियात वाढणाऱ्या मराठी पिढीत मराठीपण रुजवण्याचा!
चला तर मग करूया संकल्प …. एक निश्चय…. पिढी घडवण्याचा….त्यांच्या मनाला सु-आकार देण्याचा … त्यांना हा अनमोल वारसा देण्याचा….!
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी!
कार्यकारी सदस्य
अध्यक्ष - श्री प्रसाद पाटील
उपाध्यक्ष - श्री प्रफुल गोलाईत
खजिनदार - श्री विनोद म्हशेळकर
सचिव - श्री गणेश किरवे