18/08/2026
Launching the Global Maharashtrian Awards (GMA) to honor and recognize extraordinary Maharashtrian achievers who have made a remarkable global impact from across the world in the fields of business, science & technology, arts, public service, law, IT, education, healthcare, sports & Lifetime Achievement Award.
GMA nominations are open through the attached link till Oct 15; awards to be presented in Mumbai in January 2027 at the hands of Hon. CM Shri Devendra Fadnavis Ji.
Eminent jury members are Ex CJI BR Gavai, Renowned Scientist Dr Raghunath Mashelkar, Singer Vaishali Samant, and Senior Journalist Prafulla Marpakwar.
Calling upon the global Maharashtrian community outside India to participate by self-nominating or nominating others for these unique awards, first of its kind.
जय हिंद, जय महाराष्ट्र
व्यवसाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कला, जनसेवा, कायदा, माहिती तंत्रज्ञान (IT), शिक्षण, आरोग्यसेवा, क्रीडा आणि 'जीवनगौरव' (Lifetime Achievement) अशा विविध क्षेत्रांत जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रीयन व्यक्तींचा गौरव करण्यासाठी 'ग्लोबल महाराष्ट्रीयन अवॉर्ड्स' (GMA) सुरू करण्यात येत आहेत.
या पुरस्कारांसाठी नामांकने (nominations) सादर करण्याची प्रक्रिया सोबत दिलेल्या लिंकद्वारे १५ ऑक्टोबरपर्यंत खुली असेल. हे पुरस्कार जानेवारी २०२७ मध्ये मुंबई येथे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान केले जातील.
या पुरस्कारांसाठीच्या निवड समितीमध्ये (jury) माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई, प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, गायिका वैशाली सामंत आणि ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार यांसारख्या मान्यवरांचा समावेश आहे.
भारताबाहेर राहणाऱ्या जगभरातील मराठी बांधवांना या पहिल्यावहिल्या व अद्वितीय पुरस्कारांसाठी स्वतःचे किंवा इतरांचे नामांकन करून सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.
लिंक- https://globalmaharashtrianawards.com/
PMO India Narendra Modi Amit Shah Dr S. Jaishankar CMOMaharashtra Devendra Fadnavis Bruhan Maharashtra Mandal of North America- बृहन्महाराष्ट्र मंडळ Maharashtra Mandal of South Florida Maharashtra Mandal, New York, Inc. MahaNRI Connect